शहरं
Join us  
Trending Stories
1
Government Employees Strike: सरकारी कर्मचारी, शिक्षक आजपासून बेमुदत संपावर, त्यांच्या मागण्या काय आहेत? 
2
Jammu Ramnagar Bus Accident: चालकाचे नियंत्रण सुटलं, बस डोंगरावरून १०० मीटर खोल दरीत कोसळली, २१ जण ठार
3
Donald Trump: शांतता करार आजच होणार; इराणचे शिष्टमंडळही पोहोचणार, डोनाल्ड ट्रम्प काय म्हणाले?
4
ट्रम्प यांचा इराणला थेट इशारा! 'युद्धविराम संपला तर एवढे बॉम्ब पडतील की...', इस्लामाबाद चर्चेआधी तणाव वाढला!
5
...तर इराणवर पुन्हा ड्रोन-क्षेपणास्त्रांचा वर्षाव? "मोहीम अद्याप संपलेली नाही"; व्हाइट हाऊसनंतर आता नेतन्याहू यांचाही थेट इशारा
6
GT vs MI : हा माझा प्रॉब्लेम नाही! तिलक-बुमराहसंदर्भातील कळीच्या मुद्यावर पांड्या स्पष्टच बोलला
7
औराद शहाजानी परिसरात उष्माघाताने शेतकऱ्याचा मृत्यू; साेमवारी तापमान पाेहोचले ४२.८ अंशावर
8
IPL 2026 : "घासून नाही, ठासून हरवलं "! MI चं विक्रमी विजयासह दमदार कमबॅक; GT ला पहिल्यांदाच दिली मात
9
'लिव्ह इन पार्टनर'च्या छळाला कंटाळून ५१ वर्षीय महिलेकडून आत्महत्येचा प्रयत्न, मृत्यू झाल्यावर गुन्हा दाखल
10
रणजी क्रिकेटमध्ये संधी देण्याच्या नावाखाली दोन तरुणांना २० लाखांचा गंडा
11
कार्यकर्ता अपमानित होतो, तेव्हा माझ्यातील शिवसैनिक जागा : एकनाथ शिंदे
12
९३ दिवसांचा थरार अन् 'ऑपरेशन महादेव' फत्ते! पहलगामच्या मारेकऱ्यांचा असा घेतला भारतीय सैन्याने बदला!
13
मध्यपूर्वेतील राजकारणात मोठा भूकंप; "आता अमेरिकेची गरज नाही...!" UAE चा ट्रम्प यांना तगडा धक्का, नवा वाद पेटला
14
श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीला ७ हजार आंब्यांचा महानैवेद्य; अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर ट्रस्टकडून आंबा महोत्सव 
15
Tilak Varma Maiden IPL Hundred : तिलक वर्माची अविश्वसनीय सेंच्युरी; MI साठी ठरला खरा संकटमोचक!
16
Travel : भारतात आहे चक्क मंगळ ग्रहासारखी जागा! पर्यटकांची पहिली पसंती; 'हे' अजब ठिकाण पाहिलेत का?
17
साताऱ्याचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांची बदली; एकूण ९ अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश निघाले... 
18
GT vs MI : स्टंप तोड गोलंदाजी! षटकारासह स्वागत झाल्यावर रबाडानं असा घेतला सूर्या दादाचा बदला (VIDEO)
19
पतीच्या मैत्रिणीस अडकवण्यासाठी चाकुरात पत्नीने केला पुतण्याचा खून; 'असा' झाला उलगडा
20
सराफवाडी येथे माय लेकाची गळफास घेवून आत्महत्या; कारण अस्पष्ट, वालचंदनगर पोलिसांकडून तपास सुरू 
Daily Top 2Weekly Top 5

खामगावात दोन तोंडी बालकाचा जन्म

By admin | Updated: August 24, 2014 00:33 IST

बाळाला चार डोळे, दोन ओठ

खामगाव : येथील सामान्य रूग्णालयात एका ३५ वर्षीय महिलेने दोन तोंड, ४ डोळे, २ ओठ अशा शारीरिक व्यंग असलेल्या बाळाला २२ ऑगस्ट रोजी जन्म दिला आहे. खामगाव येथील सामान्य रुग्णालयात आज शेगाव तालुक्यातील एका ३५ वर्षीय महिला प्रसुतीसाठी आली. रात्री आठ वाजेच्या सुमारास या महिलेने एका विचीत्र बालकाला जन्म दिला. हे पुरुष जातीचे बालक असून त्याला चार डोळे, दोन तोंड, दोन ओठ, दोन कान आहेत. बाळाची टाळू दुभंगलेली असून ओठही दुभंगलेले आहेत. जन्मताच बाळाचे वजन ३.२ किलोग्रॅम आहे. बाळाच्या तोंडाचा भाग वगळता मानेपासून खालील अवयव माणसारखे आहेत. दोन्ही हात, पोट, छाती, लिंग, पाय यामध्ये मात्र कसलाही दोष नाही. या महिलेची प्रसुती नॉर्मल झाली असून आईची प्रकृती ठिक आहे. या ३५ वर्षी महिलेच्या प्रसुतीची ही तिसरी वेळ आहे. या अगोदर तिला दोन मुली आहेत. गेल्या दोन दिवसापासून हे बाळ नवजात शिशु अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले आहे. डॉक्टर त्याच्यावर लक्ष ठेवून आहेत. अशा प्रकारचे बाळ चार-पाच दिवस जिवंत राहत असल्याचा डॉक्टरांचा अंदाज आहे.** सोनोग्राफी न करणे भोवलेस्त्रीला गर्भधारणेपासून तर प्रसुतीपर्यंत ३ ते ४ वेळा सोनाग्राफी करणे गरजेचे आहे. सोनोग्राफीमुळे बाळाची तब्येत त्याच्या हालचाली वगैरे आढळून आल्यानंतर बाळ कमजोर असल्यास डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार औषधोपचार केला जातो. मात्र सदर महिलेने वेळीच सोनोग्राफी न केल्याने या बाळाविषयी पुरेशी माहिती मिळू शकली नाही.** ..तर गर्भपात करता येतोगर्भधारणेपासून सुरुवातीला १८ आठवडे पूर्ण झाल्यानंतर सोनोग्राफी करणे गरजेचे आहे. यावेळी सोनोग्राफी केल्यानंतर जन्मजात असलेल्या बाळामध्ये काही व्यंग आढळल्यास तसेच या व्यंगामुळे ते जिवंत राहत नसल्यास २0 आठवड्यापर्यंत कायदयाने त्या मातेचा गर्भपात करता येतो त्यामुळे जन्मजात दोष निदानाकरिता सोनाग्राफी महत्त्वाची ठरते.** रुग्णालयात जन्माला आलेले दोन तोंडाचे बालक हे सध्या नवजात शिशू अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले आहे. एक लाख बाळामध्ये अशा प्रकारचे बाळ जन्माला येत असल्याची आरोग्य विभागाची माहिती आहे. बाळाच्या आईची प्रकृती मात्र ठिक आहे.