शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
2
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
3
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
4
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
5
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
6
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
7
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
8
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
9
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
10
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
11
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
12
Chanakya Niti: शून्यातून विश्व निर्माण करायचंय? आचार्य चाणक्यांचे 'हे' १० विचार तुम्हाला नक्कीच दिशा देतील
13
९० दिवसांत २८ मृत्यू, मग पुजाऱ्याने दिला 'असा' सल्ला, संपूर्ण गाव झाला रिकामी, आता...  
14
काँग्रेस नेते राजेंद्र भारती यांची आमदारकी रद्द! २७ वर्षांपूर्वीचे प्रकरण काय, ज्यामुळे गमावले विधानसभा सदस्यत्व?
15
FASTag Annual Pass: "पैसे वाया घालवू नका! 'या' हायवेवर आता FASTag वार्षिक पास चालणार नाही; नवीन यादी जाहीर
16
आई वडिलांना न सांभाळणाऱ्या कर्मचाऱ्यांची खैर नाही; १५% पगार कापणार, तेलंगणा सरकारचा निर्णय
17
पगार झाला की खिशाला 'कात्री'? महिनाअखेरची ओढताण टाळण्यासाठी 'हे' ५ आर्थिक मंत्र नक्की पाळा
18
PSL 2026: भर मैदानात डेव्हिड वॉर्नर- मोईन अली यांच्यात तू-तू मैं-मैं; व्हिडीओ व्हायरल, नेमकं काय घडलं?
19
होर्मुझच्या 'टोलनाक्या'वरच अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक! इराणच्या केशम बेटावर दणादण बॉम्बवर्षाव; सॅटेलाईट फोटोंनी फुटले भांडे
20
"मी झोपलेले, तो माझ्या खोलीत आला"; अब्रू वाचवण्यासाठी अभिनेत्रीने इमारतीतून मारली उडी
Daily Top 2Weekly Top 5

अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा; जनावरे मृत झाल्यास वाढीव दराने मदत, पात्रतेचे निकष सुलभ

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2026 06:28 IST

राज्य सरकारकडून विशेष मदत पॅकेज जाहीर

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : जून ते सप्टेंबर २०२५ या कालावधीत राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये झालेल्या अतिवृष्टी व पुरामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. विशेषतः पूरग्रस्त भागांमध्ये पशुधनाचे मोठे नुकसान होऊन अनेक जनावरे मृत्युमुखी पडली किंवा वाहून गेली. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने बाधित पशुपालकांना दिलासा देण्यासाठी विशेष मदत पॅकेज जाहीर केले आहे.

राज्य शासनाने राष्ट्रीय आपत्ती निवारण निधीच्या निकषांमध्ये शिथिलता आणून, सर्व मृत किंवा बेपत्ता पशुधनासाठी तसेच गोठ्यांच्या नुकसानीसाठी सुधारित दराने मदत देण्याचा निर्णय घेतला आहे. या मदतीच्या वितरणासाठी सविस्तर कार्यपद्धती व मार्गदर्शक सूचनादेखील जाहीर केल्या आहेत.

मदत वितरणासाठी तलाठीमार्फत तहसीलदारांकडे अहवाल पाठवून नंतर जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर केला जाईल. मृत पशुधनासाठी शवविच्छेदन अहवाल, बेपत्ता प्रकरणात पंचनाम्याची प्रत, लाभार्थ्यांचा आधार व बँक खात्याची माहिती जोडणे बंधनकारक असेल.

मदतीसाठी पात्रता काय?

पूर्वी असलेल्या मर्यादा हटवून सरकारने निकष अधिक सुलभ केले आहेत आता सर्व आपद्ग्रस्त पशुपालक मदतीसाठी पात्र ठरणारजनावरांच्या संख्येवरील मर्यादा काढून टाकून मृत किंवा बेपत्ता सर्व जनावरे पात्रकुक्कुटपालनातही मर्यादा शिथिल करून अधिक व्यापक मदत

मृत/बेपत्ता पशुधनासाठी नोंद करणे अनिवार्य

मृत किंवा बेपत्ता पशुधनासाठी मदत मिळण्यासाठी खालीलपैकी किमान एका ठिकाणी नोंद असणे आवश्यक आहे :भारत पशुधन ॲप/ २१ वी पशुगणना/लसीकरण नोंदवही / ऑनलाइन नोंद / विमा कंपनीची नोंद/ दुग्ध अनुदान योजनेतील नोंद

पंचनाम्यासाठी अधिकारी उपस्थित राहणे आवश्यक

पशुधनाचे नुकसान झाले असल्यास  पंचनाम्यासाठी  खालील अधिकारी उपस्थित असणे आवश्यक : स्थानिक पशुविकास अधिकारी, तलाठी, पोलीस पाटील / सरपंच, सहकारी दूध संघाचा प्रतिनिधी, संबंधित पशुपालक

...तर मदत मिळणार नाही

विमा संरक्षित पशुधनासाठी विमा कंपनीकडून भरपाई मिळाल्यास सरकारी मदत मिळणार नाही.पशुपालकाची ओळख निश्चित करण्याची जबाबदारी तलाठी व पोलीस पाटील यांची असेल.निधी वितरणासाठी एनडीआरएफ व राज्य आपत्ती निवारण निधीचा वापर करण्यात येणार.

किती मिळणार मदत?

राज्य सरकारने पशुधनाच्या नुकसानीनुसार खालीलप्रमाणे मदतीचे दर निश्चित केले आहेत.

गोठा नुकसान     ३००० रु. प्रति गोठादुभती जनावरे     ३७,५०० रु. प्रति जनावरओढकाम करणारी जनावरे ३२,००० रु. प्रति जनावरलहान जनावरे     २०,००० रु. प्रति जनावरशेळी/मेंढी     ४००० रु. प्रति जनावरकुक्कुटपालन (कोंबडी) १०० रु. प्रति कोंबडी

 

English
हिंदी सारांश
Web Title : Relief for Rain-Hit Farmers: Increased Aid for Livestock Loss

Web Summary : Maharashtra government announced increased compensation for livestock losses due to heavy rains and floods. Eligibility criteria are simplified, removing animal number limits. Enhanced aid extends to poultry, with easier registration and verification processes for affected farmers.
टॅग्स :State Governmentराज्य सरकारMantralayaमंत्रालयFarmerशेतकरीfarmingशेतीRainपाऊस