शरद पवारांच्या NCP ला मोठा धक्का; माजी मंत्र्यांचा मुलगा आतिश दांडेगावकर यांचा भाजपात प्रवेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2026 13:41 IST2026-02-26T13:40:57+5:302026-02-26T13:41:49+5:30

या सर्वांच्या प्रवेशामुळे हिंगोली जिल्ह्यात भाजपा संघटनेला अधिक बळकटी मिळेल. या सर्वांनी जो विश्वास भाजपावर ठेवला आहे त्या विश्वासास पात्र ठरू अशी ग्वाही रवींद्र चव्हाण यांनी दिली.

Big blow to Sharad Pawar NCP in Hingoli; Atish Dandegaonkar joins BJP | शरद पवारांच्या NCP ला मोठा धक्का; माजी मंत्र्यांचा मुलगा आतिश दांडेगावकर यांचा भाजपात प्रवेश

शरद पवारांच्या NCP ला मोठा धक्का; माजी मंत्र्यांचा मुलगा आतिश दांडेगावकर यांचा भाजपात प्रवेश

नवी मुंबई - शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री जयप्रकाश दांडेगावकर यांचे पुत्र आतिश दांडेगावकर यांनी त्यांच्या शेकडो समर्थकांसह भारतीय जनता पार्टी मध्ये प्रवेश केला. भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. 

सहकार क्षेत्रात काम करणारे उमदे नेतृत्व दांडेगावकर यांच्या भाजपा प्रवेशामुळे आता ‘आतिश’ पर्व सुरू झाले आहे या शब्दांत चव्हाणांनी त्यांचे कौतुक केले. रवींद्र चव्हाण म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली देशाचा आणि महाराष्ट्राचा वेगाने विकास होत आहे. सर्व समाजघटकांचा विकास आणि प्रगती करण्याचा विडा त्यांनी उचलला आहे. या दोघांच्या दूरदृष्टीपूर्ण नेतृत्वावर विश्वास ठेवून आज आतिश दांडेगावकर यांच्यासोबत त्यांच्या असंख्य समर्थकांनी भाजपामध्ये प्रवेश केला आहे. हिंगोली येथे पिकणाऱ्या पिकांतून या परिसराचा विकास आणि रोजगार निर्मिती करण्यासाठी काय करता येईल ही जबाबदारी आता आतिश दांडेगावकर यांच्यावर सोपवत असल्याचं त्यांनी सांगितले. 

तसेच या सर्वांच्या प्रवेशामुळे हिंगोली जिल्ह्यात भाजपा संघटनेला अधिक बळकटी मिळेल. या सर्वांनी जो विश्वास भाजपावर ठेवला आहे त्या विश्वासास पात्र ठरू आणि सर्वांचा पक्षात उचित सन्मान राखला जाईल अशी ग्वाही  रवींद्र चव्हाण यांनी दिली आहे. तर देशाचा आणि राज्याचा सर्वसमावेशक विकास हा एनडीए आणि भाजपा महायुती सरकारच करू शकते म्हणूनच विकासकार्यात सहभागी होण्यासाठी भाजपामध्ये प्रवेश केला आहे असं आतिश यांनी म्हटलं.

दरम्यान, आतिश दांडेगावकर यांच्यासोबत भाजपामध्ये प्रवेश केलेल्यांमध्ये वसमत विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस (श.प) वसमत तालुका अध्यक्ष दौलत हुंबाड, औंढा नागनाथ तालुका अध्यक्ष रमेश सानप, जिल्हा सरचिटणीस गणेश कमळू, महिला राष्ट्रवादी प्रदेश सरचिटणीस रत्नमाला शिंदे, युवक तालुका अध्यक्ष स्वप्नील मुळे, पूर्णा सहकारी साखर कारखान्याचे संचालक शंकर इंगोले, राम झुंझुर्डे, माजी संचालक अमोल मुळे आदींचा समावेश आहे. वसमतचे माजी नगराध्यक्ष व काँग्रेस नेते विजय कडतन यांनीही भाजपात प्रवेश केला.

Web Title : शरद पवार की NCP को झटका: पूर्व मंत्री के बेटे भाजपा में शामिल

Web Summary : शरद पवार की NCP को झटका लगा, पूर्व मंत्री जयप्रकाश दांडेगांवकर के बेटे आतिश दांडेगांवकर समर्थकों के साथ भाजपा में शामिल हुए। रविंद्र चव्हाण ने मोदी और फडणवीस के नेतृत्व में विकास पर जोर दिया। दांडेगांवकर ने विकास के लिए भाजपा में शामिल होने की बात कही, जिससे हिंगोली में भाजपा मजबूत हुई।

Web Title : Sharad Pawar's NCP hit: Former minister's son joins BJP

Web Summary : In a blow to Sharad Pawar's NCP, Atish Dandegaonkar, son of ex-minister Jaiprakash Dandegaonkar, joined BJP with supporters. Ravindra Chavan welcomed him, emphasizing development under Modi and Fadnavis. Dandegaonkar cited inclusive development as his reason for joining, bolstering BJP's Hingoli unit.