शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
रिलायन्सचा मोठा धमाका! अंबानींनी खरेदी केली प्रियांका चोप्राची कंपनी अन् तिलाच बनवलं 'बॉस'; संपूर्ण कंट्रोल कुणाकडे राहणार?
5
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
6
Bhuvneshwar Kumar: बुमराहपेक्षा भारी ठरला भुवी! असा पराक्रम करणारा पहिला भारतीय जलदगती गोलंदाज
7
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
8
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
9
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
10
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
11
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
12
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
13
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
14
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
15
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
16
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
17
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
18
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
19
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
20
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

एकनाथ शिंदे अन् उद्धव ठाकरेंना भाजपाचा मोठा धक्का; २ मोठ्या नेत्यांचा लवकरच पक्षप्रवेश होणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 9, 2025 11:07 IST

कल्याण डोंबिवली महापालिकेचे ते तीनदा नगरसेवक झाले. स्थायी समिती सभापती म्हणून त्यांनी कार्यभार सांभाळला होता.

मुंबई - आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी भारतीय जनता पार्टीने उद्धव ठाकरे यांच्यासह उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाही धक्का दिला आहे. उद्धवसेनेचे कल्याण डोंबिवली जिल्हा प्रमुख दीपेश म्हात्रे हे भाजपात प्रवेश करणार आहेत. दीपेश म्हात्रे यांच्या पक्षप्रवेशाची गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा सुरू होती. त्यातच प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत दीपेश म्हात्रे भाजपात प्रवेश करणार असल्याचं निश्चित झाले आहे. 

दीपेश म्हात्रे हे ठाकरेंच्या पक्षाकडून डोंबिवली विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार होते. त्यांच्यावर जिल्हाप्रमुखपदाची जबाबदारी सोपवण्यात आली होती. त्यात निवडणुकीपूर्वी दीपेश म्हात्रे भाजपात प्रवेश करत असल्याने ठाकरेंना हा धक्का मानला जातो. दीपेश म्हात्रे यांचे वडील पुंडलिक म्हात्रे हे कल्याण डोंबिवलीचे माजी महापौर होते. वयाच्या २३ व्या वर्षी दीपेश यांनी शिवसेनेत कामाला सुरुवात केली. रवींद्र चव्हाण यांच्याविरोधात २०१४ आणि २०२४ मध्ये त्यांनी विधानसभा निवडणूक लढवली होती. २००९ साली पहिल्यांदाच बिनविरोध ते नगरसेवक म्हणून निवडून आले होते. कल्याण डोंबिवली महापालिकेचे ते तीनदा नगरसेवक झाले. स्थायी समिती सभापती म्हणून त्यांनी कार्यभार सांभाळला होता. २०२२ पर्यंत ते शिवसेनेत कार्यरत होते, त्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात त्यांनी शिंदेसेनेत प्रवेश केला. मात्र त्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात शिवसेनेत प्रवेश केला. 

काँग्रेसलाही धक्का

कल्याण डोंबिवलीत ठाकरेंसोबतच भाजपा काँग्रेसलाही धक्का देणार आहे.  काँग्रेसचे माजी नगरसेवक आणि प्रदेश सचिव संतोष केणे हेदेखील भाजपात प्रवेश करत आहेत. कल्याण ग्रामीण मतदारसंघात काँग्रेसचे मजबूत आणि आक्रमक नेतृत्व म्हणून ते ओळखले जातात. मतदारसंघात अनेक प्रश्नांवर त्यांनी आक्रमकपणे आंदोलने केली आहेत. नवी मुंबई विमानतळाला दि.बा पाटील नाव द्यावे या मागणीसाठी त्यांनी अनेकदा आंदोलन केले आहे. 

दरम्यान, सोलापूर येथे एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला मोठा झटका बसला आहे. शिंदेसेनेचे माजी सोलापूर जिल्हा संपर्क प्रमुख शिवाजी सावंत हे भारतीय जनता पार्टीत प्रवेश करणार आहेत. येत्या १२ नोव्हेंबरला मुंबईत प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत त्यांचा पक्षप्रवेश पार पडेल. शिवाजी सावंत हे माजी मंत्री तानाजी सावंत यांचे बंधू आहेत. शिवाजी सावंत यांच्यासोबत शिंदेसेनेचे अनेक पदाधिकारी भाजपात प्रवेश करतील असा दावा शिवाजी सावंत यांनी केला आहे. 

English
हिंदी सारांश
Web Title : BJP delivers blow to Shinde, Thackeray; key leaders to join.

Web Summary : Ahead of local elections, BJP gains key leaders from both Thackeray's and Shinde's factions, including Dipesh Mhatre. A Congress leader, Santosh Kene, is also joining BJP. In Solapur, Shinde's party faces setback as Shivaji Sawant defects to BJP.
टॅग्स :BJPभाजपाEknath Shindeएकनाथ शिंदेUddhav Thackerayउद्धव ठाकरेRavindra Chavanरविंद्र चव्हाण