शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

भुजबळ फार्म, ‘चंद्राई’चे मूल्यांकन अपूर्ण

By admin | Updated: August 24, 2016 05:27 IST

भुजबळ यांच्या भुजबळ फार्म, परिसर व चंद्राई बंगल्याच्या मूल्यांकनाचे काम मंगळवारीही मुंबईच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाकडून सुरू

नाशिक : बेहिशेबी मालमत्तेप्रकरणी अटकेत असलेले माजी सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ यांच्या भुजबळ फार्म, परिसर व चंद्राई बंगल्याच्या मूल्यांकनाचे काम मंगळवारीही मुंबईच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाकडून सुरू होते. मूल्यांकनाचे काम अजून अपूर्ण आहे. किमान आठवडाभर ही प्रक्रिया चालेल.सोमवारपासून भुजबळ फार्म व येथील जुन्या-नव्या बंगल्यांचे क्षेत्र आणि विविध वस्तूंची मोजदाद सुरू आहे. त्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचीही मदत घेतली जात आहे. तपासाचा एक भाग म्हणून मूल्यांकनाची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती भुजबळ यांचे वकील अ‍ॅड. जालिंदर ताडगे यांनी दिली.गोविंदनगर भागातील आलिशान ‘भुजबळ फार्म’च्या मालमत्तेचे अचूक मूल्यांकन करण्याचा निश्चय लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केला आहे. संपूर्ण गृहसजावटींच्या वस्तूंपासून तर लाकडी फर्निचरची तपासणी करण्यात येत आहे. आकर्षक विद्युत व्यवस्था पडताळण्यात आली. विविध महागड्या दिव्यांपासून तर आवार सुशोभित करण्यासाठी लॉन्स व महागडे परदेशी रोपट्यांपर्यंत फेरमुल्यांकन लाचलुचपत प्रतिबंधक विभाग करत आहे. (प्रतिनिधी)>मफलरचीही मोजदाद!भुजबळांच्या बंगल्याची दाखविलेली किंमत आणि प्रत्यक्ष बाजारमूल्य यात मोठी तफावत असल्याचे सुत्रांकडून समजते. दगड, माती, लाकूड आणि सजावटीसाठी लावलेले परदेशी प्रजातीचे महागडे झुडूप अशा सर्वच बाबींचे मूल्यांकन सुरू आहे. मातीपासून मफलरपर्यंतची ‘किंमत’ अधिकाऱ्यांकडून ठरविली जात आहे.