शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

महासत्ता बनण्यासाठी शिक्षण तळागाळापर्यंत पोहोचायला हवे

By admin | Updated: June 2, 2014 22:59 IST

आपला देश महासत्ता बनण्याकडे वाटचाल करीत आहे. यामध्ये शिक्षणाची भूमिका महत्वाची आहे.

राज्यपाल के. शंकरनारायणन यांचे मत : रायन इंटरनॅशनल स्कूलचे उद्घाटनपुणे : आपला देश महासत्ता बनण्याकडे वाटचाल करीत आहे. यामध्ये शिक्षणाची भूमिका महत्वाची आहे. आजही तळागाळापर्यंत शिक्षण पोहोचलेले नाही. गरीब लोक, आदिवासी, जाती-जमाती शिक्षणापासून वंचित आहे. जोपर्यंत शिक्षण त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही, तोपर्यंत भारत खर्‍याअर्थाने महासत्ता होणार नाही, असे मत राज्यपाल के. शंकरनारायणन यांनी व्यक्त केले.रेयान इंटरनॅशनल स्कूलच्या उद्घाटन कार्यक्रम ते बोलत होते. याप्रसंगी पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. वासुदेव गाडे, प्रसिध्द अभिनेता जॉनी लिव्हर, रेयान इंटरनॅशनल ग्रुपचे अध्यक्ष डॉ. ए. एफ. पिन्टो व्यासपीठावर उपस्थित होते. खासदार संजय काकडे, उषा काकडे, ग्रुपच्या व्यवस्थापकीय संचालिका ग्रेस पिन्टो, मुख्य कार्यकारी अधिकारी रेयान पिन्टो कार्यक्रमास उपस्थित होते. राज्यपाल म्हणाले, भारत महासत्ता बानण्याच्या मार्गावर आहे. आजची मुले हिच देशाचे उद्याचे भविष्य असणार आहे आणि तेच वेगवेगळया क्षेत्रात देशाचे नेतृत्व करणार आहे. हे साध्य करण्यासाठी आपली शिक्षण पध्दतीत बदल करून नवकल्पनांना वाव दिला पाहिजे आणि सर्वसमावेशक शिक्षण पध्दती अवलंबली पाहिजे. पूर्ण जग आता एक कुटुंब होत आहे. अशात आपल्या मुलाला चांगला नागरिक बनविण्याची जबाबदारी आई-वडील व शिक्षकांवर आहे. त्यामुळे लहानपणापासूनच त्यांचे चारित्र्य घडविण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. माहिती, ज्ञान सर्वांपर्यंत पोहोचविण्यात माहिती तंत्रज्ञान, आयसीटी हे आजच्या काळात महत्वाची भूमिका बजावत आहे. त्याचा वापर शाळांनी केला पाहिजे. पुणे हे एक महत्वाचे शहर असून त्याला एक ऐतिहासिक परंपरा आहे. ऑस्क्सफर्ड ऑफ द ईस्ट अशी ओळख असलेल्या पुणे विद्यापीठात २० हजाराहून अधिक परदेशी विद्यार्थी शिक्षण घेत आहेत, ही गौरवाची बाब आहे, असे मतही त्यांनी व्यक्त केले.डॉ. पिन्टो यांनी मनोगत व्यक्त केले.