शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

जीसीएवर बीसीसीआयचा बाउन्सर

By admin | Updated: June 16, 2016 21:04 IST

घोटाळेबहाद्दर त्रिकुटाला अटक करण्यात आल्यानंतर त्याची गंभीर दखल घेत भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) समिती नियुक्त करण्याचा निर्णय घेतला

ऑनलाइन लोकमत

पणजी, दि. 16 -  गोवा क्रिकेट असोसिएशनच्या (जीसीए) घोटाळेबहाद्दर त्रिकुटाला अटक करण्यात आल्यानंतर त्याची गंभीर दखल घेत भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) समिती नियुक्त करण्याचा निर्णय घेतला असून या समितीकडे जीसीएचा कारभार देण्यात येणार आहे. जीसीएचे अध्यक्ष चेतन देसाई, सचिव विनोद ऊर्फ बाळू फडके व खजिनदार अकबर मुल्ला यांना आर्थिक गुन्हे विभागाने 3.13 कोटी रुपयांची अफरातफर प्रकरणात बुधवारी अटक केली होती.या धरपकडीनंतर जीसीएचा कारभार व्यवस्थित चालावा, यासाठी बीसीसीआयने खबरदारी घेतली आहे. असोसिएशनचा कारभार चालविण्यासाठी समिती नियुक्त करण्यात येणार असल्याचे बीसीसीआयचे सचिव अजय शिर्के यांनी जाहीर केले आहे. क्रिकेट व क्रिकेटपटूंच्या हिताची काळजी घेण्यासाठी आवश्यक ती खबरदारी घेतली जाईल. क्रिकेट व क्रिकेटपटूंचे नुकसान होऊ देणार नाही, असे शिर्के यांनी माध्यमांना सांगितले.जीसीएच्या घोटाळे आणि इतर वादानंतर जीसीएचे बीसीसीआयमधील सदस्यत्व रद्द करण्याची शक्यता शिर्के यांनी फेटाळली. हे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्यामुळे तूर्त असा कोणताही निर्णय घेतला जाणार नाही, असे त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)

त्रिकुटाला एक दिवस कोठडी

जीसीएच्या बुधवारी अटक करण्यात आलेल्या तिन्ही पदाधिका:यांना पोलिसांनी गुरुवारी पणजी प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालयाकडून एक दिवसाची पोलीस कोठडी मिळविली. संशयितांना न्यायदानाच्या ठिकाणी उपस्थित न करता त्यांना न्यायाधीशांच्या कचेरीत उपस्थित करण्यात आले. तेथून मुल्ला यांना गोमेकॉत, तर चेतन व बाळू यांना पणजी पोलिसांच्या कोठडीत नेण्यात आले. पोलिसांना हवी इतिवृत्ताची वहीजीसीएच्या इतिवृत्ताची वही पोलिसांना हवी असून ती मिळविण्यासाठी तिन्ही संशयितांची कोठडीतील चौकशी महत्त्वाची आहे, असे पोलिसांनी न्यायालयाला सांगितले. या वहीची माहिती संशयित देत नसल्याचा दावा त्यांनी केला. इतिवृत्ताची वही गायब झाल्याची तक्रार यापूर्वी जीसीएचे सदस्य डॉ. शेखर साळकर यांनी केली होती.