शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
2
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
3
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
4
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
5
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
6
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
7
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
8
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
9
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
10
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
11
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
12
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
13
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
14
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
15
इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे
16
Fastest Chase In IPL History : जे मुंबई इंडियन्सनं करून दाखवलं ते १८ वर्षांत कुणालाच नाही जमलं
17
Sonam Raghuvanshi : “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप
18
कोलंबिया सरकार ८० हिप्पोंना ठार मारणार; अनंत अंबानी यांनी केली 'वनतारा'मध्ये पाठवण्याची विनंती
19
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
20
सोनम रघुवंशी जामिनावर सुटली, पण मेघालयातच अडकली; शिलॉन्ग न्यायालयाचा मोठा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

बिनकामाचे एमएसआरडीसी!

By admin | Updated: May 12, 2015 02:47 IST

तत्कालिन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी राष्ट्रवादीवर अविश्वास दाखवत मंत्रीमंडळ पायाभूत सुविधा समितीची वर्षभर बैठकच घेतली नाही तर त्याहीपुढे जात विद्यमान

अतुल कुलकर्णी, मुंबईतत्कालिन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी राष्ट्रवादीवर अविश्वास दाखवत मंत्रीमंडळ पायाभूत सुविधा समितीची वर्षभर बैठकच घेतली नाही तर त्याहीपुढे जात विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सत्तेवर आल्यापासून आजपर्यंत या समितीची स्थापनाच केली नाही. कोणतेही निर्णय या समितीशिवाय होत नाहीत, परिणामी राज्यात मोठमोठ्या प्रकल्पांच्या घोषणा केवळ कागदावर उरल्या असून एमएसआरडीसी विभाग बिनकामाचा बनला आहे. इन्फ्रास्ट्रक्चरचे प्रकल्प मंत्रीमंडळ पायाभूत सुविधा समितीच्या मार्फत मंजूर केले जातात. मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती कार्य करत असते. या समितीत वित्त व नियोजन मंत्री, महसूलमंत्री, बांधकाममंत्री, वन खात्याचे मंत्री, उद्योगमंत्री, मुख्य सचिवांसह विविध विभागाचे सचिव असे १८ ते १९ लोक असतात. २५ कोटींच्या वरचा प्रकल्प असेल तर अशा कामाच्या निविदा काढण्यासाठी, निविदा निश्चित करण्यासाठी या समितीची मान्यता लागते. मात्र अशी समितीच अस्तित्वात नसल्यामुळे कोणत्याही मोठ्या प्रकल्पांना फडणवीस सरकार आल्यापासून मान्यताच मिळालेली नाही. आघाडी सरकारच्या काळात एमएसआरडीसी हा विभाग राष्ट्रवादीकडे होता त्यावेळी अनेक आक्षेप घेत पृथ्वीराज चव्हाण यांनी अनेक महिने पायाभूत समितीची बैठकच घेतली नव्हती.