यशराज बॅनरच्या ‘बँकचोर’ या आगामी चित्रपटात कॉमेडियन कपिल शर्माऐवजी रितेश देशमुख मुख्य भूमिकेत दिसणार आहे. काही दिवसांपूर्वी रिलीज झालेल्या ‘एक विलेन’ या चित्रपटात रितेशने नकारात्मक भूमिका साकारली आहे. त्यासाठी त्याची समीक्षकांसह प्रेक्षकांनीही प्रशंसा केली आहे. ‘बँकचोर’साठी रितेशला साईन करण्यात आले असून लवकरच चित्रपटाचे शूटिंग सुरू होणार आहे. हा चित्रपट पुढील वर्षाच्या सुरुवातीला रिलीज करण्याची योजना आहे. कॉमेडी नाईटस् विथ कपिलसाठी वेळ द्यावा, यावा यासाठी कपिल या चित्रपटातून बाहेर पडला आहे.
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}