शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

आरोपीचे बँक खाते गोठवले!

By admin | Updated: December 30, 2014 01:20 IST

एक कोटी रुपयांच्या रकमेबाबत तपास करण्याचे निर्देश पाथर्डी न्यायालयाने पोलिसांना दिले़ तसेच संबंधित बँक खाते गोठवण्याचे आदेशही न्यायालयाने या वेळी दिले़

पाथर्डी (जि. अहमदनगर) : जवखेडा दलित हत्याकांडातील फिर्यादीच आरोपी निघाल्याने शासकीय आर्थिक मदत, विविध राजकीय व्यक्ती आणि हितचिंतकांकडून सहानुभूतिपोटी मिळालेल्या जवळपास एक कोटी रुपयांच्या रकमेबाबत तपास करण्याचे निर्देश पाथर्डी न्यायालयाने पोलिसांना दिले़ तसेच संबंधित बँक खाते गोठवण्याचे आदेशही न्यायालयाने या वेळी दिले़ दरम्यान, आरोपी दिलीप जाधव याला १ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी वाढविण्यात आली.जवखेडे खालसा येथे संजय जाधव, त्याची पत्नी जयश्री व मुलगा सुनील यांचा २० आॅक्टोबरच्या मध्यरात्री धारदार शस्त्राने खून करण्यात आला. या गुन्ह्यात प्रशांत जाधव, त्याचा भाऊ अशोक सध्या न्यायालयीन कोठडीत आहे. तिसरा आरोपी दिलीप जाधवला अटक केली होती. त्याच्या पोलीस कोठडीची मुदत सोमवारी संपल्याने त्याला न्यायालयात हजर करण्यात आले होते़ या वेळी न्यायालयाने पोलिसांच्या तपासावर ताशेरे ओढले. या गुन्ह्यात आरोपी निष्पन्न नसताना अ‍ॅट्रॉसिटीचे कलम का लावण्यात आले? सेक्शन ३४ उशिरा का लावले? अ‍ॅट्रॉसिटीचे कलम लावल्याने पीडितांच्या नातेवाइकांना सहानुभूतिपोटी जवळपास १ कोटी रुपयांची रक्कम मिळालेली आहे़ पोलिसांनी ही रक्कम ताब्यात घेऊन ती ताब्यात घ्यावी, असे आदेशही न्यायालयाने पोलिसांना दिले आहेत. (प्रतिनिधी)च्न्यायालयाने पोलिसांच्या तपासाबाबत खडसावल्यानंतर पोलिसांनी अ‍ॅट्रॉसिटीचे कलम वगळावे, असा अर्ज न्यायालयाकडे दिला आहे. च्हत्याकांड हे कौटुंबिक वादातून घडले असून, मारेकरी हे मृतांचे जवळचे नातेवाईक आहेत. चौघांनीच संगनमताने हे हत्याकांड घडवून आणल्याने या गुन्ह्यात अ‍ॅट्रॉसिटीचे कलम लावण्याची गरज नाही, असे निष्पन्न झाल्यानेच सदरचा अर्ज पोलिसांनी न्यायालयाकडे दिल्याची माहिती आहे.फक्त चारच आरोपी!जवखेडे हत्या प्रकरणात केवळ चारच आरोपी निष्पन्न झाल्याची माहिती आहे. त्यातील तीन आरोपींना अटक करण्यात आली असून, एक आरोपी अटक करणे बाकी आहे. चौथा आरोपी ही महिला असल्याचे समजले. या गुन्ह्यात वापरण्यात आलेले करवत, कुऱ्हाड ही हत्यारे पोलिसांनी जप्त केली आहेत. एक-दोन दिवसांत चौथा आरोपी अटक होण्याची शक्यता आहे.