शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

खाजगी बसमधून मालवाहतुकीला बंदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2019 05:37 IST

परिवहनमंत्र्यांचे आदेश : एसटी चालकांसह वाहकांवर कठोर कारवाईचा इशारा

मुंबई : प्रवासी वाहतुकीचा परवाना असताना मालवाहतूक करणाऱ्या खासगी बसगाड्यांचा परवाना रद्द करण्याच्या सूचना परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी प्रशासनाला दिल्या आहेत. परवाना रद्द केल्यानंतर संबंधित बस जप्त करण्यात येतील, असेही त्यांनी स्पष्ट केले. याशिवाय विनापरवानगी कुरियर किंवा मालवाहतूक नेताना आढळल्यास एसटीचालक व वाहकावर प्रथम निलंबन, तर दुसऱ्या वेळेस बडतर्फीची कारवाई करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. कर्जत-आपटा बसमध्ये आढळलेल्या आयईडी बॉम्बच्या पार्श्वभूमीवर सोमवारी तातडीने आयोजित केलेल्या बैठकीत ते बोलत होते.

एसटी बसमध्ये सापडलेल्या स्फोटकांच्या घटनेनंतर तातडीने परिवहन विभागाने कठोर पावले उचलण्याचा निर्णय घेतल्याचे रावते यांनी सांगितले. ते म्हणाले की, पोलिसांनी राज्यात कुठेही आणि कधीही खासगी व एसटी बसेसची तपासणी करावी. यापुढे परिवहन विभागाची त्यास हरकत नसेल. तसेच प्रत्येक एसटी स्टँडवर पोलीस चौकी उभारण्याबाबत त्यांनी गृह विभागाला विचारणा करतानाच स्टँडवर जागा देण्याची तयारी दर्शवली. परिवहन विभागाने यासंदर्भात नव्याने नियमावली तयार करण्याचे आदेशही त्यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना दिले.

दरम्यान, मालवाहतुकीच्या आडून प्रवाशांना जीवाला धोका निर्माण करणाºया बसेसवर कठोर कारवाई करण्यासाठी प्रत्येक प्रवाशाला एसटीप्रमाणेच २० किलोपर्यंत सामान नेण्याची नियमावली तयार केली जाईल. तसेच बसमध्ये प्रवासी नसताना मालाची वाहतूक करता येणार नसल्याचेही रावते यांनी स्पष्ट केले. मालवाहतुकीसाठी प्रवासी वाहतुकीमधील बसेसचा वापर करू नये, असे आदेशही त्यांनी दिले. नियमांचे उल्लंघन करून प्रवासी बसेसमधून मालवाहतूक करणाºया खासगी बसेसचा परवाना रद्द करून बस जप्त करण्याच्या सूचनाही त्यांनी परिवहन विभागास दिल्या. या बैठकीत गृहराज्यमंत्री रणजीत पाटील यांच्यासह परिवहन व गृह विभागाचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.एसटीमध्ये सीसीटीव्ही लागणार?एसटी बसेसमध्ये सीसीटीव्ही लावण्याबाबतही विचार करत असल्याचे परिवहनमंत्री रावते यांनी ’लोकमत’शी बोलताना सांगितले. तसेच खासगी बसगाड्यांमध्येही सीसीटीव्ही लावता येतील का, याचा विचार करत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.