शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

‘बर्थडे सेलिब्रेशन’मध्ये फुग्यांचा स्फोट

By admin | Updated: January 19, 2017 02:34 IST

डॉ. मिनी बोधनवाला यांच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमात फुग्यांचा स्फोट झाल्याची घटना घडल्याचे आज (बुधवारी) उघड झाले.

मुंबई : परळ येथील वाडिया रुग्णालयात शुक्रवारी रुग्णालयाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मिनी बोधनवाला यांच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमात फुग्यांचा स्फोट झाल्याची घटना घडल्याचे आज (बुधवारी) उघड झाले. या प्रकरणी रुग्णालयातील चार कर्मचारी जखमी झाले आहेत. या घटनेबाबत पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे.रुग्णालयाच्या आवारात शुक्रवारी दुपारी एकच्या सुमारास डॉ. मिनी बोधनवाला यांच्या वाढदिवासाचा छोटेखानी सोहळा आयोजित करण्यात आला होता. या वेळी कर्मचाऱ्यांनी वाढदिवस साजरा करण्यासाठी हायड्रोजन गॅसयुक्त फुगे आणि फटाके आणले होते. या वेळी फटाक्यांची ठिगणी फुग्यांवर पडून हा स्फोट झाल्याची माहिती मिळाली. या घटनेत आॅडिओलॉजिस्ट सादिया अन्सारी ४० टक्के भाजल्या आहेत. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर निशा कांबळे, निवेदिता गायकवाड आणि हर्षदा साटम या किरकोळ जखमी झाल्या असून त्यांना प्राथमिक उपचार करून सोडण्यात आले.याविषयी डॉ. मिनी बोधनवाला यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी बोलण्यास नकार देत फोन बंद केला. याबाबत पोलीस ठाण्यात कुणाबाबत तक्रार दाखल करण्यात आली नाही. याविषयी भोईवाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक वाडिया रुग्णालयाच्या सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करत आहेत. या प्रकरणी अधिक तपास सुरू असल्याची माहिती पोलीस प्रवक्ते अशोक दुधे यांनी ‘लोकमत’ला दिली. (प्रतिनिधी)