शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

पोलिसी दट्टय़ानंतर ‘बालहट्ट’ मागे!

By admin | Updated: August 14, 2014 10:14 IST

बालहक्क संरक्षण आयोगाने बालगोविंदांवर घातलेली बंदी आणि उच्च न्यायालयाने दिलेले आदेश झुगारून ‘थर चढविणारच’ असे बंड पुकारणा-या दहीहंडी समन्वय समितीने पोलिसी दट्टय़ानंतर मात्र सपशेल माघार घेतली आहे.

मुंबई : बालहक्क संरक्षण आयोगाने बालगोविंदांवर घातलेली बंदी आणि त्यानंतर उच्च न्यायालयानेही दिलेले आदेश झुगारून ‘थर चढविणारच’ असे बंड पुकारणा-या दहीहंडी समन्वय समितीने पोलिसी दट्टय़ानंतर मात्र सपशेल माघार घेतली आहे. यंदा दहीहंडी उत्सवात बारा वर्षाखालील बालगोविंदांना चढवणार नाही, अशी मवाळ भूमिका घेत बालहट्टाला सध्यातरी पूर्णविराम दिला. उच्च न्यायालयाने 18 वर्षाखालील गोविंदांना बंदी घातली असली, तरी समन्वय समितीने मात्र बालगोविंदांसंदर्भातील भूमिका स्पष्ट केली आहे.
बालहक्क संरक्षण आयोगाने बालगोविंदांवर बंदी घालून पोलिसांना कारवाईचे निर्देश दिले. त्यानंतर नारळी पौर्णिमेच्या सराव शिबिरांदरम्यान बालगोविंदा आणि गोविंदांच्या अपघातांची संख्या वाढली. तरीही ‘बालहट्ट’ सोडण्यास तयार नसलेल्या दहीहंडी समन्वय समितीने उच्च न्यायालयाचे आदेशही धुडकावले. मात्र बुधवारी सह्याद्री अतिथीगृहावर पार पडलेल्या बैठकीत पोलीस आयुक्त राकेश मारिया आणि राज्याचे गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्या प्रश्नोत्तरांना तोंड देताना समन्वय समितीला चांगलाच घाम सुटला. या बैठकीत पोलीस आयुक्तांनी खडे बोल सुनावल्याने आता दहीहंडी समन्वय समितीने ‘बालहट्ट’ सोडला आहे. मुंबई, ठाणो, नवी मुंबई आणि रायगड या सर्व विभागांतील गोविंदा पथकांनीही बालगोविंदांना थरांवर चढवू नये, यासाठी समन्वय समितीच्या वतीने आवाहन करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणो प्रत्येक गोविंदा पथकाची वैयक्तिक भेट घेऊन त्यांना माहिती देण्यात येणार असल्याचे समन्वय समितीने म्हटले आहे. (प्रतिनिधी)
 
1 उच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर राज्य शासनाने लक्ष घालण्याची मागणी समितीने केली होती. त्यामुळे शासनाने दखल घेऊन सकारात्मक पाऊल उचलून आमच्यावर विश्वास दाखविला. हीच बाब लक्षात घेऊन आम्हीही बालगोविंदांना थरांवर न चढविण्याचा निर्णय घेतला आहे, असे दहीहंडी समन्वय समितीचे अध्यक्ष बाळा पडेलकर यांनी सांगितले.
 
2 लोकांच्या भावना आणि मुख्य म्हणजे गोविंदा पथकांतील खेळाडूंचा विचार करून राज्य शासनाने पुनर्विचार याचिकेची भूमिका जाहीर केली. त्यामुळे आम्ही पुढाकार घेऊन यंदा बालगोविंदांना थरांवर चढवू नये, असे ठरविल्याचे शिवसाई गोविंदा पथकाचे संचालक उपेंद्र लिंबाचिया म्हणाले.