शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा इराणला थेट इशारा! 'युद्धविराम संपला तर एवढे बॉम्ब पडतील की...', इस्लामाबाद चर्चेआधी तणाव वाढला!
2
...तर इराणवर पुन्हा ड्रोन-क्षेपणास्त्रांचा वर्षाव? "मोहीम अद्याप संपलेली नाही"; व्हाइट हाऊसनंतर आता नेतन्याहू यांचाही थेट इशारा
3
GT vs MI : हा माझा प्रॉब्लेम नाही! तिलक-बुमराहसंदर्भातील कळीच्या मुद्यावर पांड्या स्पष्टच बोलला
4
औराद शहाजानी परिसरात उष्माघाताने शेतकऱ्याचा मृत्यू; साेमवारी तापमान पाेहोचले ४२.८ अंशावर
5
IPL 2026 : "घासून नाही, ठासून हरवलं "! MI चं विक्रमी विजयासह दमदार कमबॅक; GT ला पहिल्यांदाच दिली मात
6
'लिव्ह इन पार्टनर'च्या छळाला कंटाळून ५१ वर्षीय महिलेकडून आत्महत्येचा प्रयत्न, मृत्यू झाल्यावर गुन्हा दाखल
7
रणजी क्रिकेटमध्ये संधी देण्याच्या नावाखाली दोन तरुणांना २० लाखांचा गंडा
8
कार्यकर्ता अपमानित होतो, तेव्हा माझ्यातील शिवसैनिक जागा : एकनाथ शिंदे
9
९३ दिवसांचा थरार अन् 'ऑपरेशन महादेव' फत्ते! पहलगामच्या मारेकऱ्यांचा असा घेतला भारतीय सैन्याने बदला!
10
मध्यपूर्वेतील राजकारणात मोठा भूकंप; "आता अमेरिकेची गरज नाही...!" UAE चा ट्रम्प यांना तगडा धक्का, नवा वाद पेटला
11
श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीला ७ हजार आंब्यांचा महानैवेद्य; अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर ट्रस्टकडून आंबा महोत्सव 
12
Tilak Varma Maiden IPL Hundred : तिलक वर्माची अविश्वसनीय सेंच्युरी; MI साठी ठरला खरा संकटमोचक!
13
Travel : भारतात आहे चक्क मंगळ ग्रहासारखी जागा! पर्यटकांची पहिली पसंती; 'हे' अजब ठिकाण पाहिलेत का?
14
साताऱ्याचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांची बदली; एकूण ९ अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश निघाले... 
15
GT vs MI : स्टंप तोड गोलंदाजी! षटकारासह स्वागत झाल्यावर रबाडानं असा घेतला सूर्या दादाचा बदला (VIDEO)
16
पतीच्या मैत्रिणीस अडकवण्यासाठी चाकुरात पत्नीने केला पुतण्याचा खून; 'असा' झाला उलगडा
17
सराफवाडी येथे माय लेकाची गळफास घेवून आत्महत्या; कारण अस्पष्ट, वालचंदनगर पोलिसांकडून तपास सुरू 
18
गुंतवणूकदार मालामाल! १० वर्षांत पैशांचा पाऊस पाडणाऱ्या कंपनीचा स्टॉक होणार स्प्लिट; रेकॉर्ड डेट जाहीर
19
पाेटच्या दाेन चिमुकल्यांसह मातेने विहिरीत उडी घेत संपवले जीवन! खरोसा गावावर शोककळा
20
"अजित डोभाल अचानक सौदीला का गेले?"; इराण-अमेरिका संघर्षात भारतानं फेकला 'हुकमी एक्का'; मोठ्या 'गेम"ची तयारी
Daily Top 2Weekly Top 5

बाबा आमटेंना भारतरत्न द्यायला हवं - नाना पाटेकर

By admin | Updated: August 23, 2014 15:08 IST

ज्येष्ठ समाजसेवक बाबा आमटे यांना भारतरत्न मिळायला हवं असं मत नाना पाटेकर यांनी एका मुलाखतीमध्ये व्यक्त केले आहे.

ऑनलाइन लोकमत

 मुंबई, दि. २३ - ज्येष्ठ समाजसेवक बाबा आमटे यांना भारतरत्न मिळायला हवं असं मत नाना पाटेकर यांनी एका मुलाखतीमध्ये व्यक्त केले आहे. डॉ. प्रकाश बाबा आमटे या चित्रपटामध्ये मुख्य भूमिकेत असलेल्या नानांनी बाबा आमटेंच्या कामाची स्तुती करताना प्रत्येकानं आपल्या परीनं अशा संस्था चालवण्यासाठी मदत करायला हवी असं सांगताना भारतरत्न पुरस्कारानं गौरवण्याइतकं बाबांचं काम थोर असल्याचं नमूद केलं.

या चित्रपटामध्ये मंदाकिनी आमटेंच्या भूमिकेत सोनाली कुलकर्णी असून तिनंही खूप चांगलं म्हणजे माझ्यापेक्षाही सरस काम केल्याचं कौतुक नानानं केलं आहे. बाबा आमटेंच्या संघर्षाच्या काळामध्ये निधी गोळा करण्यासाठी वेगवेगळे कार्यक्रम आयोजित केले जात असल्याचे सांगताना, नानाने नारायण राणेंचा एक वेगळाच किस्सा सांगितला.

आनंदवनासाठी राज्य सरकारकडून ६० लाख रुपये मिळण्याची अपेक्षा असून ते पैसे मिळत नसल्याचे नानानं राणे यांना सांगितलं होतं. मुख्यमंत्री असलेल्या नारायण राणे यांनी एका आठवड्यानं फोन करून ४० लाख पोचवल्याचं आणि चार दिवसांमध्ये उरलेले २० लाख पोचतील असा निरोप दिल्याची आठवण नानानं सांगितली. प्रकाश आमटेंवरील चित्रपट प्रदर्शनाच्या मार्गावर असून विकास आमटे यांच्यावरही चित्रपट निघावा अशी अपेक्षा नानानं व्यक्त केली आहे.