शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
2
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
3
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
4
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
5
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
6
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
7
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
8
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
9
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
10
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
11
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
12
अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? ४४ अंश तापमानाने घेतला जीव; ऑटोमध्ये आढळला मृतदेह
13
तुर्कीमधील शाळेत गोळीबार, ४ जणांचा मृत्यू, २० जखमी; दोन दिवसांतील दुसरी घटना
14
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शरीरसंबंध ठेवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
15
इराणच्या अणू हक्कासाठी रशियाची एन्ट्री! युरेनियम समृद्धीकरणाला पुतिन यांचा पाठिंबा; अमेरिकेचा दबाव झुगारला
16
अफगाणिस्तानात पुन्हा एकदा हाहाकार! तीन दिवसांत दुसऱ्यांदा बसले भूकंपाचे तीव्र धक्के, काबुलची धरती हादरली!
17
यवतमाळमध्ये कार ट्रकला धडकली, सहा महिन्यांच्या चिमुकलीसह वडिलांचा जागीच मृत्यू; आई गंभीर जखमी
18
CBSE 10th Result 2026: CBSE चा दहावीचा निकाल जाहीर; कुठे आणि कसा पाहायचा? वाचा...
19
'आमची मोहीम अजून संपलेली नाही'; इराणला मोसादचा थेट इशारा, इस्रायली गुप्तचर संस्थेच्या विधानाने खळबळ
20
Mamata Banerjee : दीदी संतापल्या! "हिंमत असेल तर रोज माझी कार तपासा"; ममता बॅनर्जींचं निवडणूक आयोगाला चॅलेंज
Daily Top 2Weekly Top 5

लेखकांच्या ‘पुरस्कार वापसी’चा सिलसिला सुरुच!

By admin | Updated: October 15, 2015 02:32 IST

देशातील दंडेलशाही आणि असहिष्णू वातावरणाविरुद्ध मंगळवारी साहित्यिका प्रज्ञा पवार यांनी आपले सर्व पुरस्कार सरकारकडे परत पाठवले. त्यानंतर बुधवारीही ‘पुरस्कार वापसी’चा सिलसिला सुरु राहिला

मुंबई : देशातील दंडेलशाही आणि असहिष्णू वातावरणाविरुद्ध मंगळवारी साहित्यिका प्रज्ञा पवार यांनी आपले सर्व पुरस्कार सरकारकडे परत पाठवले. त्यानंतर बुधवारीही ‘पुरस्कार वापसी’चा सिलसिला सुरु राहिला.लोकशाहीर संभाजी भगत, उर्मिला पवार, मुकुंद कुळे आणि लेखक इब्राहिम अफगाण यांनी सरकारकडे पुरस्कार परत पाठवले.साहित्यिका प्रज्ञा पवार यांनी मंगळवारी सर्व पुरस्कार सरकारकडे परत पाठवले. त्यापाठोपाठ इब्राहिम अफगाण यांनी साहित्य अकादमीचे दोन पुरस्कार आणि कुळे यांनी राज्य शासनाचे दोन पुरस्कार परत केले आहेत. तर सरकारवर असहिष्णुतेचा ठपका ठेवत लोकशाहीर संभाजी भगत यांनी ‘नागरिक’ चित्रपटासाठी मिळालेला सर्वोत्कृष्ट गीतकाराचा पुरस्कार परत करण्याचे ठरविले आहे. ज्येष्ठ साहित्यिका उर्मिला पवार यांनी यशवंत चव्हाण राज्य वाड्मय पुरस्कार परत करत असल्याचे जाहीर केले आहे.साहित्य अकादमीने २०१३ साली शायर निदा फाजली यांच्या ‘दिवारों के बीच’ या उर्दूतील आत्मचरित्रात्मक कादंबरीच्या ‘हाक’ या मराठी अनुवादासाठी इब्राहिम अफगाण यांना पुरस्कार दिला होता. हा पुरस्कार परत करत असल्याचे अफगाण यांनी जाहीर केले. देशातील असहिष्णू वातावरणाविरुद्ध कलाकार आणि लेखकांनी एकत्र आले पाहिजे, असेही ते म्हणाले. देश आणि राज्य पातळीवर होत असलेली अभिव्यक्ती, स्वातंत्र्याची गळचेपी, विचारवंताच्या हत्या आणि एकूणच इतिहासाची प्रतिगामी मांडणी या पार्श्वभूमीवर एक संवेदनशील व्यक्ती म्हणून निषेध व्यक्त करत पुरस्कार परत केल्याची भावना मुकुंद कुळे यांनी व्यक्त केली. पुरस्कार परत करणाऱ्या साहित्यिकांवर संघाची टीकानागपूर : पुरोगामी विचारवंतांची हत्या व दादरी येथील घटना तसेच देशातील वाढती असहिष्णुता यांचा निषेध व्यक्त करीत पुरस्कार परत करणाऱ्या साहित्यिकांवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने टीका करून मोदी सरकारचा बचाव करण्याचा प्रयत्न केला. साहित्यिक जाणूनबुजून असे पाऊल उचलत असून साहित्याच्या आडचे हे राजकारण असल्याचा आरोप संघातर्फे करण्यात आला आहे. या साहित्यिकांनी देशासोबतच साहित्यप्रेमींचा अपमान केला असल्याचे संघाकडून टीकास्त्र सोडण्यात आले आहे. बांगलादेशच्या साहित्यिक तस्लीमा नसरीन यांचे शीर आणून देणाऱ्याला बक्षिसाची घोषणा करण्यात आली, गोधरामध्ये निरपराध कारसेवकांना जिवंत जाळण्यात आले, यावेळी हे साहित्यिक कुठे गेले होते, असा प्रश्न संघाकडून करण्यात आला आहे.