शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

होर्डिंगवर चढून महिलेचा आत्महत्येचा प्रयत्न

By admin | Updated: May 29, 2014 03:23 IST

विलेपार्लेला राहणार्‍या सपना हिलरी परेरा (४०) या महिलेने भायखळा परिसरात उंचावर लागलेल्या जाहिरातीच्या होर्डिंगवर चढून आत्महत्येचा प्रयत्न केला.

मुंबई : विलेपार्लेला राहणार्‍या सपना हिलरी परेरा (४०) या महिलेने भायखळा परिसरात उंचावर लागलेल्या जाहिरातीच्या होर्डिंगवर चढून आत्महत्येचा प्रयत्न केला. जे़जे़ मार्ग पोलीस आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी सुमारे अर्धा-पाऊण तास विनवणी करून अखेर सपना यांना सुखरूप खाली उतरवले. हा प्रकार दुपारी दीड ते साडेतीन या वेळेत घडला. जे़जे़ मार्ग पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दुपारी दीडच्या सुमारास सपना खडा पारशी चौकातील एका उंच होर्डिंगवर चढल्या आणि आत्महत्येची धमकी देऊ लागल्या. हा प्रकार चौकातून जाणार्‍या वाहनचालक आणि पादचार्‍यांनी पाहिला आणि नियंत्रण कक्षाला फोन केला. त्यानुसार, जे़जे़ पोलीस ठाण्यातील पथक तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यात महिला अधिकार्‍यांचा सहभाग होता. सुरुवातीला या पथकाने सपना यांच्याकडे खाली उतरण्यासाठी विनवणी केली. मात्र, त्या ऐकण्याच्या मन:स्थितीत नव्हत्या. त्यांनी खाली उतरण्यास नकार दिल्याने पोलिसांनी अग्निशमन दलाला बोलावून घेतले. पुढे अग्निशमन दलाने क्रेन आणून सपना यांना खाली उतरवले. तोपर्यंत साडेतीन वाजले. या प्रकारामुळे खडा पारशी चौकात बघ्यांची गर्दी जमली. वाहनेही हा प्रकार पाहण्यासाठी थांबू लागली. त्यामुळे दोनेक तास या चौकातून मुंबई व उपनगरांकडे जाणारी वाहतूक मंदावली होती. घराशेजारील एका कुटुंबाकडून मानसिक त्रासाच्या तक्रारीतून सपना यांनी आत्महत्येचा प्रयत्न केल्याचे पोलिसांकडून समजते. तसेच त्यांनी याआधीही दोनेक वेळेस अशा प्रकारे आत्महत्येचा प्रयत्न केल्याचीही माहती जे़जे़ मार्ग पोलिसांना मिळाल्याचे समजते. (प्रतिनिधी)