शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
2
आजचे राशीभविष्य, १७ एप्रिल २०२६: फलदायी दिवस, मानसिक स्वास्थ्य लाभेल, मात्र मनावर संयम ठेवा
3
तीन विधेयकांवर वादळी चर्चा, पंतप्रधान मोदी म्हणाले, महिला आरक्षणाला राजकीय रंग देऊ नका
4
राज्यभर उष्णतेची लाट; पुढचे ४ दिवस महत्त्वाचे, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, कोकणाला इशारा
5
राज्यात दोन उद्योग समूहांची १.७५ लाख कोटींची गुंतवणूक, ११ हजारांहून अधिक रोजगारांच्या संधी
6
परतवाडा ‘व्हिडीओ कांड’ची व्याप्ती उच्चभ्रू वस्तीपर्यंत, अमरावतीत फ्लॅट ‘भाड्याने’ देत अनेक निष्पाप मुलींच्या अब्रूचा ‘तासिका’ बाजार!
7
गुप्तधनाचे आमिष दाखवून ११ लाखांची 'अघोरी' लूट! चार वर्षांनंतरही भोंदू बाबा अन् पोलिस पत्नी फरार
8
रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी किती येते? भाषा चाचणी सक्तीची
9
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
10
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
11
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
12
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
13
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
14
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
15
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
16
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
17
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
18
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
19
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
20
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
Daily Top 2Weekly Top 5

मज्जाव करणाऱ्या पोलिसांवर हल्ला

By admin | Updated: August 25, 2016 01:38 IST

महाविद्यालयात घुसून वाढदिवस साजरा करणाऱ्या तरुणांना मज्जाव केला, म्हणून त्यांनी थेट पोलिसांवरच हल्ला चढवला.

बारामती : येथील तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयात घुसून वाढदिवस साजरा करणाऱ्या तरुणांना मज्जाव केला, म्हणून त्यांनी थेट पोलिसांवरच हल्ला चढवला. यात ३ पोलीस जखमी झाले आहेत. १३ जणांसह अन्य १० ते १५ तरुणांवर जिवे मारण्याच्या प्रयत्नासह अन्य कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे. त्यापैकी ५ जण ताब्यात घेतले आहेत.मारहाणीत जखमी दोघांना ससून रुग्णालयात, तर एकास बारामतीच्या खासगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहेत. सागर देवकाते-पाटील या तरुणाला महाविद्यालयाच्या आवारात वाढदिवस साजरा करायचा होता. सुरक्षारक्षकाला धमकावून व मारहाण करून तरुण महाविद्यालयात जमले. हा प्रकार पोलिसांना कळविल्यानंतर ते तेथे आले. सागर देवकाते याच्या हातात तलवार होती. या वेळी काही मुले पोलीस वाहनाचे चालक सहायक फौजदार व्यवहारे यांच्याकडे गेले. त्यांना शिवीगाळ करून जोरात मारहाण केली. डोक्यावर खाली पाडून सर्वांनी हाताने लाथाबुक्क्यांनी मारहाण केली, तर देवकाते याने सिमेंटचा पेव्हर ब्लॉक उचलून व्यवहारे यांच्या डोक्यात मारला. या वेळी सुदैवाने व्यवहारे यांनी डोके बाजूला घेतल्याने तो हुकला. त्यानंतरदेखील त्या सर्वांनी व्यवहारे यांच्या छातीवर, डोक्यावर लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच, पोलिसांची सरकारी गाडी (एमएच १२/आरआर ३८४) दगड मारून नुकसान केले. भरदिवसा बारामतीसारख्या शहरामध्ये हा प्रकार घडल्याने एकच खळबळ उडाली. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी तातडीने घटनास्थळाकडे धाव घेतली. तरुणांच्या हल्ल्यात पोलीस कर्मचारी राजेश साहेबराव गायकवाड, व्ही. एस. वाघमोडे, सहायक पोलीस फौजदार अर्जुन व्यवहारे जखमी झाले आहेत. गायकवाड यांनी स्वत: फिर्याद दिली आहे. त्यानुसार, सागर देवकाते पाटील (रा. नीरावागज), महेश बापूराव जाधव (रा. मळद, ता. बारामती), स्वप्निल सुरेश देवकाते (रा. नीरावागज, ता. बारामती), राजन बळवंत शिंदे (रा. कसबा, बारामती), रोहित तानाजी मदने (रा. मळद, ता. बारामती), तुषार राजेंद्र वाडिले (रा. म्हाडा कॉलनी, ता. बारामती), तेजस देवकाते, योगेश सूळ, बापू खराडे, समीर देवकाते, अनिकेत देवकाते, अमोल पोपटराव देवकाते, सुनील सोनवलकर (रा. नीरावागज, ता. बारामती) या १३ जणांसह त्यांचे इतर १० ते १५ साथीदार (नाव, पत्ता माहीत नाही) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (प्रतिनिधी)> अचानक हल्ल्याने गोंधळपोलिसांवर अचानक या तरुणांच्या जमावाने हल्ला चढविल्यानंतर एकच गोंधळ उडाला. त्यामुळे सुरक्षारक्षक व कॉलेजचे इतर कर्मचारी त्या ठिकाणी पोहोचले. या गोंधळातच सर्व आरोपी पळून गेले. मात्र, एकाला ताब्यात घेतले. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे अन्य आरोपींची ओळख पटली. त्यानुसार इतर पाच जणांना ताब्यात घेतले.