अल्पवयीन मुलींवर अत्याचार

By Admin | Updated: June 13, 2015 02:25 IST2015-06-13T02:25:21+5:302015-06-13T02:25:21+5:30

रायगड जिल्हा परिषदेच्या महड येथील शाळेतील शिक्षक ईश्वर कांबळे याने शाळेमधील मुलींशी अश्लील चाळे केल्याचे प्रकरण ताजे असतानाच

Atrocities on minor girls | अल्पवयीन मुलींवर अत्याचार

अल्पवयीन मुलींवर अत्याचार

खालापूर : रायगड जिल्हा परिषदेच्या महड येथील शाळेतील शिक्षक ईश्वर कांबळे याने शाळेमधील मुलींशी अश्लील चाळे केल्याचे प्रकरण ताजे असतानाच रसायनी पाताळगंगा परिसरातील चांभार्ली गावातील शांतिनिकेतन आश्रमातील संचालकांपैकी दोघांनी अजाण मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याचा प्रकार उघड झालेला आहे. या प्रकरणी या आश्रमातील संचालक ख्रिस्तियन राजेंद्रन, जॉय राजेंद्रन व सलोमी राजेंद्रन यांना अटक करण्यात आली आहे.
काही महिन्यांपूर्वी आश्रम व वसतिगृहातील वातावरण आणि त्या ठिकाणच्या समस्यासंबंधीच्या समुपदेशनाचा कार्यक्रम आयोजित केला असताना काही मुलींनी आपल्यावर होत असलेल्या अत्याचाराबाबत तक्रारी केल्या होत्या. त्यावेळी उपस्थित शिक्षिकेने बालकल्याण समितीशी संपर्क साधून संबंधित मुलींचे जाबजबाब नोंदवून घेत वैद्यकीय तपासणी केली असता या संदर्भातले गांभीर्य लक्षात आले. पीडितांपैकी काही मुली तसेच मुलांना बोलते करण्यासाठी मानसोपचार तज्ज्ञांची मदत घ्यावी लागली. त्यानंतर २९ एप्रिल रोजी बालकल्याण समितीने तत्काळ रसायनी पोलीस ठाण्यामध्ये तक्रार केली. या तक्रारीकडे दुर्लक्ष झाल्याने अखेर तक्रारदार बालकल्याण समितीने मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केली. याची दखल घेत रायगड पोलीस अधीक्षकांनी कारवाईचे आदेश दिले असून तीन आरोपींना ताब्यात घेऊन त्यांच्यावर बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केलेला आहे. पीडितांची संख्या वाढण्याची शक्यता पोलीस सूत्रांकडून वर्तवली जात आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Atrocities on minor girls