शहरं
Join us  
Trending Stories
1
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
2
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
3
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
4
निवडणुकीसाठी विक्रमी खर्च; ग्रामीण अर्थव्यवस्थेला बूस्ट; १.३५ लाख कोटींची उलाढाल
5
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
6
ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे
7
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?
8
नसीम खान यांची नाराजी काँग्रेसने कशी दूर केली?
9
राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगच्या उपकंपनीसाठी नागपूर महानगरपालिका मेहेरबान
10
नोकऱ्या देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचे हात आखडते; २०२३ मध्ये केवळ एका स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा
11
२ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी
12
वाळू माफियांनी एएसआयला चिरडले; अंगावर टॅक्टर घातल्याने झाला मृत्यू 
13
मुलाच्या ‘बर्थ डे’साठी घरी निघाला होता शहीद जवान; मृत्यूचा बदला घेण्यासाठी दहशतवाद्यांचा कसून शोध सुरू
14
सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा
15
कुस्तीपटू बजरंग पुनियावर निलंबनाची कारवाई; ‘नाडा’ने अंधारात ठेवल्याचा कुस्ती महासंघाचा आरोप
16
भारत पाकिस्तानविरुद्ध ६ ऑक्टोबरला भिडणार
17
तंत्रज्ञानाचा वापर खेळासाठी चांगला; भारताच्या पहिल्या महिला कसोटी पंचाचे मत
18
विक्रमी धावसंख्येसह कोलकाता विजयी; नरेनचा निर्णायक अष्टपैलू खेळ; लखनौचा ९८ धावांनी उडवला धुव्वा 
19
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
20
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा

ईडीनं पुन्हा उघडली 'आदर्श'ची फाईल; शपथविधीआधी अशोक चव्हाणांना धक्का

By ऑनलाइन लोकमत | Published: November 28, 2019 11:21 AM

आदर्श सोसायटी प्रकरणाची ईडीकडून चौकशी सुरू

मुंबई: भाजपाला दूर ठेवण्यासाठी राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस एकत्र आले. या तीन पक्षांनी महाराष्ट्र विकास आघाडी स्थापन करत भाजपाला जोरदार दणका दिला. मात्र आता केंद्र सरकारनं राज्यात स्थापन होणाऱ्या सरकारला पहिला धक्का दिला आहे. अंमलबजावणी संचलनालयानं (ईडी) आदर्श सोसायटी घोटाळ्याची चौकशी पुन्हा एकदा सुरू केली आहे. आदर्श प्रकरणात नाव आल्यानं काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांचं मुख्यमंत्रीपद गेलं होतं. आता अशोक चव्हाण महाराष्ट्र विकास आघाडीच्या मंत्रिमंडळात सहभागी होणार असल्याची दाट शक्यता असताना ईडीनं आदर्श प्रकरणाची फाईल उघडली आहे. शिवसेना पक्षप्रमख उद्धव ठाकरे आज मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतील. त्याचवेळी अशोक चव्हाणदेखील मंत्रिपदाची शपथ घेण्याची दाट शक्यता आहे. मात्र त्याआधीच ईडीनं आदर्श सोसायटी प्रकरणाची चौकशी पुन्हा सुरू केली आहे. याच प्रकरणामुळे त्यांना मुख्यमंत्रीपद सोडावं लागलं. या प्रकरणात चव्हाणांविरोधीत खटला चालवण्याची परवानगी राज्यपालांनी दिली होती. मात्र न्यायालयानं त्यांचा आदेश रद्दबातल ठरवला होता.  दक्षिण मुंबईच्या कुलाब्यात युद्धातील शहीद जवानांच्या कुटुंबियांसाठी आदर्श इमारत उभी करण्यात आली. मात्र या इमारतीत अनेक नोकरशहा आणि संरक्षण अधिकाऱ्यांना घरं देण्यात आली. या प्रकरणात सीबीआयनं चौकशी सुरू केल्यानंतर त्यात अशोक चव्हाण यांचं नाव पुढे आलं. त्यामुळे त्यांच्यावर राजीनामा देण्याची नामुष्की ओढवली. या प्रकरणात चव्हाण यांच्यासोबतच अनेक वरिष्ठ नेत्यांची नावंदेखील पुढे आली होती.  

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Ashok Chavanअशोक चव्हाणEnforcement Directorateअंमलबजावणी संचालनालयAdarsh Scamआदर्श घोटाळाcongressकाँग्रेस