‘आशाताई म्हणाल्या, मराठवाड्यातील रसिकांना प्रणाम...’

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2026 11:05 IST2026-04-13T11:04:40+5:302026-04-13T11:05:01+5:30

Asha Bhosle: छत्रपती संभाजीनगर येथील  कलासागर संस्थेच्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त २०१६ मध्ये छत्रपती संभाजीनगरात आशा भोसले लाईव्ह कॉन्सर्ट आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी त्यांचे वय ८२ वर्षांचे होते. त्यांच्या चिरतरुण, चतुरस्त्र स्वरांनी सर्वांना मोहिनी घातली होती. 

‘Ashatai said, ‘Salute to the fans of Marathwada...’ | ‘आशाताई म्हणाल्या, मराठवाड्यातील रसिकांना प्रणाम...’

‘आशाताई म्हणाल्या, मराठवाड्यातील रसिकांना प्रणाम...’

छत्रपती संभाजीनगर : येथील  कलासागर संस्थेच्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त २०१६ मध्ये छत्रपती संभाजीनगरात आशा भोसले लाईव्ह कॉन्सर्ट आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी त्यांचे वय ८२ वर्षांचे होते. त्यांच्या चिरतरुण, चतुरस्त्र स्वरांनी सर्वांना मोहिनी घातली होती. 

पांढऱ्या रंगातील, साडी परिधान करुन आशाजी रंगमंचावर आल्या तेव्हा छत्रपती संभाजीनगरकरांच्या प्रेमाने, आदरातिथ्याने त्या भारावून गेल्या होत्या. नी, ‘काय बोलू मी...? कधी कधी बोलण्यासाठी शब्द नसतात... मराठवाड्यातील रसिकांना माझा प्रणाम...’ असे म्हणत ‘हावडा ब्रिज’ चित्रपटातील ‘आइये मेहरबाँ, बैठिये जाने जाँ’ हे गाणे गातच लाईव्ह कॉन्सर्टला सुरुवात केली.

आशाताईंची ‘लोकमत’ला सदिच्छा भेट : लाईव्ह कॉन्सर्टच्या पूर्वसंध्येला आशाताईंनी ‘लोकमत’ कार्यालयाला सदिच्छा भेट दिली होती. त्यावेळेस मनमोकळ्या गप्पांची मैफल जमली होती. मैफलीत ‘लोकमत’चे एडिटर इन चिफ राजेंद्र दर्डा यांनी त्यांच्या लंडनमधील वास्तव्यावर आधारित ‘झुंबर’ या पुस्तकाची इंग्रजी आवृत्ती ‘व्हायब्रण्ट व्हिग्रेट्स’ आशाताईंना भेट दिली. या क्षणाचे साक्षीदार करण दर्डा ठरले. 

‘कलासागर’ कॉफी टेबल बुकचे प्रकाशन
कलासागर संस्थेच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त ‘कॉफी टेबल बुक’चे प्रकाशन खुद्द आशा भोसले यांच्या हस्ते करण्यात आले होते. यावेळी आशाताईंसोबत अभिनेता-गायक सचिन पिळगावकर, लोकमतचे सहव्यवस्थापकीय संचालक ऋषी दर्डा, तत्कालीन केंद्रीय गृहराज्यमंत्री किरण रिजिजू, कलासागरच्या संस्थापक अध्यक्षा आशू दर्डा, तत्कालीन अध्यक्ष अनिल भंडारी, लोकमतचे कार्यकारी संचालक 
करण दर्डा, कलासागरचे तत्कालीन सचिव संदेश झांबड यांची उपस्थिती होती. छत्रपती संभाजीनगरातील 
दर्दी रसिकांसाठी कार्यक्रम अविस्मरणीय ठरला.

Web Title : आशा भोसले ने लाइव कॉन्सर्ट और लोकमत भेंट से औरंगाबाद को मोहित किया।

Web Summary : आशा भोसले के 2016 के औरंगाबाद संगीत कार्यक्रम ने प्रशंसकों को मंत्रमुग्ध कर दिया। उन्होंने लोकमत का दौरा किया, एक पुस्तक प्राप्त की और कलासागर की रजत जयंती के दौरान 'कॉफी टेबल बुक' लॉन्च की।

Web Title : Asha Bhosle mesmerizes Aurangabad audience with live concert, Lokmat visit.

Web Summary : Asha Bhosle's 2016 Aurangabad concert charmed fans. She visited Lokmat, received a book, and launched a 'Coffee Table Book' during Kalasagar's silver jubilee.