शहरं
Join us  
Trending Stories
1
"मला पक्षात पद..."; उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होण्याच्या चर्चांवर आदित्य ठाकरेंची सूचक पोस्ट
2
कधी राहुल गांधी, कधी खर्गे, आता सिद्धरामय्या! काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांच्या कानात काय बोलले मोदी? 'तो' फोटो देशभर व्हायरल!
3
पाकिस्ताननं पाठवले १३००० सैनिक; आता सौदीने दिले ३ अब्ज डॉलर, एका सैनिकाची किंमत किती?
4
Latest Marathi News LIVE Updates: अश्लील व्हिडीओ प्रकरणातील आरोपी अयानला दणका, घरावर बुलडोझर
5
IPL 2026: MS Dhoni च्या चाहत्यांची धाकधूक वाढली... १६ एप्रिलला 'थाला' मोठा निर्णय घेणार!
6
"उबाठा गट ताब्यात घेण्याचे संजय राऊतांचे प्रयत्न, आदित्य ठाकरेंशी 'सामना"; भाजपा नेत्याचा दावा
7
होर्मुझ तणावात पुतिन यांचा मास्टरस्ट्रोक! इराणी युद्धावर चीनमध्ये बनणार 'गेमप्लॅन'; अमेरिकेला शह?
8
२०२६चा पहिला गुरुपुष्यामृत योग कधी? ‘इतके’ तास आहे शुभ मुहूर्त; पाहा, महत्त्व अन् मान्यता
9
खळबळजनक! ओडिशातील सरकारी शाळेत अन्नातून विषबाधा; १०० विद्यार्थी आजारी, एकाचा मृत्यू
10
कानपूर किडनी रॅकेटचा असा झाला पर्दाफाश, गर्लफ्रेंडची एक चूक नडली अन् पकडला गेला गुन्हेगार!
11
Video - इन्स्टा रीलमुळे वाचला जीव; बोट दुर्घटनेवेळी मृत्यूशी झुंज, महिलेने सांगितला थरारक प्रसंग
12
Travel: ओमानमध्ये भारताचे १० हजार रूपये घेऊन जाताय; इतक्या पैशात काय काय खरेदी करू शकाल?
13
युक्रेनच्या रोबो आर्मीने केली कमाल, रशियन सैनिकांना सरेंडर करण्यास भाग पाडून पोस्टवर केला कब्जा
14
अक्षय्य तृतीयेपूर्वी २९३८ रुपयांनी महागलं सोनं, चांदीच्या दरातही १३ हजारांपेक्षा अधिक तेजी; पाहा नवे दर
15
'आप'ने राघव चड्ढांवर केली आणखी एक कारवाई; पंजाब सरकारने Z+' सुरक्षा काढून घेतली
16
“आयुष्यभराची इच्छा पूर्ण झाली”; कर्नाटकातील १४ काँग्रेस आमदार अयोध्येत, घेतले रामदर्शन
17
“उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांसोबत केले, तेच आदित्य करताहेत”; शिंदेंच्या नेत्यांनी इतिहास काढला
18
शांतीदूत बनायला गेला अन् स्वत:च तोंडावर पडला; अमेरिकेने पाकिस्ताची दोन जहाजे होर्मुझमधून हाकलली!
19
​परतवाडा अश्लील व्हिडिओ कांड : तपासासाठी ४७ जणांची एसआयटी मैदानात; आरोपींची संख्या वाढणार 
20
₹६०८ कोटींची ऑर्डर मिळताच सुस्साट पळाला 'हा' शेअर; जोरदार तेजी, तुमच्याकडे आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

Asha Bhosle: प्रवृत्ती निवृत्तीचा सुरेल संगम..!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2026 10:55 IST

Asha Bhosle: अगदी लहानपणीचं आठवायचं झालं, तर सगळ्यांत अगोदर मला आशाबाईंची नाट्यगीतं आठवतात. ‘शूरा मी वंदिले...’, ‘चंद्रिका ही जणू...’, ‘विलोपले मधु मिलनात...’ ही गाणी आठवतात व भावतात देखील. खरं म्हणजे, त्यावेळी माझं वय लहान... संगीताचा अभ्यास नव्हता... पण का कुणास ठाऊक ही गाणी आठवतात.

- मोहन भागवत(सरसंघचालक)अगदी लहानपणीचं आठवायचं झालं, तर सगळ्यांत अगोदर मला आशाबाईंची नाट्यगीतं आठवतात. ‘शूरा मी वंदिले...’, ‘चंद्रिका ही जणू...’, ‘विलोपले मधु मिलनात...’ ही गाणी आठवतात व भावतात देखील. खरं म्हणजे, त्यावेळी माझं वय लहान... संगीताचा अभ्यास नव्हता... पण का कुणास ठाऊक ही गाणी आठवतात. त्यानंतर खूप गाणी ऐकली.एखाद्या दीड तासाच्या भाषणाचा आशय, तीन मिनिटांच्या गाण्यात अगदी नेमक्या गायकीमुळे, गीतातील शब्द, अर्थ आणि भावासकट समोर उभा ठाकतो. आशाबाईनी अशी अनेक गाणी गायलेली आहेत. त्यांच्या कार्यक्रमात गाण्याच्या प्रस्तावनेतून जेव्हा त्या पार्श्वभूमी विषद करायच्या, तेव्हा त्यांची सावरकरभक्ती आणि देशप्रेम सहज कळायचे. ‘उष:काल होता होता...’ हे गाणं ऐकताना आणि त्यामागचे आशाबाईंचे विचार ऐकताना आपण आजही भारावून जातो. ही बाब समर्थपणे सामान्य माणसांपर्यंत पोहोचविण्याची किमया आशाबाईंना सध्या झाली हाेती.

आशाबाईंचं प्रवृत्ती अंगाने जाणारं, कधी खळखळाट करणारं, कधी शांत-संयमी, तर कधी विविध भावनांचा परिपोष करणारं गाणं, माणसांच्या चित्तवृत्ती उल्हसित करत त्यांना खेळवत खेळवत, बकवून विरामाकडे नेतं. उदाहरणार्थ, ‘जिवलगा...!’ गंभीरता तीच... सागराची.... पण गाण्याचे स्वर, व्याकुळता, आतून आलेला सच्चा आवाज, या मार्गाने प्रवृत्ती अंगाने जाऊन निवृत्तीचा आनंद देणारं गाणं होतं, आशाबाईंचं!!     ('सरस्वामिनी आशा' पुस्तकातून साभार)

English
हिंदी सारांश
Web Title : Asha Bhosle: A Melodious Blend of Engagement and Detachment!

Web Summary : Mohan Bhagwat recalls Asha Bhosle's impactful songs, highlighting her ability to convey deep meaning and patriotism. Her music, ranging from playful to profound, touches hearts, offering a unique blend of worldly engagement and spiritual peace, exemplified in songs like 'Jivalaga'.
टॅग्स :Asha Bhosaleआशा भोसलेMohan Bhagwatमोहन भागवत