मराठवाड्यात कृत्रिम पाऊस

By Admin | Updated: July 23, 2015 01:02 IST2015-07-23T01:02:59+5:302015-07-23T01:02:59+5:30

पावसाने पाठ फिरविलेल्या मराठवाड्यातील दुष्काळावर मात करण्यासाठी आॅगस्टच्या पहिल्या आठवड्यात कृत्रिम पाऊस पाडण्यात येणार आहे

Artificial rain in Marathwada | मराठवाड्यात कृत्रिम पाऊस

मराठवाड्यात कृत्रिम पाऊस

औरंगाबाद : पावसाने पाठ फिरविलेल्या मराठवाड्यातील दुष्काळावर मात करण्यासाठी आॅगस्टच्या पहिल्या आठवड्यात कृत्रिम पाऊस पाडण्यात येणार आहे. अमेरिकेच्या विमानांच्या मदतीने तीन महिने हा प्रयोग करण्यात येईल. त्यासाठी २७ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.
पश्चिम महाराष्ट्रात २००९ मध्ये कृत्रिम पावसाचा प्रयोग करण्यात आला होता. आपत्कालीन विभाग, मदत व पुनर्वसन विभागाचे संचालक सुहास दिवसे व भारतीय हवामान विभागाचे शास्त्रज्ञ आर. व्ही. शर्मा बुधवारी येथे दाखल झाले. त्यांनी ‘सी बॅण्ड डॉप्लर’ रडारसाठी नियंत्रण कक्ष स्थापण्याच्या दृष्टीने पाहणी सुरू केली. अमेरिकेतील वेदर मॉडिफिकेशन लि. कंपनीला कृत्रिम पाऊस पाडण्यासाठी कं त्राट दिले आहे.
कृत्रिम पावसासाठी वापरण्यात येणारे विमान कोल्हापूरात आहे. नियंत्रण कक्षाची स्थापना झाल्यावर ते औरंगाबादला येईल. दिवसातून तीन वेळा ढगांचा अभ्यास केला जाईल. लातूर, परभणी, नांदेड, अकोला येथील विमानतळ धावपट्टीदेखील वापरली जाऊ शकते. (प्रतिनिधी)

Web Title: Artificial rain in Marathwada