शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

बालिकांवर लैंगिक अत्याचार करणाऱ्यास अटक

By admin | Updated: November 1, 2015 01:58 IST

खाऊचे आमिष दाखवून आठ वर्षांच्या दोन बालिकावर लैंगिक अत्याचार करणाऱ्या एका नराधमाला अंबोली पोलिसांनी गजाआड केले. शहजाद अमिरुद्दिन अन्सारी (वय ४०) असे त्याचे नाव असून

- अंबोलीतील घटना

मुंबई: खाऊचे आमिष दाखवून आठ वर्षांच्या दोन बालिकावर लैंगिक अत्याचार करणाऱ्या एका नराधमाला अंबोली पोलिसांनी गजाआड केले. शहजाद अमिरुद्दिन अन्सारी (वय ४०) असे त्याचे नाव असून, त्याच्यावर यापूर्वी अशा प्रकारचे सहा गुन्हे दाखल असल्याचे पोलिसांनी सांगितले. अंबोली परिसरातील एका शाळेत तिसरीच्या वर्गात शिकत असलेल्या चिनू व मीनू (बदललेली नावे) एकाच इमारतीत राहतात. गुरुवारी रात्री त्या राहत्या इमारतीबाहेरील परिसरात खेळत होत्या. त्यावेळी शहजादची त्यांच्यावर नजर पडली. त्यांना चॉकलेट व आइस्क्रीम देण्याचे आमिष दाखवून आपल्यासोबत येण्यास सांगितले. त्यांनी नकार देताच, त्याने दोघींना मारण्याची धमकी देत, बळजबरीने इमारतीच्या पाचव्या आणि सहाव्या मजल्यावरील रिकाम्या पॅसेजमध्ये नेले. तेथे त्यांच्यावर लैंगिक अत्याचार केले. चिनूने त्याच्या तावडीतून पळ काढीत घरी जाऊन आईला हा प्रकार सांगितला. तिचे पालक व शेजाऱ्यांनी तातडीने जिन्याकडे धाव घेतली. मात्र, तोपर्यंत मिनूवर लैंगिक अत्याचार करून त्याने पलायन केले होते. याबाबत दोघींच्या पालकांनी पोलिसांकडे जाऊन तक्रार दिली. त्यांनी सांगितलेल्या वर्णनानुसार, शुक्रवारी शहजाद अन्सारीला पोलिसांनी अटक केली. त्याच्यावर बालक अत्याचार प्रतिबंधक (पास्को) कलम लावण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. (प्रतिनिधी)