शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

सिंचन गैरव्यवहारात अटकसत्र सुरूच

By admin | Updated: September 4, 2015 01:25 IST

पेणमधील बाळगंगा सिंचन गैरव्यवहारात ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) गुरुवारी आणखी तिघांना अटक केली. त्यामुळे या घोटाळ्यात अटक केलेल्यांची संख्या पाच झाली आहे.

ठाणे : पेणमधील बाळगंगा सिंचन गैरव्यवहारात ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) गुरुवारी आणखी तिघांना अटक केली. त्यामुळे या घोटाळ्यात अटक केलेल्यांची संख्या पाच झाली आहे. यात गुन्हा दाखल झालेल्या काही अधिकाऱ्यांनी केलेल्या विमानप्रवासाचा खर्च कंत्राटदार निसार खत्रीच्या बँक खात्यातून अदा केल्याचे उघडकीस आले आहे. बाळगंगा प्रकल्प गैरव्यवहारप्रकरणी कोपरी पोलीस ठाण्यात ११ जणांविरोधात गुन्हा दाखल झाल्यावर कंत्राटदार खत्री आणि तत्कालीन अभियंता अधिकारी रिठे यांना पोलिसांनी यापूर्वीच अटक केली आहे. तर आता १० दिवसांनी गुरुवारी दुपारी मुंबईतून कोकण पाटबंधारे विभागाचा तत्कालीन शाखा अभियंता विजय कासट याच्यासह एफ.ए. एंटरप्रायजेसचे भागीदार अबीद फतेह मोहम्मद खत्री, जाहीद फतेह मोहम्मद खत्री यांना अटक करण्यात आली. त्यांना शुक्रवारी न्यायालयासमोर हजर करण्यात येणार आहे.निसार खत्री याच्या घरझडतीमध्ये सापडलेल्या कागदपत्रांची एसीबीने छाननी केली असता निसारने २०१२मध्ये स्टॅम्पपेपर खरेदी करून त्यावर २००६च्या कालावधीतील करारपत्र केल्याचे निष्पन्न झाले आहे. तसेच ओशिवरा, मजास व्हिलेज, जोगेश्वरी मुंबईतील रहेजा बिल्डर्सच्या आयरीश पार्कमध्ये जुलेका खत्री, हाशमी आणि हरून खत्री यांच्या नावे ए-१६१, हरून फते मोहम्मद खत्रीच्या नावे ए-१६३ तर हरून आणि जुलेका यांच्या नावे ए-१६४ असे फ्लॅट्स असून, त्यांची मर्सिडीज कार मिळून आली आहे. त्याचबरोबर वांद्रे बॅण्डस्टॅण्ड येथील आयडेंटिटी बिल्डिंगच्या तिसऱ्या व चौथ्या मजल्यावर प्रत्येकी १६०० चौ. फुटांचे दोन फ्लॅट आता खत्री आणि तालीफ खत्री यांच्या नावावर आहेत. तसेच निसार व त्यांच्या कुटुंबीयांच्या मालकीची आणखी काही वाहनेही असून, ती भिवंडी व विरार येथील पत्त्यांवर नोंदणी केल्याचे तपासात समोर आले आहे.जलसंपदा विभागातील काही अधिकाऱ्यांनी वेगवेगळ्या ट्रॅव्हल्स कंपन्यांमार्फत विमानप्रवास केला आहे. तसेच या प्रवासांचा खर्च निसारच्या बँक खात्यातून अदा झाल्याची माहिती लाचलुचपत विभागाने दिली.१४ दिवसांची रिठे आणि खत्रीला न्यायालयीन कोठडीराजेश रिठे आणि निसार खत्री या दोघांना अतिरिक्त सत्र न्यायाधीश व्ही.व्ही. बांबर्डे यांनी १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. या सुनावणीदरम्यान रिठेला चक्कर आल्याने तातडीने ठाणे जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले.या गैरव्यवहारप्रकरणी २५ आॅगस्ट रोजी ठाण्यातील कोपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यावर रिठे आणि खत्री या दोघांना अटक केली होती. खत्रीची तब्येत अचानक बिघडल्याने त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले.