सेनेचे मंत्री करणार मराठवाड्याचा दौरा

By Admin | Updated: August 24, 2016 05:51 IST2016-08-24T05:51:33+5:302016-08-24T05:51:33+5:30

दुष्काळ निवारणाच्या कामांची पाहणी करण्यासाठी शिवसेनामंत्री, खासदार, आमदार आणि पदाधिकारी १ ते ३ सप्टेंबर दरम्यान मराठवाड्याच्या पाहणी दौऱ्यावर जाणार आहेत

Army minister to visit Marathwada | सेनेचे मंत्री करणार मराठवाड्याचा दौरा

सेनेचे मंत्री करणार मराठवाड्याचा दौरा


मुंबई : दुष्काळ निवारणाच्या कामांची पाहणी करण्यासाठी शिवसेनामंत्री, खासदार, आमदार आणि पदाधिकारी १ ते ३ सप्टेंबर दरम्यान मराठवाड्याच्या पाहणी दौऱ्यावर जाणार आहेत.
शिवजलक्रांती योजनेतील कामांची सद्यस्थिती व तयार झालेल्या साठवण बंधाऱ्यांमधील उपलब्ध पाणीसाठी, दुष्काळ निवारणासाठी शिवसेनेच्या सूचनांच्या अंमलबजावणीबाबत शासन यंत्रणांकडून आढावा घेण्याच्या उद्देशाने पाहणी दौरा आयोजित करण्यात आल्याचे शिवसेनेने प्रसिद्धी पत्रकात नमूद केले आहे. यातून मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने अहवाल तयार करून जिल्ह्याच्या ठिकाणी पत्रकार परिषद घेऊन दौऱ्याची सांगता होईल, असेही सांगण्यात आले आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Army minister to visit Marathwada