शहरं
Join us  
Trending Stories
1
अमराठी रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य कशी करावी?; महत्त्वपूर्ण बैठकीत आज होणार मंथन
2
‘मिसिंग लिंक’ मार्गावर कार, बसलाच एंट्री, टोलवाढ नाही; मुंबई-पुणे अंतर ६ किमीने कमी
3
आजचे राशीभविष्य - २७ एप्रिल २०२६, वडील व वडीलधार्‍यांकडून लाभ होईल, समाजात मान-प्रतिष्ठा वाढेल
4
एमआयडीसी मुख्यालय निविदेला पाचवी मुदतवाढ; ‘रतन टाटा उद्योग भवन’ प्रकल्पाला मिळणार वेग
5
कुजबुज! सत्ता नसूनही ठाकरेंची तारेवरची कसरत; गायकवाडांवरही होऊ शकते पुस्तक
6
मेट्रो ६ मार्गासाठी पश्चिम रेल्वेवर ४२ मीटर स्टील स्पॅनची उभारणी; काय आहेत वैशिष्ट्ये?
7
‘रेलवन’वर बुकिंग फसले अन् वॉलेटमध्येच रक्कम अडकली; प्रवासी नाराज, पैसे परत देण्याची मागणी
8
२२ वर्षीय मुलीची क्रूर हत्या, अवघ्या ५ दिवसांत गुन्ह्याचा छडा; आरोपीला ठाण्यातून केली अटक
9
मुंबईकरांनो, तुम्ही रामभरोसे बाहेरचे पदार्थ खाताय..! महाराष्ट्रात एफडीए इन्स्पेक्टरची वाणवा
10
‘त्यांना’ मराठीची परीक्षा देऊन पदवी घ्यायची नाही; परिवहन मंत्र्यांनी मांडली स्पष्ट भूमिका
11
तुम्ही रिक्षा-टॅक्सीवाल्यांची उपजीविका नष्ट करताय; मराठी सक्तीला शशांक राव यांचा आक्षेप
12
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
13
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
14
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
15
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
16
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
17
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
18
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
19
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
20
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
Daily Top 2Weekly Top 5

हिवाळी अधिवेशनात पॅकेजची घोषणा

By admin | Updated: December 3, 2014 00:41 IST

राज्यातील १९०४९ गावांची पैसेवारी ५० पैशापेक्षा कमी आहे. केंद्राकडून मदत मिळण्याची अपेक्षा आहे. राज्य सरकारही दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या पाठिशी उभे आहे. विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात

मुनगंटीवार यांची ग्वाही : शेतकऱ्यांना मदत करणारनागपूर : राज्यातील १९०४९ गावांची पैसेवारी ५० पैशापेक्षा कमी आहे. केंद्राकडून मदत मिळण्याची अपेक्षा आहे. राज्य सरकारही दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या पाठिशी उभे आहे. विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात पॅकेजची घोषणा करू, अशी ग्वाही वित्त, नियोजन व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मंगळवारी दिली. टिळक पत्रकार भवनतर्फे आयोजित ‘मिट द पे्रस’ कार्यक्र मात ते बोलत होते.शेतकऱ्यांना तात्काळ मदत करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूल मंत्री एकनाथ खडसे व ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी सर्व विभागाकडून माहिती घेतली आहे. परंतु त्यांना थोडा धीर धरावा लागेल. जनताभिमुख सरकार ही आमची संकल्पना आहे. निवडणुकीत मतदारांनी जनादेश भाजपच्या बाजुने दिला. अपूर्णांकातून पूर्णांकात जाण्याचा प्रयत्न आहे. ३ लाख ४४४ हजार कोटींचे कर्ज राज्याच्या डोक्यावर आहे. २३ हजार कोटी त्यावरील व्याजापोटी जातात. पैसे नसले तरी आत्मविश्वास आहे. निवडणुकीत जनतेला दिलेली आश्वासने पूर्ण करू, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.सर्व विभागांना मार्च महिन्यात खर्चाची वाईट सवय लागली आहे. परंतु आता या महिन्यात १५ टक्केहून अधिक खर्च करता येणार नाही. १२५० योजनांचे आजवर नियोजनच झालेले नाही. या योजना लोकांसाठी फायद्याच्या कशा आहेत. हे पटवून द्यावे लागेल. असेही त्यांनी स्पष्ट केले. यावेळी माजी महापौर अर्चना डेहनकर, श्रीकांत देशपांडे, पत्रकार भवन ट्रस्टचे अध्यक्ष प्रदीप मैत्र व सचिव अनुपम सोनी आदी उपस्थित होते.(प्रतिनिधी)केळकर समितीचा अहवाल मांडणारहिवाळी अधिवेशनात केळकर समितीचा अहवाल मांडला जाईल. सिंचन प्रकल्पासंदर्भात आरोप आहेत. यात जो दोषी कोणी असेल त्यांच्या विरोधात कायदा आपले काम करेल. मात्र काही कायद्यात बदल करण्याचा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले.सेना-भाजपने एकत्र यावेराज्यात भाजपचे बहुमत असले तरी शिवसेनेसोबत राज्य चालविण्याची आमची इच्छा आहे. शिवसेना-भाजप एकत्र येऊन सेना लवकरच सत्तेत सहभागी होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.