शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

चमणकर यांच्या संपत्तीवर टाच

By admin | Updated: September 3, 2015 01:46 IST

महाराष्ट्र सदन घोटाळाप्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) बुधवारी मुंबईतील चमणकर एंटरप्रायजेसच्या १७.३५ कोटींच्या संपत्तीवर टाच आणली आहे. यात फार्महाऊस, पाच फ्लॅट आणि मुदत ठेवींचा समावेश आहे

मुंबई : महाराष्ट्र सदन घोटाळाप्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) बुधवारी मुंबईतील चमणकर एंटरप्रायजेसच्या १७.३५ कोटींच्या संपत्तीवर टाच आणली आहे. यात फार्महाऊस, पाच फ्लॅट आणि मुदत ठेवींचा समावेश आहे. माजी मंत्री छगन भुजबळ यांच्याशी संबंधित असलेल्या या घोटाळ््याच्या संदर्भात संपत्तीवर टाच आणण्याची ही पहिली कारवाई आहे. अंमलबजावणी संचानालयाने मनी लॉड्रींग प्रतिबंधक कायद्याखाली भुजबळांविरुद्ध दोन प्राथमिक तक्रार अहवाल नोंदविले आहेत. पहिले प्रकरण महाराष्ट्र सदन घोटाळा आणि कलिना जमीन वाटप प्रकरणाशी संबंधित असून दुसरे प्रकरण नवी मुंबईतील हाऊसिंग प्रोजेक्टशी संबंधित आहे. महाकृष्णा, प्रणिता आणि प्रसन्न चमणकर यांच्या संपत्तीवर टाच आणण्याची ही या घोटाळ्याशी सबंधित पहिलीच कारवाई होय. प्राथमिक तक्रार अहवालात या तिघांची नावे नमूद करण्यात आलेली होती. चमणकर इंटरप्रायजेसने ओरिजन इन्फ्रास्ट्रक्चर या डमी कंपनीच्या खात्यात ७ डिसेंबर २००७ आणि ९ मे २०११ दरम्यान ३,६७,७१,६०१ रुपये जमा कले होते. मागच्या महिन्यात अंमलबजावणी संचानालायने राजेश मिस्त्रीच्या विलेपार्लेतील प्रभु कुटिरमधील फ्लॅटवर धाड टाकली होती. छगन भुजबळ यांना लाच देण्याची जबाबदारी चमणकर यांनी काही लोकांवर टाकली होती. त्यापैकी राजेश मिस्त्री एक आहे. पंकज आणि समीर भुजबळ संचालक असलेल्या कंपनीच्या खात्यात (निश इन्फ्रास्ट्रक्चर) मिस्त्रीने ४.५ कोटी रुपये जमा केले होते.मिस्त्री हा एक व्यावसायिक असून उज्ज्वल काकरियाचा ग्राहक आहे. उज्ज्वलचे बंधू विपुल हे सुभाष कोटडिया यांच्या रॉयल इंटरप्रायजेसमध्ये भागीदार आहेत. भुजबळ यांना लाच देण्यासाठी प्राईम डेव्हलपर्सने याच कंपनीचा वापर केला. प्राइम डेव्हलपर्सने अंधेरीतील आरटीओ विभागाची जमीन विकसित करण्यासाठी चमणकर एंटरप्रायजेसकडून कंत्राट मिळविले होते.