शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोल ११९.८५ रुपये तर डिझेल १२३ रुपयांवर! तेल कंपन्या पुन्हा वाढवणार भाव? जाणून घ्या महाराष्ट्रातील दर
2
समृद्धी महामार्गावर निष्काळजीपणाचा कहर! बस अपघातात चिमुकलीचा मृत्यू, २५ प्रवासी जखमी
3
"माझ्यामध्ये दैवीशक्ती आहे, कॅन्सरसारखे आजारही बरे करतो", संगमनेरमधील भोंदूबाबा गजाआड
4
PM मोदींचे भाषण अन् कारमधला फोटो... 'युवा आमदार' मैथिली ठाकूर होतेय ट्रोल, कारण...
5
१२ कोचची नॉन-AC ट्रेन, आजपर्यंत मिळाल्या नाहीत अशा १० सेवा मिळणार; प्रवाशांना मोठा फायदा!
6
Shreyas Iyer: "मिशन चॅम्पियनसाठी पाय जमिनीवर असू द्या", श्रेयस अय्यर पंजाबच्या खेळाडूंना असं का म्हणाला?
7
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन म्हणजे विरोधकांना मोठी चपराक”: DCM एकनाथ शिंदे
8
"ज्या भाजपने महाराष्ट्रात..."; 'महिला आरक्षण'वरून अंजली दमानिया यांची फडणवीसांवर बोचरी टीका
9
रणवीर-दीपिका पुन्हा आईबाबा होणार! क्युट फोटो पोस्ट करत शेअर केली गुडन्यूज
10
२ भारतीय जहाजांवर होर्मुझमध्ये गोळीबार, इराणची मोठी प्रतिक्रिया; अधिकारी म्हणाले, “लवकरच...”
11
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुखाचा काळ, व्यापारी करारातून लाभ; नोकरीत पगारवाढ, इगो टाळा!
12
Chris Gayle: "माझ्यावर प्रचंड कर्ज, माझ्यासाठी IPL खेळणं गरजेचं" ऑक्शननंतर ख्रिस गेलनं कुणाला केला फोन?
13
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
14
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
15
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
16
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
17
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
18
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
19
'धुरंधर'चा आलम भाई ५२ व्या वर्षीही अविवाहित, कधीही लग्न न करण्याचा घेतला निर्णय; कारण...
20
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
Daily Top 2Weekly Top 5

पशुंचे संवर्धन तोकड्या कर्मचाऱ्यांवर

By admin | Updated: June 23, 2014 01:13 IST

विदर्भातील शेतीची अवस्था कुणापासून लपून नाही. शेतीपूरक व्यवसायसुद्धा नसल्यासारखेच आहे. अशा परिस्थितीत केवळ पशुपालन हा एकमात्र शेतीपूरक व्यवसाय बहुतांश शेतकरी करतात. याला प्रोत्साहन देण्यासाठी

शासकीय योजनांचा बोजवारा : शेतीपूरक व्यवसायांकडे शासनाचे दुर्लक्ष सुहास सुपासे - यवतमाळ विदर्भातील शेतीची अवस्था कुणापासून लपून नाही. शेतीपूरक व्यवसायसुद्धा नसल्यासारखेच आहे. अशा परिस्थितीत केवळ पशुपालन हा एकमात्र शेतीपूरक व्यवसाय बहुतांश शेतकरी करतात. याला प्रोत्साहन देण्यासाठी आणि या संबंधीच्या योजना राबविण्यासाठी असलेल्या पशुसंवर्धन विभागाची मात्र अतिशय वाईट स्थिती आहे. अमरावती विभागात अर्धी पदे रिक्त आहेत. त्यामुळे पशुपालन व्यवसाय कसा वाढेल, याबाबत विचारच न केलेला बरा. अमरावती विभागातील पाचही जिल्ह्यात अ, ब, क आणि ड या चारही गटातील शेकडो पदे रिक्त आहेत. अ आणि ब गटातील रिक्त पदांचा विचार केल्यास विभागातील एकमेव प्रादेशिक सहआयुक्त पशुसंवर्धन हे मुख्य पद सध्या रिक्त आहे. अमरावती आणि वाशिम येथे जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त ही पदे रिक्त आहेत. सहायक आयुक्त पशुसंवर्धनची तब्बल १२ पदे रिक्त आहेत. यामध्ये यवतमाळ तीन, बुलडाणा चार, अमरावती, अकोला प्रत्येकी एक आणि वाशिम येथे तीन पदे रिक्त आहेत. पशुधन विकास अधिकाऱ्यांची विभागात एकूण ७३ पदे रिक्त आहेत. यात अमरावती येथील १४, अकोला एक, यवतमाळ ३५, बुलडाणा १० आणि वाशिम येथे १३ पदे रिक्त आहेत. पाच जिल्ह्यांमिळून असलेले एकमेव अमरावती प्रशासकीय अधिकारी व वैरण विकास अधिकारी ही पदेही रिक्त आहे. क आणि ड गटातील उच्चश्रेणी लघुलेखक हे अमरावती कार्यालयातील एकमेव पद रिक्त आहे. लघुलेखक हे अकोला, बुलडाणा व यवतमाळ या तिन्ही जिल्ह्यातील तीन पदे रिक्त आहेत. वरिष्ठ सहायकाचे अकोला व यवतमाळ येथील जागा रिक्त आहे तर अमरावती येथील वरिष्ठ सहाय्यकाची जागा ३० जून रोजी रिक्त होत आहे. वरिष्ठ लिपिकांची अमरावती येथील सहा पदे, अकोला तीन, यवतमाळ पाच, बुलडाणा पाच व वाशिम येथील तीन पदे रिक्त आहेत. सहायक पशुधन विकास अधिकाऱ्यांची अमरावती येथील १४, यवतमाळ तीन, बुलडाणा एक व वाशिम येथील तीन जागा रिक्त आहेत. वाहनचालकाचे बुलडाणा वगळता इतर चारही जिल्ह्यातील प्रत्येकी एक पद रिक्त आहे. सयंत्र अभियंता ही अमरावती येथील जागा गेली अनेक वर्षांपासून रिक्त आहे. शिपायांची दोन पदे अमरावती येथे रिक्त आहेत. पट्टीबंधकांची १३ पदे विभागात रिक्त आहेत. यामध्ये अमरावती व यवतमाळ प्रत्येकी एक, अकोला व वाशिम प्रत्येकी तीन आणि बुलडाणा येथील पाच पदांचा समावेश आहे.परिचरांची अमरावती येथे बारा, अकोला, यवतमाळ व बुलडाणा येथे प्रत्येकी एक तर, वाशिम येथे चार पदे रिक्त आहेत. एवढ्या मोठ्या प्रमाणात रिक्त पदे असताना पशुपालन हा जोडधंदा कितपत वाढू शकेल, हा मोठा प्रश्न आहे. पशुंसाठीचे लसीकरण आणि लाभार्थ्यांसाठी शासनाच्या अनेक योजना आहेत. परंतु रिक्त पदांमुळे या योजना योग्यरीत्या आणि वेळेत लाभार्थ्यांपर्यंत पोहोचत नाहीत.