जात-धर्माचे राजकारण करून दंगली घडवण्याचा प्रयत्न?" परतवाडा प्रकरणावरून यशोमती ठाकूर यांचा भाजपवर हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2026 16:42 IST2026-04-16T16:23:01+5:302026-04-16T16:42:46+5:30

माजी मंत्री यशोमती ठाकूर यांनी सत्ताधारी भाजपवर 'दंगली घडवण्याचा प्रयत्न' करत असल्याचा खळबळजनक आरोप केला आहे.

"An attempt to create riots through caste-religion politics?" Yashomati Thakur attacks BJP over the Parwada case. | जात-धर्माचे राजकारण करून दंगली घडवण्याचा प्रयत्न?" परतवाडा प्रकरणावरून यशोमती ठाकूर यांचा भाजपवर हल्लाबोल

जात-धर्माचे राजकारण करून दंगली घडवण्याचा प्रयत्न?" परतवाडा प्रकरणावरून यशोमती ठाकूर यांचा भाजपवर हल्लाबोल

परतवाडा येथील मुलींचे लैंगिक शोषण आणि आक्षेपार्ह व्हिडीओ व्हायरल झाल्याच्या घटनेने अमरावती जिल्ह्यात संतापाची लाट आहे. या प्रकरणावरून आता राजकारण चांगलेच तापले असून, माजी मंत्री यशोमती ठाकूर यांनी सत्ताधारी भाजपवर 'दंगली घडवण्याचा प्रयत्न' करत असल्याचा खळबळजनक आरोप केला आहे.

पत्रकारांशी बोलताना यशोमती ठाकूर म्हणाल्या की, "अमरावतीमध्ये जे घडले ते अत्यंत घृणास्पद आहे. या घटनेचा जितका निषेध करावा तितका थोडाच आहे. कोणत्याही संवेदनशील व्यक्तीला या घटनेचा राग आणि चीड येणारच. मात्र, पीडित महिला ही केवळ पीडित असते, तिला कोणतीही जात किंवा धर्म नसतो. गुन्हेगाराला शिक्षा मिळायलाच हवी, पण त्याचे भांडवल करून समाजातील सलोखा बिघडवणे चुकीचे आहे."

भाजपवर गंभीर आरोप

यशोमती ठाकूर यांनी थेट भाजपला लक्ष्य करत विचारले की, "लोकांना उचकवून आणि जाती-धर्माचे राजकारण करून भाजपला त्या ठिकाणी दंगली घडवायच्या आहेत का? गुन्हेगारावर कडक कारवाई करण्याऐवजी समाजात तेढ निर्माण करणे हा देखील एक प्रकारचा गुन्हाच आहे. मग अशा वेळी गुन्हे दाखल का होत नाहीत?" असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

सलोखा बिघडवण्याचा प्रयत्न?

"एकीकडे मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर असताना, दुसरीकडे या प्रकरणाला धार्मिक रंग देऊन राजकीय पोळी भाजण्याचे काम केले जात आहे," असा दावा ठाकूर यांनी केला. त्यांनी प्रशासनाला आवाहन केले की, आरोपींवर कठोर कारवाई करावी, परंतु कोणत्याही परिस्थितीत अमरावतीचा सामाजिक सलोखा बिघडणार नाही याची काळजी घ्यावी.

Web Title : शोषण मामले पर यशोमती ठाकुर ने बीजेपी पर दंगे भड़काने का आरोप लगाया

Web Summary : यशोमती ठाकुर ने अमरावती शोषण मामले का राजनीतिकरण करने का आरोप बीजेपी पर लगाया, धार्मिक विभाजन का उपयोग करके दंगे भड़काने के प्रयास का आरोप लगाया। उन्होंने दोषियों के खिलाफ सख्त कार्रवाई का आग्रह किया, सांप्रदायिक सद्भाव की रक्षा की।

Web Title : Yashomati Thakur Accuses BJP of Inciting Riots Over Exploitation Case

Web Summary : Yashomati Thakur accuses BJP of politicizing the Amravati exploitation case, alleging attempts to incite riots using religious divisions. She urges strict action against culprits, safeguarding communal harmony.