शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

अमरावतीचे महापौरपद खोडके गटाकडे

By admin | Updated: September 10, 2014 00:44 IST

अमरावती महानगरपालिका महापौर निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे बंडखोर नेते संजय खोडके यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस फ्रंटच्या चरणजित कौर ऊर्फ रिना नंदा यांची सरशी झाली आहे. या निवडणुकीत काँग्रेसने

राष्ट्रवादीला ठेंगा : उपमहापौरपदासाठी काँग्रेसची राष्ट्रवादी फ्रंटशी हातमिळवणीअमरावती : अमरावती महानगरपालिका महापौर निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे बंडखोर नेते संजय खोडके यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस फ्रंटच्या चरणजित कौर ऊर्फ रिना नंदा यांची सरशी झाली आहे. या निवडणुकीत काँग्रेसने राष्ट्रवादीला दूर ठेवत खोडके यांच्याशी हातमिळवणी केल्याने उपमहापौरपदी काँग्रेसचे शेख जफर शेख जब्बार विजयी झाले आहेत. त्यांनी अनुक्रमे राष्ट्रवादी काँग्रेसच्या सपना ठाकूर व शिवसेना - भाजपच्या छाया अंबाडकर यांचा पराभव केला. जनविकास काँग्रेस- जनकल्याण आघाडीचे नगरसेवक तटस्थ राहिले.महापौरपदाच्या निवडणुकीसाठी ८७ पैकी ७९ नगरसेवकांनी मतदान केले. आठ नगरसेवक तटस्थ राहिले. उपमहापौरपदाच्या निवडणुकीत ७१ नगरसेवकांनी मतदान केले. त्यावेळी मात्र, जनविकास काँग्रेसचे बाळू भुयार, काँग्रेस आघाडीतील अपक्ष नगरसेवक विजय नागपुरे हे सभागृहात अनुपस्थित होते. मात्र, विजय नागपुरे यांनी महापौरपदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या सपना ठाकूर यांच्या बाजूने हात उंचावून मतदान केले. तथापि, मतदान रजिस्टरवर स्वाक्षरी करायला त्यांनी नकार दिला. बहुजन समाज पार्टीच्या ६ नगरसेवकांमध्ये फूट दिसून आली. त्यापैकी ३ नगरसेवकांनी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस फ्रंटच्या बाजूने महापौर, उपमहापौरपदासाठी मतदान केले. भाजप गटात सामील अपक्ष नगरसेवक दिनेश बूब हे महापौर, उपमहापौरपदाच्या निवडणुकीत तटस्थ राहिले. मंगळवारी महापालिकेच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात ही निवडणूक घेण्यात आली. जिल्हाधिकारी किरण गित्ते यांनी पीठासीन अधिकारीपद भूषविले. महापौरपदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस फ्रंटच्या चरणजित कौर नंदा यांना ४७, राष्ट्रवादी काँग्रेसच्या सपना ठाकूर यांना ८, शिवसेना- भाजप, रिपाइं महायुतीच्या रेखा तायवाडे यांना २१, बसपाच्या गुंफाबाई मेश्राम यांना ३ मते मिळाली. चरणजित कौर नंदा यांना विजयी घोषित करण्यात आले.तसेच उपमहापौरपदाच्या निवडणुकीत महायुतीच्या छाया अंबाडकर यांना २१ मते, काँग्रेचे शेख जफर यांना ४७ मते तर बसपाचे दीपक पाटील यांना तीन मते मिळाली. महापौरपदासाठी चार तर उपमहापौरासाठी तीन उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते.