शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

मृत पोलीस अधिकाऱ्याच्या खात्यातून हडपली रक्कम

By admin | Updated: June 20, 2014 00:58 IST

मृत पोलीस मित्राच्या बँक खात्यातून ४० हजारांची रक्कम काढून ती हडप केल्याची घटना घडल्याने पोलीस खात्यात खळबळ उडाली आहे. या प्रकरणात सहभागी पोलीस उपनिरिक्षक दीपक बरकले गेल्या

आरोपी पीएसआय पसार : पत्नीच्या चौकशीसाठी पोलीस पथक मुंबईकडेगडचिरोली : मृत पोलीस मित्राच्या बँक खात्यातून ४० हजारांची रक्कम काढून ती हडप केल्याची घटना घडल्याने पोलीस खात्यात खळबळ उडाली आहे. या प्रकरणात सहभागी पोलीस उपनिरिक्षक दीपक बरकले गेल्या चार दिवसांपासून गायब आहेत. गडचिरोली पोलिसांचे एक पथक त्यांच्या व त्यांच्या पत्नीच्या चौकशीसाठी मुंबई रवाना झाले आहे. मूळचे सातारा जिल्ह्यातील मारोतीनगरचे रहिवासी असलेले पोलीस उपनिरिक्षक प्रशांत देसाई हे कुरखेडा तालुक्यातील मालेवाडा पोलीस मदत केंद्रात कार्यरत होते. २४ मार्च २०१२ ला नक्षल शोध मोहीम राबवून मालेवाडाकडून कुरखेडाकडे जाताना सी-६० पथकाच्या वाहनाला अपघात झाला. त्यात पीएसआय प्रशांत देसाई (२७) हे ठार झाले. त्यापूर्वी देसाई व त्यांचे मित्र असलेले पीएसआय बरकले हे एकत्रच राहत होते. शिक्षण घेतानाही देसाई व बरकले हे एकाच खोलीत राहत. दोघेही एकाचवेळी पोलीस दलात दाखल झाले. देसार्इंच्या मृत्यूनंतर देसाईच्या बँक खात्यावर जमा झालेली रक्कम इंटरनेट बँकिंगद्वारे दुसऱ्या खात्यावर जमा होत असल्याची तक्रार मृत प्रशांत देसाईच्या कुटुंबीयांनी गडचिरोलीच्या पोलीस अधीक्षकांकडे केली. त्यानंतर पोलीस अधीक्षकांनी याची चौकशी सुरू केली. मृत प्रशांत देसाई यांच्या खात्यातील रक्कम बरकले यांच्या पत्नी संजीवनी बोराडे यांच्या मुंबई येथील बँक खात्यावर जमा होत असल्याचे पोलीस चौकशीत आढळून आले आहे. इंटरनेट बँकिंगसाठी बँकेमध्ये जाऊन पासवर्ड घ्यावा लागतो. त्यासाठी बँक खातेदाराचे फोटो, ओळखपत्र लागते. मृतक प्रशांत देसाईचे बनावट ओळखपत्र बँकेत जमा करण्यात आले आहे. बँकेकडे पासवर्ड देताना मृतक प्रशांतच्या नावाने मोबाईल दिला गेला असावा, अशी शक्यता आहे. प्रशांत देसाई यांच्या खात्यातून बरकले यांच्या पत्नीच्या खात्यात जमा झालेली रक्कम लगेच काढली जात होती. त्यानंतर या प्रकरणात संजीवनी बोराडे याही सहभागी असाव्यात, असे पोलीस तपासात दिसून आले आहे. या प्रकरणानंतर पोलीस उपनिरिक्षक दीपक बरकले हे सुटी न टाकता गायब झालेले आहे. तर गडचिरोली पोलिसांनी या प्रकरणाच्या अधिक तपासासाठी पथक रवाना केले आहे, अशी माहिती पोलीस अधीक्षक कार्यालयाने दिलीे. (जिल्हा प्रतिनिधी)