शहरं
Join us  
Trending Stories
1
टीएमसी की भाजप... पश्चिम बंगालमध्ये महिला अन् पुरुषांची पहिली पसंती कुणाला?  'हे' आकडे सत्तेचं गणित बदलणार
2
IPL 2026 : MI चा संघर्ष संपता संपेना! तरीही स्वबळावर Playoffs ची आशा जिवंत; जाणून घ्या समीकरण
3
कोल्हापूर जिल्ह्यातील मुलींच्या शोषण प्रकरणाला वेगळे वळण, बजरंग दलाच्या पदाधिकाऱ्याला पिस्तुलाचा धाक दाखवत जीवे मारण्याची धमकी
4
नागपुरात ‘रेडिएशन’ची धमकी; संघ मुख्यालय-स्मृतिमंदिरात ‘रेडिओॲक्टिव्ह’ पदार्थ टाकल्याचा दावा, पोलीस आयुक्तांना निनावी पत्र
5
SRH विरुद्ध नमन धीरच्या चुकांवर चुका! हेडला तीनदा जीवनदान; तिथंच MI च्या हातून सामना निसटला
6
धारमध्ये भीषण अपघात; ३५ मजुरांनी भरलेली पिकअप उलटून स्कॉर्पिओला धडकली; १२ जणांचा जागीच मृत्यू, १५ हून अधिक जखमी
7
ममता बॅनर्जी यांचा २० हजार मतांनी पराभव होणार! सुवेंदू अधिकारी यांचा दावा; भाजपला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
8
IPL 2026 : हेडच्या वादळानंतर क्लासेनचा क्लास शो! SRH कडून पराभवानंतर MI साठी वाजली धोक्याची घंटा
9
"मी १९८४ पासून निवडणूक लढतेय, पण यावेळी..."; ममता संतापल्या, विजयासंदर्भात काय बोलून गेल्या? 
10
पत्राचाळ रहिवाशांना मोठा दिलासा! म्हाडा १० टक्के भाडेवाढ देणार; DCM एकनाथ शिंदेंचा निर्णय
11
Ryan Rickelton Record : MI कडून जे रोहित-सचिनलाही जमलं नाही, ते रिकल्टननं करून दाखवलं!
12
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
13
कोण आहे Allah Ghazanfar? अभिषेक शर्माचं वादळ रोखत ईशान किशनला गोल्डन डकवर धाडलं तंबूत!
14
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
15
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
16
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
17
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
18
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
19
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
20
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रवादीचे नेते दिलीप वळसे पाटील शरद पवारांच्या भेटीला; कारणही आलं समोर

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2024 16:15 IST

नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत शरद पवार यांनी आंबेगावमध्ये घेतलेल्या जाहीर सभेतून वळसे पाटलांना निवडणुकीत पराभूत करण्याचं आवाहन जनतेला केलं होतं.

NCP Dilip Walse Patil ( Marathi News ) : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीचे नेते आणि आंबेगावमधून आठव्यांदा विधानसभेत दाखल झालेले दिलीप वळसे पाटील हे काही वेळापूर्वी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान इथं पोहोचले आहेत. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या कार्यकारिणीची आज बैठक आयोजित करण्यात आल्याने या बैठकीसाठी मी आलो असल्याचं वळसे पाटलांनी स्पष्ट केलं आहे. तसंच यावेळी मी शरद पवार यांची भेट घेईन, अशी माहितीही वळसे पाटलांनी दिली.

राष्ट्रवादीतील फुटीनंतर दिलीप वळसे पाटील यांनी शरद पवार यांची साथ सोडत अजित पवारांसोबत जाणं पसंत केलं होतं. त्यामुळे नंतर वळसे पाटील आणि शरद पवार यांच्यातील राजकीय संबंध ताणले गेले. यातूनच नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत शरद पवार यांनी आंबेगावमध्ये घेतलेल्या जाहीर सभेतून वळसे पाटलांना निवडणुकीत पराभूत करण्याचं आवाहन जनतेला केलं होतं. मात्र वळसे पाटलांचा या निवडणुकीत काठावर विजय झाला. त्यानंतर आता हे दोन्ही नेते पहिल्यांदाच आज भेटणार आहेत.

आंबेगावमधील लढतीत नेमकं काय झालं?

आंबेगाव विधानसभा मतदार संघाच्या अटीतटीच्या लढतीत सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांचा निसटता विजय मिळवला. त्यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार देवदत्त निकम यांचा १ हजार ५२३ मतांनी पराभव केला आहे. विधानसभेची ही निवडणूक अत्यंत चुरशीची झाली. पहिल्या फेरीपासून शेवटच्या फेरीपर्यंत मताधिक्यात चढ-उतार होत होता. शेवटच्या विसाव्या फेरीत निकाल निश्चित होऊन दिलीप वळसे पाटील १ हजार ५२३ मतांनी विजयी झाले. एकूण २ लाख २२ हजार ५१५ मतांपैकी वळसे पाटील यांना १ लाख ६ हजार ८८८ मते मिळाली. तर त्यांचे प्रतिस्पर्धी महाविकास आघाडीचे देवदत्त निकम यांना १ लाख ५ हजार ३६५ मते मिळाली आहेत.    

टॅग्स :maharashtra assembly election 2024 resultमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024Dilip Walse Patilदिलीप वळसे पाटीलSharad Pawarशरद पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसambegaon-acआंबेगावwestern maharashtra regionपश्चिम महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024