शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
5
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
6
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
7
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
8
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
9
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
10
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
11
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
12
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
14
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
15
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
16
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
17
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
18
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
19
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
20
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
Daily Top 2Weekly Top 5

छत्री तलाव येथे वाढदिवस साजरा करणाऱ्या तरुणाला 'भुता'कडून मारहाण? व्हिडीओ व्हायरल; पोलिस म्हणतात...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 3, 2025 17:23 IST

Amaravati Ghost Viral Video News: तरुण आपल्या मित्रांसह केक घेऊन छत्री तलाव परिसरात गेला होता. व्हिडीओमध्ये एक महिला दिसते आणि काही क्षणातच ती गायब होते, असे वर्णनही करण्यात आले आहे.

अमरावती शहरातील छत्री तलाव परिसरात वाढदिवस साजरा करणाऱ्या तरुणाला भुतनीने मारहाण केल्याचा दावा करणारा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. या व्हिडीओमुळे खळबळ उडाली असून, अनेकांनी तो शेअर केला आहे. यामुळे पोलीस प्रशासनानेही चौकशी सुरु केली असून अशा प्रकारचे व्हिडीओ व्हायरल न करण्याचे आवाहन केले आहे.  (Amaravati Ghost Viral Video News) 

मिळालेल्या माहितीनुसार, ३० जून रोजी वाढदिवस साजरा करणारा तरुण आपल्या मित्रांसह केक घेऊन छत्री तलाव परिसरात गेला होता. त्यावेळी अचानक एक महिला त्याच्यावर धावून गेली आणि त्याला मारहाण केली. संबंधित महिलेला ‘भुतनी’ असल्याचा दावा करण्यात आला आहे. काही फोटोमध्ये तर तरुणाच्या पाठीवर मारहाणीच्या खुणा असल्याचेही दाखवण्यात आले आहे. व्हिडीओमध्ये एक महिला दिसते आणि काही क्षणातच ती गायब होते, असे वर्णनही करण्यात आले आहे. यावर पोलिस उपायुक्त गणेश शिंदे यांना पत्रकारांनी विचारणा केली असता त्यांनी या प्रकाराबाबत अजूनपर्यंत पोलिसांत कोणतीही तक्रार दाखल झालेली नाही, असे सांगितले. राजापेठ व खोलापुरी गेट पोलिस ठाण्यांनी अशा कोणत्याही घटनेची माहिती नाकारली आहे. पोलिस उपायुक्त गणेश शिंदे यांनीही अशी घटना घडल्याचे स्पष्टपणे फेटाळले आहे. त्यांनी सांगितले की, हाच व्हिडीओ काही वर्षांपूर्वीही व्हायरल करण्यात आला होता आणि आता तो पुन्हा एकदा व्हायरल केला जात आहे. 

दरम्यान, हा प्रकार सध्या शहरात आणि विशेषतः तरुणांमध्ये उत्सुकतेचा विषय ठरला आहे. सोशल मीडियावर त्यावर जोरदार चर्चा सुरू आहे. पोलिस उपायुक्त गणेश शिंदे यांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, कोणत्याही व्हिडीओची सत्यता तपासल्याशिवाय तो शेअर करू नये.

( डिस्क्लेमर: लोकमत या व्हिडीओची पुष्टी करत नाही, तसेच अंधश्रद्धा पसरवत नाही. )

टॅग्स :AmravatiअमरावतीPoliceपोलिस