शहरं
Join us  
Trending Stories
1
येत्या २४ तासांत काहीतरी मोठे घडणार! डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणसोबत चर्चा करण्याची शक्यता, जेडी वेन्स पाकिस्तानला निघाले...
2
Video: "नरेंद्र मोदी हे दहशतवादी"; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गेंचे धक्कादायक वक्तव्य, नंतर केली सारवासारव...
3
Mumbai Local: मोठा अपघात टळला! CSMT स्थानकात दोन लोकल समोरासमोर! सिग्नल बिघाड अन् मोटरमनचे प्रसंगावधान (Watch Video)
4
पाकिस्तानाचा विषारी डाव! फाजिल्कामध्ये काळवंडले नद्यांचे पाणी; पंजाबची जनता आजाराच्या विळख्यात
5
१० हजार+ धावा, १७५ विकेट्स, पण आयपीएलमध्ये ५ वर्षे बेंचवर बसून राहिला 'हा' अष्टपैलू खेळाडू
6
Narasimha Navratri 2026: नृसिंह नवरात्र विशेष: नऊ दिवस नऊ उपासना; संकटमुक्तीसाठी करा ही विशेष साधना!
7
भोंगळ कारभार! रुग्णालयात गर्दी वाढली, सुरक्षा रक्षक झाला 'डॉक्टर'; जखमी तरुणाला घातले टाके
8
IPL 2026: MI vs CSK सामन्याआधी चेन्नईला मोठा धक्का; मराठमोळा स्टार क्रिकेटर स्पर्धेतून बाहेर
9
हंगेरीची मोठी घोषणा! नेतन्याहूंना अटक करणार; नवीन पंतप्रधान पीटर माग्यार यांचा इस्रायलला मोठा इशारा
10
जगाची ‘लाईफलाईन’ धोक्यात? मलक्काच्या मार्गावर अमेरिकेचा पहारा, चीनची वाढली धडधड!
11
रिक्षा चालवून लेकाला डॉक्टर बनवण्याचं स्वप्न; वडिलांवर आली अंत्यसंस्कारासाठी पैसे मागण्याची वेळ
12
युद्ध की शांतता? मतभेद! संसदेचे सभापती आणि IRGC प्रमुखांमध्ये जुंपली; इराणचे नवे 'पॉवर सेंटर' अहमद वाहिदी कोण? 
13
Lori Deremer: देशावर युद्धाचं संकट, पण ट्रम्प सरकारची महिला मंत्री करत होती 'पूल पार्टी'
14
इराणची लेडी डॉन शमीम माफीला अमेरिकेत अटक, विमानतळावरच ठोकल्या बेड्या; प्रकरण काय?
15
Latest Marathi News LIVE Updates: चेन्नई सुपर किंग्जचा आयुष म्हात्रे दुखापतीमुळे IPL 2026 बाहेर
16
क्रिकेट इतिहासात शून्यावर बाद होणारा पहिला खेळाडू कोण? १४९ वर्षांपूर्वी नोंदवला गेला हा लाजीरवाणा विक्रम; कसा आला 'डक' शब्द? जाणून घ्या
17
खाडी देशांत युद्ध...! भारतीय पर्यटकांनी या देशांकडे वळविला आपला मोर्चा; उन्हाळ्यात तुम्ही कुठे जाणार?
18
धक्कादायक! रील बनवण्याची हौस जिवावर बेतली; बाईकवरून स्टंट करताना पडून ३ भावांचा मृत्यू
19
एकनाथ शिंदेंनी शब्द पाळला; पहलगाममध्ये आदिलच्या कुटुंबाला घर बांधून दिले, १२ लाख खर्च केले!
20
"चर्चा नाही तर मोठा धमाका करू!" डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला निर्वाणीचा इशारा; शांतता चर्चा धोक्यात?
Daily Top 2Weekly Top 5

अमळनेरमध्ये पाण्यावरून दंगल

By admin | Updated: September 13, 2014 02:39 IST

पाण्यावरून झालेल्या वादातून शुक्रवारी वासरे येथे दंगल झाली. हल्लेखोरांनी एका महिलेच्या अंगावर रॉकेल ओतून तिला जिवे मारण्याचा प्रयत्न केला

अमळनेर (जि.जळगाव) : पाण्यावरून झालेल्या वादातून शुक्रवारी वासरे येथे दंगल झाली. हल्लेखोरांनी एका महिलेच्या अंगावर रॉकेल ओतून तिला जिवे मारण्याचा प्रयत्न केला. हल्ल्यात १२ जण जखमी झाले. ३५ जणांविरूद्ध दंगलीचा गुन्हा दाखल झाला आहे. रात्री उशिरापर्यंत चार जणांना अटक झाली. गावात तणावपूर्ण शांतता आहे. ७ सप्टेंबरला वासरे येथील सागर पाटील, शंकर रघुनाथ पाटील यांना मोटार लावून बांधकामासाठी पाणी वापरू नका. त्यामुळे इतरांना पाणी मिळत नाही, असे ग्रामपंचायत सदस्य प्रवीण दयाराम पाटील यांनी सांगितले होते. त्यावरून दोघांमध्ये वाद झाला. त्यानंतर ९ सप्टेंबरला शंकर पाटील व इतरांनी प्रवीण पाटील यांना मारहाण केली. याप्रकरणी मारवड पोलिसांत २६ जणांविरूद्ध गुन्हा दाखल झाला होता. सर्व संशयितांना गुरूवारी अटक झाली व नंतर त्यांची जामीनावर मुक्तता झाली. आरोपींची मुक्तता होताच त्याचे गावात पडसाद उमटले. शुक्रवारी सकाळी प्रवीण पाटील यांच्यासह आरोपींनी आशाबाई गुलाबराव पाटील (३०) यांच्या घरात घुसून त्यांच्या अंगावर रॉकेल ओतून, त्यांना जिवे मारण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर हल्लेखोरांनी न्यू प्लॉट भागात जाऊन ग्रामस्थांना लाठ्याकाठ्या, सळईने मारहाण करण्यास सुरूवात केली. त्यामुळे गावात घबराट पसरून एकच पळापळ सुरू झाली. त्याचदरम्यान जमावाने विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या वाहनांवरही दगडफेक केली. वाहनचालक दत्तात्रय पाटील यांना मारहाण केली. हल्लेखोरांनी चंद्रभान साहेबराव पाटील, देवीदास साहेबराव पाटील, सागर शंकर पाटील, अशोक रघुनाथ पाटील, रवींद्र जुगराज पाटील, लिलाधर खंडू पाटील, दत्तात्रय जगन्नाथ पाटील , लोटन लिलाधर पाटील, शंकर रघुनाथ पाटील, जिजू खंडू पाटील, भालचंद्र शंकर पाटील, सुनील खंडू पाटील, विजय झिपरू पाटील, सुशीलाबाई किसन पाटील, मंगल शंकर पाटील यांना जखमी केले. घटनेचे वृत्त कळताच पोलीस निरीक्षक बोत्रे यांनी वासरे गाव गाठले. आशाबाई पाटील यांनी मारवड पोेलीस स्टेशनला दिलेल्या फिर्यादीवरून ३५ जणांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. (प्रतिनिधी)