मंत्री बाबासाहेब पाटलांनी केलेल्या विधानावर अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया; थेट फटकारले, म्हणाले,..
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2025 11:18 IST2025-10-11T11:15:11+5:302025-10-11T11:18:15+5:30
राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे. एकीकडे बाधित शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सरकारने पॅकेज जाहीर केले असताना मंत्र्यांकडून वादग्रस्त वक्तव्ये केली जात आहेत.

मंत्री बाबासाहेब पाटलांनी केलेल्या विधानावर अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया; थेट फटकारले, म्हणाले,..
राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे. एकीकडे बाधित शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सरकारने पॅकेज जाहीर केले असताना मंत्र्यांकडून वादग्रस्त वक्तव्ये केली जात आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसअजित पवार गटाचे नेते व सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी एका कार्यक्रमात बोलताना लोकांना कर्जमाफीचा नाद लागला आहे असं वादग्रस्त विधान केले. तसेच आम्हाला निवडून यायचं आहे म्हणून तुम्हाला निवडणुकीत काहीतरी आश्वासनं देतो अशीही कबुली मंत्री बाबासाहेब पाटील यांनी दिली. दरम्यान, आता यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली.
“लोकशाही वाचवण्यासाठी तुम्हीही पुढाकार घ्या”; राऊतांचे CM फडणवीसांना आवाहन, प्रकरण काय?
माध्यमांसोबत संवाद साधताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंत्री बाबासाहेब पाटील यांच्या विधानावर प्रतिक्रिया दिली. पवार यांनी मंत्र्यांनी शेतकऱ्यांबाबत केलेले विधान चुकीचे असल्याचे सांगत याबाबत त्यांच्यासोबत बोलणार असल्याचे सांगितले.
"मी त्यांना शेतकऱ्यांच्याबाबतील केलेल विधानाबाबत बोलणार आहे. मी त्यांना काय सांगायचं ते सांगणार आहे. शेतकरी हा बळीराजा आहे. लाखाचा पोशींदा आहे.३२ हजार कोटींचे पॅकेज देताना मुख्यमंत्र्यांनीही सांगितले आहे, असंही उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले.
सहकार मंत्री बाबासाहेब पाटलांचे विधान काय?
"लोकांना कर्जमाफीचा नाद लागला आहे. आम्हाला निवडून यायचं आहे म्हणून तुम्हाला निवडणुकीत काहीतरी आश्वासनं देतो. लोकांनी ठरवायला हवं की त्यांनी काय मागायचं आहे. एखाद्या गावामध्ये निवडणुकीत अनिल भाईदास यांच्यासारखा माणूस गेला आणि लोकांनी सांगितले की आमच्या गावाला नदी आणून देईल त्याला आम्ही मतदान करणार आहोत. लोकांनी काय मागावं हे ठरवावं. अनिलभाई आजची वेळ मारुन नेण्यासाठी नदीही देऊन टाकू तुला म्हणतील. म्हणून मित्रांनो मागणाऱ्यांनी काय मागायचं हे ठरवायला हवं. निवडणुकीत निवडून यायचं आहे म्हणून आम्ही आश्वासने देतो," असं सहकारमंत्री बाबासाहेब पाटील म्हणाले.