मुख्यमंत्र्यांच्या 'भावी सहकारी' वक्तव्यावर अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Published: September 17, 2021 03:23 PM2021-09-17T15:23:51+5:302021-09-17T15:25:12+5:30

Ajit Pawar on Uddhav Thackerays statement: मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी औरंगाबाद येथील कार्यक्रमात भाजपचा भावी सहकारी असा उल्लेख केला आहे.

Ajit Pawar's first reaction to the Chief Minister's 'future colleague' statement | मुख्यमंत्र्यांच्या 'भावी सहकारी' वक्तव्यावर अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...

मुख्यमंत्र्यांच्या 'भावी सहकारी' वक्तव्यावर अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...

googlenewsNext

पुणे: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त औरंगाबाद दौऱ्यावर आलेले आहेत. यावेळी त्यांनी आपल्या भाषणावेळी भाजपचा 'भावी सहकारी' असा उल्लेख केला. त्यांच्या या वक्तव्यानंतर राज्याच्या राजकारणात चर्चांना उधाण आलं आहे. मुख्यमंत्र्यांच्या या वक्तव्यावर आता राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही प्रतिक्रिया दिली आहे.

पुण्यातील पत्रकार परिषदेत अजित पवारांना मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्याबाबत विचारण्यात आलं. त्यावर अजित पवार म्हणाले, 'उद्धव ठाकरे राज्याचे प्रमुख आहेत. त्यांनी काय बोलावं आणि काय बोलू नये, हे मी कसं ठरवणार? मुख्यमंत्र्यांच्या मनात काय आहे, हे मी कस सांगू शकतो ? माझ्याशी बोलताना तर सरकारचे निर्णय, काय करायचं, राज्य कसं चालवायचं, समस्या काय, याच्याच चर्चा होतात, अशी प्रतिक्रिया अजित पवारांनी दिली.

'आपण कशा लोकांसोबत काम करत आहोत, हे उद्धव ठाकरेंच्या लक्षात आलं असेल'
उद्धव ठाकरेंच्या वक्तव्यावर माजी मुख्यमंत्री आणि विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनीही प्रतिक्रिया दिली. माध्यमांशी बोलताना फडणवीस म्हणाले की, 'आजच्या उद्धव ठाकरेंच्या वक्तव्याचा अन्वयार्थ एवढाच आहे, मुख्यमंत्र्यांच्या लक्षात आलं असेल, कशाप्रकारच्या लोकांसोबत काम करत आहोत. अनैसर्गिक गटबंधनामुळे महाराष्ट्राचं नुकसान होतंय, हे त्यांना रिअलाईज झालं असेल. त्यामुळेच मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या मनातील भावना बोलून दाखवली', असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

आम्ही सक्षम विरोधी पक्ष
फडणवीस पुढे म्हणाले की, राजकारणात कधीही काहीही होऊ शकतं. पण, सध्याची परिस्थिती तशी नाही. आम्ही सध्या सक्षम विरोधी पक्ष आहोत. जनतेच्या अपेक्षा घेऊन आम्ही आंदोलन करत आहोत. आजच्या मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्याचा अन्वयार्थ एवढाच आहे, मुख्यमंत्र्यांच्या लक्षात आलं, कशाप्रकारच्या लोकांसोबत काम करत आहोत, असंही ते म्हणाले.
 

Web Title: Ajit Pawar's first reaction to the Chief Minister's 'future colleague' statement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.