शहरं
Join us  
Trending Stories
1
"या नराधमाचा हा तिसरा गुन्हा, आधी दोनदा जामीन कसा मिळाला?"; सुप्रिया सुळेंचा यंत्रणेला सवाल
2
Delhi Fire: दिल्लीत अग्नितांडव! एसीचा स्फोट होऊन भीषण आग, ९ जणांचा होरपळून मृत्यू
3
Delhi Vivek Vihar Fire : Video - भीषण अग्नितांडव! "...तर लोकांचा जीव वाचला असता"; प्रत्यक्षदर्शीने सांगितला थरार
4
आजचे राशीभविष्य, ०३ मे २०२६: कुंभ, मकर राशीला भाग्याची साथ; जाणून घ्या तुमचा आजचा दिवस
5
इराणला 'टोल' दिला तर खैर नाही! अमेरिकेचा जगाला सज्जड दम, सर्व जहाज कंपन्यांवर बंदीची टांगती तलवार
6
Nasrapur Case: "अशा विकृत प्रवृत्तीच्या गुन्हेगारांवर..." नसरापूर घटनेवर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची संतप्त प्रतिक्रिया
7
"दुनिया हिला देंगे हम!" संघर्षातही मुंबई इंडियन्सने रचला नवा इतिहास; टी-२० विश्वात असा अद्वितीय पराक्रम करणारा पहिला संघ
8
"त्या नराधमाचा एन्काऊन्टर झाला तरच मानू की हे सरकार...", नरसापूर घटनेनंतर प्रवीण तरडे संतापले, सरकाला दिला अल्टिमेटम
9
राज्यात कोकणचाच डंका; लातूर पुन्हा तळाशी! बारावीचा निकाल घटला
10
'बीएच' सिरीज नंबर घेतला, पण कर भरायला विसरले !मुंबईत वाहनधारकांना बसला लाखो रुपयांचा दंड
11
Raja Shivaji Box Office: 'राजा शिवाजी'चं बॉक्स ऑफिसवर वादळ! दुसऱ्या दिवशीही बक्कळ कमाई
12
रस्त्याच्या कामात भीषण अपघात! क्रेनचा प्लॅटफॉर्म तुटून २ कामगारांचा जागीच मृत्यू
13
भोंदू खरात बिल्डरच्या खर्चाने फिरून आला तब्बल २१ देश;नवव्या गुन्ह्यात आणखी ४ दिवसांची पोलिस कोठडी
14
होर्मुझला पर्याय काय? इराणच्या दहशतीखाली जगाची 'लाईफलाईन' अडकली
15
मोबाइलवर वाजला अचानक वॉर्निंग सायरन अन् पसरली घबराट; 'सेल ब्रॉडकास्ट अलर्ट' प्रणाली देशभरात लाँच
16
मतमोजणी कर्मचाऱ्यांच्या निवडीचा निवडणूक आयोगाला अधिकार; तृणमूल काँग्रेसच्या याचिकेवर निकाल
17
छत्तीसगड : भूसुरुंग निकामी करताना चार जवान शहीद;'माओवाद मुक्ती'च्या केंद्राच्या घोषणेला धक्का
18
भाईंदरमधील २२० एकर मिठागरांवरील केंद्राचा दावा उच्च न्यायालयाने फेटाळला; जमीन खासगी व्यक्तीची असल्याचे स्पष्टीकरण
19
जबलपूर क्रुझ दुर्घटनेतील दोन बालकांचे मृतदेह सापडले; मृतांची संख्या ११ वर
Daily Top 2Weekly Top 5

अजित पवार बारामतीमधून माघार घेणार? कार्यकर्त्यांसमोर दिले सूचक संकेत 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2024 00:04 IST

Maharashtra Assembly Election 2024: विधानसभा निवडणुकीत अजित पवार हे बारामतीमधून लढणार नसल्याची चर्चा काही दिवसांपासून सुरू आहे. दरम्यान, गुरुवारी बारामतीमध्ये झालेल्या एका कार्यक्रमामधून अजित पवार यांनी या मतदारसंघातून माघार घेण्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत. त्यामुळे चर्चांना उधाण आले आहे. 

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडल्यानंतर पवार कुटुंबीयांचं होमग्राऊंड असलेल्या बारामतीमध्ये लोकसभा निवडणुकीत शरद पवार आणि अजित पवार हे काका पुतणे आमने सामने आले होते. अजित पवार गटकडून सुनेत्रा पवार आणि शरद पवार गटाकडून सुप्रिया सुळे यांच्यामध्ये झालेल्या त्या लढतीत सुप्रिया सुळे यांनी सुनेत्रा पवार यांचा दारुण पराभव केला होता. त्यानंतर आता विधानसभा निवडणुकीत बारामतीकर काय कौल देणार, याबाबत सर्वांनाच उत्सुकता लागली आहे. मात्र विधानसभा निवडणुकीत अजित पवार हे बारामतीमधून लढणार नसल्याची चर्चा काही दिवसांपासून सुरू आहे. दरम्यान, गुरुवारी बारामतीमध्ये झालेल्या एका कार्यक्रमामधून अजित पवार यांनी या मतदारसंघातून माघार घेण्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत. त्यामुळे चर्चांना उधाण आले आहे. 

बारामतीकरांना भावनिक आवाहन करताना अजित पवार म्हणाले की, लोकसभा निवडणुकीत समोरच्या गटाकडे बुथवर ठेवण्यासाठीही माणसं नव्हती. मात्र त्या निवडणुकीत काय झालं, याचा मी बारकाईने विचार केला आहे. आता विधानसभा निवडणुकीत मी जो उमेदवार देईन त्याला तुम्ही निवडून आणायचं आहे. आता हा आमदार कसा निवडून द्यायचा हे तुम्ही ठरवायचं आहे, असं आवाहन अजित पवार यांनी यावेळी केलं. अजित पवार यांच्या या आवाहनानंतर अजित पवार यांचे समर्थक असलेले कार्यकर्ते आक्रमक झालेले दिसून आले.

दरम्यान, अजित पवार यांनी बारामतीमधून माघार घेतल्यास येथून अजित पवार यांच्या पक्षाकडून कुणाला उमेदवारी दिली जाईल, याबाबत उत्सुकता आहे. त्यात अजित पवार यांचे  पुत्र पार्थ पवार आणि आणि जय पवार यांची नावं चर्चेत आहेत. त्यातही जय पवार यांना उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे शरद पवार गटाकडून येथे युगेंद्र पवार यांचं नाव चर्चेत आहे. त्यामुळे बारामती विधानसभेतही पवार विरुद्ध पवार अशीच लढत होण्याची चिन्हे आहेत.   

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Ajit Pawarअजित पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसbaramati-acबारामती