Ajit Pawar Funeral Live: अजित पवार अनंतात विलीन, दादांना अखेरचा निरोप देताना महाराष्ट्र हळहळला

LIVE

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2026 13:26 IST2026-01-29T07:50:50+5:302026-01-29T13:26:57+5:30

Ajit Pawar Last Rites Vidya Pratishthan Maidan Live Updates: राज्याच्या राजकारणात अनेकदा धक्कातंत्राचा प्रत्यय देणारे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बुधवारी सकाळी ...

Ajit Pawar Last Rites Funeral Live Updates Maharashtra Deputy CM & NCP Leader to be cremated at 11 am today at vidya pratishthan in Baramati | Ajit Pawar Funeral Live: अजित पवार अनंतात विलीन, दादांना अखेरचा निरोप देताना महाराष्ट्र हळहळला

Ajit Pawar Funeral Live: अजित पवार अनंतात विलीन, दादांना अखेरचा निरोप देताना महाराष्ट्र हळहळला

Ajit Pawar Last Rites Vidya Pratishthan Maidan Live Updates: राज्याच्या राजकारणात अनेकदा धक्कातंत्राचा प्रत्यय देणारे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बुधवारी सकाळी विमान अपघातात निधन झाले. अजित पवार यांची अकाली एक्झिट अवघ्या महाराष्ट्रासाठी धक्कादायक ठरली. वक्तशीर, बोलण्यात कडक पण तितकाच मिश्कील असलेला ‘दादा माणूस’ अचानक काळाच्या पडद्याआड गेल्याने संपूर्ण महाराष्ट्र हळहळला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पार्थिवावर गुरुवार, २९ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता विद्या प्रतिष्ठानच्या मैदानावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. तत्पूर्वी सकाळी ९ वाजता त्यांची अंत्ययात्रा निघणार आहे. पाहा, Live Updates...

LIVE

Get Latest Updates

29 Jan, 26 : 01:17 PM

तीच अजितदादांना खरी श्रद्धांजली ठरेल; संजय राऊतांची मागणी

29 Jan, 26 : 01:04 PM

अजित पवारांच्या अंत्यसंस्कारानंतर पार्थ आणि जय पवारांनी हात जोडले

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ आणि जय यांनी, त्यांचे वडील व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख अजित पवार यांच्या अंत्यसंस्कारासाठी उपस्थित असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या समर्थकांचे आणि कार्यकर्त्यांचे अभिवादन केले.

29 Jan, 26 : 12:47 PM

मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी बारामती येथे अजित पवार यांना श्रद्धांजली वाहिली

29 Jan, 26 : 12:28 PM

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली

29 Jan, 26 : 12:27 PM

अजित पवार यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

29 Jan, 26 : 12:27 PM

बारामती विमान दुर्घटनेत जीव गमावलेल्या विदीप जाधव यांच्यावर रात्री उशिरा अंत्यसंस्कार

29 Jan, 26 : 12:10 PM

दादा गेले! मुंबईतील सायन मार्केट बंद, कार्यकर्ते झाले भावुक

29 Jan, 26 : 12:06 PM

अजित पवारांना शेवटचा निरोप देण्यासाठी राज्यातील अनेक वरिष्ठ नेते, मंत्री, अधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित

29 Jan, 26 : 12:04 PM

आमदार सरोज अहिरे, आमदार नमिता मुंदडा, राणा जगजितसिंह, झिशान सिद्दीकी, अनिल देशमुख, सुरज चव्हाण, अमोल मिटकरी, नरेश अरोरा, सचिन अहिर यांच्याकडून अजित पवारांना श्रद्धांजली.

29 Jan, 26 : 11:59 AM

खासदार श्रीकांत शिंदे, संजय राठोड, शंभूराज देसाई, प्रकाश आबिटकर, मंगल प्रभात लोढा, आशिष जयस्वाल, श्रीरंग बारणे, खासदार बजरंग सोनावणे, संजय दीना पाटील, माणिकराव कोकाटे यांच्याकडून अजित पवारांना अखेरचा दंडवत.

29 Jan, 26 : 11:57 AM

अभिनेता रितेश देशमुख, खासदार अमोल कोल्हे, राधाकृष्ण विखे-पाटील, आमदार सुरेश धस, विजय शिवतारे, दत्ता मामा भरणे यांच्याकडून अजित पवारांना श्रद्धांजली.

29 Jan, 26 : 11:55 AM

राज्याच्या मंत्री अदिती तटकरे, मंत्री रविंद्र चव्हाण, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, मंत्री जयकुमार गोरे, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे जयंत पाटील, हर्षवर्धन जाधव यांच्याकडून अजित पवारांना श्रद्धांजली.

29 Jan, 26 : 11:53 AM

माजी खासदार प्रीतम मुंडे, राज्याचे मंत्री गिरीश महाजन, काँग्रेस नेते सुशीरकुमार शिंदे, खासदार प्रणिती शिंदे यांनीही वाहिली अजित पवारांना श्रद्धांजली.

29 Jan, 26 : 11:51 AM

विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे, केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे, आंध्र प्रदेशचे मंत्री नारा लोकेश, राज्याच्या मंत्री पंकजा मुंडे, खासदार अशोक चव्हाण यांच्याकडून अजित पवारांना पुष्पचक्र अर्पण 

29 Jan, 26 : 11:49 AM

केंद्रीय मंत्री रामदास आठवले, प्रतापराव जाधव, मुरलीधर मोहोळ, खासदार शाहू छत्रपती राज्याचे मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, छगन भुजबळ यांच्याकडून अजित पवारांना शेवटची श्रद्धांजली. 

29 Jan, 26 : 11:46 AM

भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांची अजित पवार यांना श्रद्धांजली

29 Jan, 26 : 11:45 AM

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडून अजित पवारांना अखेरचा दंडवत.

29 Jan, 26 : 11:30 AM

अजितदादांना अखेरचा निरोप देताना सुनेत्रा पवारांना शोक अनावर

29 Jan, 26 : 11:25 AM

अजित पवार यांचे पुत्र पार्थ आणि जय पवार यांनी अंत्यसंस्काराचे विधी

29 Jan, 26 : 11:14 AM

अजितदादांच्या अंत्यदर्शनासाठी हजारो लोक, अंत्यविधींना सुरुवात

29 Jan, 26 : 11:13 AM

विद्या प्रतिष्ठान परिसरात कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात

29 Jan, 26 : 11:08 AM

अजित पवार अनंताच्या प्रवासाला, अंत्यसंस्कारांना सुरुवात

विद्या प्रतिष्ठान येथे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह अनेक केंद्रीय आणि राज्यातील मंत्री, नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते पोहोचले असून, अजित पवार यांच्यावरील अंत्यसंस्काराला सुरुवात झाली आहे. 

29 Jan, 26 : 10:59 AM

राजकारणात वट असलेला नेता; कराळे गुरुजींकडून अजितदादांना श्रद्धांजली

29 Jan, 26 : 10:58 AM

बारामतीमध्ये जनसागर, अजितदादांच्या अंत्यदर्शनासाठी हजारो लोक

29 Jan, 26 : 10:56 AM

29 Jan, 26 : 10:54 AM

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन बारामतीत

29 Jan, 26 : 10:53 AM

आंध्र प्रदेशचे मंत्री नारा लोकेश यांनी बारामतीत पोहोचले

29 Jan, 26 : 10:51 AM

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत विद्या प्रतिष्ठान येथे आले

29 Jan, 26 : 10:49 AM

डीजीसीए आणि फॉरेन्सिक पथक घटनास्थळी दाखल

29 Jan, 26 : 10:46 AM

अजित पवारांच्या अंत्यदर्शनासाठी लोटला जनसागर

29 Jan, 26 : 10:45 AM

देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे बारामतीत दाखल

आपल्या जवळच्या सहकाऱ्याला अखेरचा निरोप देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे बारामतीत पोहोचले आहेत.

29 Jan, 26 : 10:38 AM

सुशीलकुमार शिंदे बारामतीत आले

अजित पवार यांच्या अंत्यसंस्काराला सुशीलकुमार शिंदे हे मुलगी प्रणिती शिंदे हिच्यासोबत पोहोचले आहेत. राज्यातील अनेक नेते यावेळी बारामतीत दिसत आहेत.

29 Jan, 26 : 10:36 AM

राज ठाकरे आणि रितेश देशमुख विद्या प्रतिष्ठान येथे पोहोचले

राज ठाकरे, त्यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे, अभिनेता रितेश देशमुख, महाराष्ट्रातील अनेक कॅबिनेट मंत्री, राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांचे आमदार, ज्यात झिशान सिद्दीकी, विश्वजीत कदम, नवाब मलिक आणि अनेक मान्यवर अजित पवारांच्या अंत्यसंस्कारासाठी पोहोचले आहेत.

29 Jan, 26 : 10:36 AM

हे नुकसान सहन करण्याची देव आपल्याला शक्ती देवो : धीरज देशमुख

हे खूप दुःखद आहे. आपण सर्वजण या दुःखातून बाहेर पडू शकू, अशी मी देवाला प्रार्थना करतो. आमच्या कुटुंबाचे दादांशी खूप जवळचे नाते होते. मी आमदार झालो, तेव्हा त्यांनी नेहमीच मला मार्गदर्शन केले. त्यांनी महाराष्ट्राच्या हिताला प्राधान्य दिले आणि शेवटपर्यंत प्रामाणिक राहिले. त्यांच्या आत्म्याला शांती लाभो आणि देव आपल्याला हे नुकसान सहन करण्याची शक्ती देवो. आपण महाराष्ट्राच्या राजकारणातील एक महान नेता गमावलाय, अशा शब्दांत काँग्रेस नेते धीरज देशमुख यांनी शोक व्यक्त केला.

29 Jan, 26 : 10:34 AM

अजितदादांना शासकीय मानवंदना; पार्थिव विद्या प्रतिष्ठानच्या दिशेने रवाना

29 Jan, 26 : 10:18 AM

बारामती विमान दुर्घटनेतील पीएसओ विदीप जाधव यांच्यावर रात्री उशिरा अंत्यसंस्कार

मुंबई पोलीस दलात कार्यरत असलेले उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पीएसओ विदीप जाधव यांच्यावर त्यांच्या मूळ गावी, फलटणजवळील तरडगाव येथे रात्री उशिरा अंत्यसंस्कार करण्यात आले. काल बारामती येथे झालेल्या विमान दुर्घटनेमध्ये अजित पवार यांच्यासोबत विदीप जाधव प्रवास करत होते. रात्री साडे अकराच्या सुमारास तरडगावच्या पालखी स्थळावर त्यांच्यावर अंत्यसंस्कार झाले. तरडगावमध्ये रात्री उशिरा पार्थिव पोहोचल्यानंतर अंत्ययात्रा काढण्यात आली. अंत्यविधीच्या ठिकाणी पोलीस सलामी देत त्यांना अखेरचा निरोप देण्यात आला. विदीप जाधव यांच्या निधनाने पोलीस दल, कुटुंबीय, मित्रपरिवार आणि संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे.

29 Jan, 26 : 10:16 AM

अजित पवारांच्या अंत्यदर्शनासाठी लोटला जनसागर, बारामतीत काय घडतंय?

29 Jan, 26 : 10:15 AM

आमदार खासदार धायमोकलून रडले, निलेश लंके, अमोल मिटकरी यांचा आक्रोश

29 Jan, 26 : 10:14 AM

अजित पवारांच्या निवासस्थानी राज ठाकरेंनी वाहिली श्रद्धांजली

29 Jan, 26 : 10:08 AM

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे बारामतीसाठी रवाना

29 Jan, 26 : 10:07 AM

शरद पवार विद्या प्रतिष्ठान येथे पोहोचले, अजित पवारांवर ११ वाजता होणार अंत्यसंस्कार

29 Jan, 26 : 10:05 AM

महाराष्ट्रासाठी मोठी हानी आहे

अपघातस्थळाची पाहणी केल्याची माहिती देताना त्यांनी सांगितलं, “आम्ही हेलिकॉप्टरने अपघात झालेल्या ठिकाणाची पाहणी केली. बारामती विमानतळाची धावपट्टी उंचावर आहे. अपघात नेमका कशामुळे झाला, हे चौकशीअंती स्पष्ट होईल. मात्र अपघाताच्या दिवशी सकाळी परिसरात दाट धुके होतं. विमानाने दोन वेळा लँडिंगचा प्रयत्न केला आणि तिसऱ्या प्रयत्नात असताना हा भीषण अपघात झाला. ही फार मोठी दुर्घटना असून महाराष्ट्रासाठी मोठी हानी आहे.”

29 Jan, 26 : 10:04 AM

अजित पवार म्हणाले होते “आता भेट होणार नाही” आणि तेच घडलं

“काल रात्रीच (मंगळवारी) साडेआठ वाजता अजितदादा आणि आमचं फोनवर बोलणं झालं होतं. ते नेहमीप्रमाणे खुशमीसाज होते. काही वेळ कामाबाबत चर्चा झाली. पण शेवटी शेवटी त्यांनी म्हटलं ‘प्रफुल, आता आपली भेट होणार नाही… मी आठ-दहा दिवस बाहेर आहे.’ आणि अक्षरशः तसंच झालं…” राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांनी अजित पवार यांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेतल्यानंतर माध्यमांशी बोलताना ही भावूक प्रतिक्रिया दिली. बोलताना त्यांचा आवाज भरून आला होता आणि डोळ्यांत अश्रू तरळत होते. प्रफुल्ल पटेल पुढे म्हणाले, “अजितदादा हे अतिशय धडाडीचे, स्पष्टवक्ते आणि लोकप्रिय नेते होते. संपूर्ण महाराष्ट्रात त्यांची प्रचंड ख्याती होती. ते आज आपल्यात नाहीत, यावर अजूनही विश्वास बसत नाही.”

29 Jan, 26 : 09:54 AM

29 Jan, 26 : 09:53 AM

अजित पवार यांचे पार्थिव अंत्यसंस्कारासाठी विद्या प्रतिष्ठानकडे

29 Jan, 26 : 09:18 AM

शरद पवार काटेवाडीतील अजित पवारांच्या निवासस्थानी

बारामतील येथील रुग्णालयातून अजित पवार यांचे पार्थिव काटेवाडी येथील निवासस्थानी आणण्यात आले. यानंतर आता शरद पवार हेही अजित पवारांच्या काटेवाडीतील निवासस्थानी पोहोचले आहेत. थोड्याच वेळात अंत्ययात्रा निघणार असल्याचे सांगितले जात आहे.

29 Jan, 26 : 09:18 AM

काँग्रेसचे विधिमंडळ नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी बारामती इथे जाऊन अजित पवार यांच्या पार्थिवाचे दर्शन घेतले. पवार कुटुंबावर ओढवलेल्या दु:खद प्रसंगानंतर वडेट्टीवार यांनी सुनेत्रा पवार, पार्थ आणि जय पवार यांची भेट घेऊन सांत्वन केले.

29 Jan, 26 : 09:10 AM

अजित पवारांचे अखेरचे दर्शन घेण्यासाठी काटेवाडीत समर्थकांची मोठी गर्दी, शोक व्यक्त

29 Jan, 26 : 09:06 AM

बारामती विमानतळावर घटनास्थळी डीजीसीए आणि फॉरेन्सिक विभागाचे अधिकारी येथे उपस्थित

29 Jan, 26 : 09:05 AM

विद्या प्रतिष्ठानच्या मैदानावर कार्यकर्ते, नेते जमण्यास सुरुवात

29 Jan, 26 : 09:03 AM

अजित पवार यांच्यावर आज सकाळी ११ वाजता विद्या प्रतिष्ठानच्या मैदानावर अंत्यसंस्कार होणार

29 Jan, 26 : 09:02 AM

अजित पवार यांचे पुत्र जय पवार काटेवाडी येथील निवासस्थानी आले

29 Jan, 26 : 08:54 AM

अजित पवारांचा अपघात: पुणे ग्रामीण पोलिसांकडून बारामती तालुका पोलीस ठाण्यात अपघाती मृत्यूची नोंद

पुणे ग्रामीण पोलिसांनी, ज्या विमान अपघातात महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा मृत्यू झाला, त्या संदर्भात बारामती तालुका पोलीस ठाण्यात अपघाती मृत्यूची नोंद (एडीआर) केली आहे. पुढील तपास सुरू करण्यात आला आहे, अशी माहिती पुणे ग्रामीण पोलिसांच्या एका अधिकाऱ्याने दिली.

29 Jan, 26 : 08:52 AM

अंत्यसंस्कारापूर्वी अजित पवार यांचे पार्थिव काटेवाडी येथील घरी आणले

29 Jan, 26 : 08:41 AM

महाराष्ट्राला अजित पवारांची उणीव नेहमीच जाणवत राहील: दीपक केसरकर

आपल्या राज्याचे मोठे नुकसान झाले आहे. महाराष्ट्राला अजित पवारांची उणीव नेहमीच जाणवत राहील. प्रशासनावरील त्यांची मजबूत पकड, त्यांचा वक्तशीरपणा आणि त्यांचा मेहनती स्वभाव या गुणांसाठी ते नेहमीच स्मरणात राहतील, असे दीपक केसरकर यांनी म्हटले आहे.

29 Jan, 26 : 08:32 AM

राजकारणापलीकडली माणुसकी; अजित पवार यांच्या निधनानंतर उद्धव ठाकरे कुटुंबीय बारामतीत

29 Jan, 26 : 08:32 AM

उद्धव ठाकरे मध्यरात्री बारामतीत.. पवार कुटुंबीयांची सांत्वनपर भेट

राज्याच्या राजकारणात शोककळा पसरवणाऱ्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर सर्व स्तरांतून हळहळ व्यक्त केली जात आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना (ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राजकारणापलीकडे जाऊन माणुसकीचे दर्शन घडवत बारामती येथे पवार कुटुंबीयांची मध्यरात्री सांत्वनपर भेट घेतली. उद्धव ठाकरे मंगळवारी रात्री उशिरा बारामतीत पवारांच्या निवासस्थानी दाखल झाले. यावेळी त्यांनी पवार कुटुंबीयांची प्रत्यक्ष भेट घेत अजित पवार यांच्या आकस्मिक निधनाबद्दल शोक व्यक्त केला. कुटुंबीयांशी संवाद साधत त्यांनी या दुःखद प्रसंगी धीर दिला आणि संवेदना व्यक्त केल्या.

29 Jan, 26 : 08:30 AM

29 Jan, 26 : 08:28 AM

अजित पवारांना स्वच्छता खूप आवडत असे, बारामतीत गावकरी, कार्यकर्ते कामाला, परिसर केला स्वच्छ

29 Jan, 26 : 08:19 AM

29 Jan, 26 : 08:16 AM

विद्या प्रतिष्ठानच्या मैदानावर अंत्यसंस्काराची तयारी सुरू

29 Jan, 26 : 08:03 AM

अजित पवारांचे पार्थिव काटेवाडीकडे रवाना, थोड्याच वेळात पोहोचणार

29 Jan, 26 : 08:00 AM

ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या मार्गदर्शनाकडे लाखोंचे लक्ष

राष्ट्रवादीच्या दोन गटांचे विलीनीकरण होणार, अशी चर्चा गेले होत असतानाच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली निधनानंतर आता एकूणच राष्ट्रवादीच्या पुढील प्रवासाबाबत दोन्ही गट काय निर्णय घेतात याविषयीची स्पष्टता लवकरच येईल. मात्र, अजितदादांच्या जाण्याने दोन्ही गटांना भावनिकदृष्ट्या अधिकच जवळ आणले आहे.

29 Jan, 26 : 08:00 AM

वातावरणाचा अंदाज घेऊन अजित पवार निघाले होते

विमानाने सकाळी लवकर बारामतीला निघायचे होते. राज्यात थंडी वाढल्याने सकाळी बहुतांश भागात धुके असते. त्यामुळे विमान उतरण्यासाठी बारामतीतील वातावरण कसे आहे याची माहिती घेण्यात आली. वातावरण चांगले असल्याचा निरोप आल्यानंतर ७:३० वाजता अजित पवार देवगिरीवरून विमानतळाकडे जायला निघाले. निघताना त्यांनी महत्त्वाची कागदपत्रे आणि काही निवेदनेही आपल्यासोबत घेतली होती.

29 Jan, 26 : 07:59 AM

अजितदादा शेवटपर्यंत कामात होते व्यग्र; अपघातस्थळी कागदांचा ढीग

नेहमी शासकीय बैठकांमध्ये, राजकीय कार्यक्रमात आणि लोकांच्या गराड्यात राहणारे अजित पवार बुधवारी हे सगळे सोडून निघून गेले. मात्र, अजित पवारांच्या निधनापर्यंतही ते आपल्या कामात व्यस्त असल्याचे दिसून आले. निधनाच्या दिवसाची सकाळ आणि त्याआधीचा संपूर्ण दिवस अजित पवार कामात व्यस्त होते.

29 Jan, 26 : 07:58 AM

पायलटची चूक होती की तांत्रिक बिघाड?

अजित पवार यांना घेऊन जाणाऱ्या विमानाचा अपघात नेमका कशामुळे झाला? या घटनेमागे तांत्रिक बिघाड होता की मानवी चूक, याबाबत आता तर्क-वितर्क लढवले जात आहेत. 'बंबार्डिअर लिअरजेट ४५ एक्सआर' या ८ सीटर विमानाला लँडिंगदरम्यान हा अपघात झाला. विमान लँड करताना पायलटला दिसणाऱ्या धावपट्टीचा अंदाज घेऊनच विमान उतरवावे लागते. बाहेरून त्यांना मदत देणे शक्य होत नाही. त्यामुळे ही पायलटची चूक होती की, ऐनवेळी तांत्रिक बिघाड झाला, याचा तपास सध्या सुरू आहे.

29 Jan, 26 : 07:57 AM

लोकसभेत अजित पवार यांना श्रद्धांजली

लोकसभेने बुधवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह बांगलादेशच्या माजी पंतप्रधान खालिदा झिया तसेच अलीकडेच निधन झालेल्या लोकसभेच्या पाच माजी सदस्यांना श्रद्धांजली वाहिली. माजी लोकसभा सदस्य असलेले अजित पवार यांचे बुधवारी विमान अपघातात निधन झाले, अशी माहिती लोकसभेत देण्यात आली.

29 Jan, 26 : 07:57 AM

विमान वाहतुकीचे आजचे नियोजन हवाई दलाकडे

अजित पवारांच्या अंत्यसंस्कारासाठी पंतप्रधानांसह देशभरातील अनेक प्रमुख नेते उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे बारामती विमानतळावर मोठ्या संख्येने विमानांची ये-जा होणार आहे. परिस्थिती लक्षात घेऊन विमान वाहतुकीचे नियोजन करण्याची विनंती महाराष्ट्र सरकारने भारतीय हवाई दलाला केली आहे. 

29 Jan, 26 : 07:56 AM

राज्यात तीन दिवसांचा दुखवटा

अजित पवार यांच्या निधनाबद्दल राज्य सरकारने बुधवारी संपूर्ण महाराष्ट्रात तीन दिवसांचा शासकीय दुखवटा जाहीर केला आहे. २८ ते ३० जानेवारी या कालावधीत शासकीय दुखवटा पाळण्यात येणार आहे. 

29 Jan, 26 : 07:56 AM

अजित पवारांना अखेरचा निरोप देण्यासाठी बारामतीत जनसार

अजित पवार यांच्यावर शासकीय इतमामात  अंत्यसंस्कार करण्यात येतील. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह यांच्यासह देशभरातील अनेक प्रमुख नेते उपस्थित राहणार आहेत.  अजित पवार यांना अखेरचा निरोप देण्यासाठी बारामतीत कार्यकर्ते, नेते, पवार कुटुंबाला मानणाऱ्यांचा जनसागर लोटला आहे.

29 Jan, 26 : 07:54 AM

अजित पवार यांचे पार्थिव काटेवाडी गावात नेण्यात आले

29 Jan, 26 : 07:53 AM

सकाळी ११ वाजता विद्या प्रतिष्ठानच्या मैदानावर अंत्यसंस्कार

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पार्थिवावर गुरुवारी (दि. २९) सकाळी ११ वाजता विद्या प्रतिष्ठानच्या मैदानावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. तत्पूर्वी सकाळी ९ वाजता त्यांची अंत्ययात्रा निघणार आहे. 

Web Title: Ajit Pawar Last Rites Funeral Live Updates Maharashtra Deputy CM & NCP Leader to be cremated at 11 am today at vidya pratishthan in Baramati