शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
2
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
3
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
4
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
5
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
6
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
7
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
8
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
9
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
10
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
11
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
12
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
13
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
14
Chanakya Niti: शून्यातून विश्व निर्माण करायचंय? आचार्य चाणक्यांचे 'हे' १० विचार तुम्हाला नक्कीच दिशा देतील
15
९० दिवसांत २८ मृत्यू, मग पुजाऱ्याने दिला 'असा' सल्ला, संपूर्ण गाव झाला रिकामी, आता...  
16
काँग्रेस नेते राजेंद्र भारती यांची आमदारकी रद्द! २७ वर्षांपूर्वीचे प्रकरण काय, ज्यामुळे गमावले विधानसभा सदस्यत्व?
17
FASTag Annual Pass: "पैसे वाया घालवू नका! 'या' हायवेवर आता FASTag वार्षिक पास चालणार नाही; नवीन यादी जाहीर
18
आई वडिलांना न सांभाळणाऱ्या कर्मचाऱ्यांची खैर नाही; १५% पगार कापणार, तेलंगणा सरकारचा निर्णय
19
पगार झाला की खिशाला 'कात्री'? महिनाअखेरची ओढताण टाळण्यासाठी 'हे' ५ आर्थिक मंत्र नक्की पाळा
20
PSL 2026: भर मैदानात डेव्हिड वॉर्नर- मोईन अली यांच्यात तू-तू मैं-मैं; व्हिडीओ व्हायरल, नेमकं काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

उद्या, परवा शाळांना सुट्टी? पालकांमध्ये संभ्रम, शाळांकडूनही काही मेसेज येईना; सरकारचा नेमका आदेश काय...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2026 22:31 IST

School Holiday Update Maharashtra: अजित दादांच्या निधनामुळे राज्यातील सर्व सरकारी आणि खाजगी शाळा तसेच महाविद्यालये आज अपघाताच्या दिवशी बंद ठेवण्यात आली होती.

मुंबई: उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर महाराष्ट्र सरकारने राज्यात तीन दिवसांचा राजकीय शोक जाहीर केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यासंदर्भातील अधिकृत आदेश दिले असून, संपूर्ण राज्यात शोककळा पसरली आहे.

अजित दादांच्या निधनामुळे राज्यातील सर्व सरकारी आणि खाजगी शाळा तसेच महाविद्यालये आज अपघाताच्या दिवशी बंद ठेवण्यात आली होती. २८ जानेवारी ते ३० जानेवारी २०२६ या काळात राज्यात अधिकृत दुखवटा पाळला जाणार आहे. म्हणजेच दुखवटा पाळून सरकारी कार्यालये २९ आणि ३० जानेवारीला सुरु राहणार आहेत. तसेच शाळाही सुरु राहणार आहेत. या काळात कोणताही सरकारी सार्वजनिक उत्सव किंवा मनोरंजन कार्यक्रम होणार नाही, असा त्याचा अर्थ आहे. 

पालकामध्ये संभ्रम...अजित पवार यांच्या निधनामुळे दुखवटा पाळण्यात येणार आहे. सुट्टी जाहीर करण्यात आलेली नाही. पालकांमध्ये संभ्रमाचे वातावरण असताना राज्य सरकारने महत्वाचा खुलासा केला आहे. शिक्षण विभागाचे संचालक डॉ. महेश पालकर यांनी राज्यातील सर्व माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळा तसेच कनिष्ठ महाविद्यालयांना केवळ बुधवारी सार्वजनिक सुटी जाहीर केली होती. मात्र, सुटीची सूचना येईपर्यंत सकाळच्या सत्रातील कनिष्ठ महाविद्यालये आणि शाळांना सत्र पूर्ण करून सोडण्यात आल्या होत्या. तथापि, दुपारच्या सत्रातील शाळा सुरू झाल्यानंतर शासनाचे निर्देश सुटीची सूचना शाळांना आली. गुरुवारपासून मात्र, शाळांचे वर्ग नेहमीप्रमाणे भरतील, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

राजकीय शोकाचे नियम: ध्वज अर्ध्यावर: या तीन दिवसांच्या काळात राज्यातील सर्व शासकीय इमारतींवरील राष्ट्रध्वज अर्ध्यावर उतरवण्यात येतील. सरकारी कार्यक्रम रद्द: या काळात राज्य सरकारचा कोणताही अधिकृत मनोरंजन किंवा सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केला जाणार नाही. शासकीय अंत्यसंस्कार: उद्या २९ जानेवारी रोजी बारामती येथे अजित पवार यांच्यावर पूर्ण शासकीय इतमामात अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.

English
हिंदी सारांश
Web Title : School Holiday Confusion After Pawar's Death: Government Clarifies Schedule

Web Summary : Following Ajit Pawar's death, Maharashtra declared three days of mourning. Schools were closed Wednesday, but will reopen Thursday. Government offices remain open with no public celebrations. Confusion arose among parents regarding additional holidays. State clarifies schools resume as normal.
टॅग्स :Ajit Pawarअजित पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसMaharashtraमहाराष्ट्रPlane Crashविमान दुर्घटनाHolidayसुट्टीSchoolशाळा