उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर अजितदादा मला भेटले; शरद पवारांनी सांगितली माफीची वेळ

By ऑनलाइन लोकमत | Published: December 2, 2019 08:45 PM2019-12-02T20:45:32+5:302019-12-02T20:46:50+5:30

अजित पवार यांच्याशी कुटुंबातील कोणी बोलल्याचे माहिती नाही. पण सर्वांचे एकच म्हणणे होते की अजितने घेतलेला निर्णय चुकीचा आहे. बैठकांना हजर असल्याच्या आमदारांच्या सह्या घेऊन तो राज्यपालांकडे गेला. काँग्रेसशी मतभेद झाल्याचा राग होता.

Ajit Dada met me after taking oath as deputy chief minister; Time told by Sharad Pawar | उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर अजितदादा मला भेटले; शरद पवारांनी सांगितली माफीची वेळ

उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर अजितदादा मला भेटले; शरद पवारांनी सांगितली माफीची वेळ

Next

मुंबई : विधानसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्राने मोठा राजकीय भूकंप अनुभवला होता. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी भाजपसोबत जात सकाळीच उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती. यावर शरद पवारांनी धक्कादायक खुलासे केले आहेत. 


एबीपी माझाने आज शरद पवार यांची मुलाखत घेतली. यामध्ये पवार यांनी मोठे खुलासे केले. देवेंद्र फडणवीसांना वाटत होतो की आधी आमच्य़ाशी बोलावे. दिल्लीत जेव्हा भाजपा नेत्यांना भेटायचो तेव्हा ते सांगायचे की एकत्र येऊन काम केले पाहिजे. अजित पवारांनी मला विचारले, की फडणवीस बोलण्यासाठी बोलावत आहेत. त्याला मी सांगितले की बोलण्यात काय गैर आहे, जा. यानंतर अजितने देवेंद्र फडणवीस यांचे म्हणणे मला सांगण्याचा प्रयत्न केला. परंतू मी थोडे थांबण्यास सांगितले. भाजपाची मते जाणून घ्यायची होती. मी नंतर ऐकेन असे सांगितल्याचे पवार म्हणाले.


मात्र, त्यानंतर अजितने उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. यावेळी त्याच्यासोबत जे आमदार गेले होते त्यांना माझे नाव सांगून नेले असण्याची शक्यता आहे. इकडे शिवसेनेशी चर्चांनी वेग घेतला. संजय राऊतांनी स्पष्ट सांगितले की आम्ही सोबत यायला तयार आहोत. यानंतर काँग्रेससोबत बोललो. अजित पवार यांच्याशी कुटुंबातील कोणी बोलल्याचे माहिती नाही. पण सर्वांचे एकच म्हणणे होते की अजितने घेतलेला निर्णय चुकीचा आहे. बैठकांना हजर असल्याच्या आमदारांच्या सह्या घेऊन तो राज्यपालांकडे गेला. काँग्रेसशी मतभेद झाल्याचा राग होता. त्यातून हे सारे घडल्याचा खुलासा पवारांनी केला. 


अजित पवारांनी जेव्हा बोलणे केले तेव्हा त्यांना आजचे आज शपथ घेणार असाल तर पाहू असे सांगण्यात आले. यामुळे अजितने घाईघाईत निर्णय घेतला. मी विश्रांती घेत होतो. सकाळी मला घरातूनच कोणाचातरी फोन आला तेव्हा समजले. याचाशी तडजोड न करता ही चूक मोडून काढायची असा निर्णय घेतल्याचे पवारांना सांगितले. 

 

अजित पवार कधी भेटले?
महाराष्ट्रातील निर्णय अजित पवार घेतात. महाराष्ट्राला माझा यात सहभाग नव्हता या संदेश द्यायचा होता. पत्रकार परिषदेत मी भूमिका मांडली. यानंतर लोकांना विश्वास पटला. दुसऱ्या दिवशी अजित पवार सकाळी सहा वाजता मला भेटायला आले. चूक झाल्याची माफी मागितली. याची काय असेल ती शिक्षा भोगायला तयार आहे. मी त्याला तू अक्षम्य चूक केल्याचे सांगितले. तसेच किंमत मोजायला तू अपवाद नसल्याचेही सांगितले, असा गौप्यस्फोट शरद पवारांनी केला. 

पक्षाच्या नेत्यांना अजित दादा तप्तर धावून जातात, त्यांची काम करण्याची धडाडी आणि कार्यकर्त्यांचा पाठिंबा पाहून या नेत्यांनी अजित पवारांवर कारवाई न करण्याची विनंती केली. यामुळे मी त्याला माफ केल्याचेही पवारांनी सांगितले. तसेच उद्धव ठाकरेंच्या शपथविधीवेळी अजितला शपथ देणे योग्य वाटत नव्हते. कारण राज्यात माझ्याबाबत वेगळा संदेश गेला असता म्हणून अजित पवारांनी शपथ घेतली नसल्याचाही खुलासा शरद पवारांनी केला. 

Web Title: Ajit Dada met me after taking oath as deputy chief minister; Time told by Sharad Pawar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.