शहरं
Join us  
Trending Stories
1
अमराठी रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य कशी करावी?; महत्त्वपूर्ण बैठकीत आज होणार मंथन
2
‘मिसिंग लिंक’ मार्गावर कार, बसलाच एंट्री, टोलवाढ नाही; मुंबई-पुणे अंतर ६ किमीने कमी
3
आजचे राशीभविष्य - २७ एप्रिल २०२६, वडील व वडीलधार्‍यांकडून लाभ होईल, समाजात मान-प्रतिष्ठा वाढेल
4
एमआयडीसी मुख्यालय निविदेला पाचवी मुदतवाढ; ‘रतन टाटा उद्योग भवन’ प्रकल्पाला मिळणार वेग
5
कुजबुज! सत्ता नसूनही ठाकरेंची तारेवरची कसरत; गायकवाडांवरही होऊ शकते पुस्तक
6
मेट्रो ६ मार्गासाठी पश्चिम रेल्वेवर ४२ मीटर स्टील स्पॅनची उभारणी; काय आहेत वैशिष्ट्ये?
7
‘रेलवन’वर बुकिंग फसले अन् वॉलेटमध्येच रक्कम अडकली; प्रवासी नाराज, पैसे परत देण्याची मागणी
8
२२ वर्षीय मुलीची क्रूर हत्या, अवघ्या ५ दिवसांत गुन्ह्याचा छडा; आरोपीला ठाण्यातून केली अटक
9
मुंबईकरांनो, तुम्ही रामभरोसे बाहेरचे पदार्थ खाताय..! महाराष्ट्रात एफडीए इन्स्पेक्टरची वानवा
10
‘त्यांना’ मराठीची परीक्षा देऊन पदवी घ्यायची नाही; परिवहन मंत्र्यांनी मांडली स्पष्ट भूमिका
11
तुम्ही रिक्षा-टॅक्सीवाल्यांची उपजीविका नष्ट करताय; मराठी सक्तीला शशांक राव यांचा आक्षेप
12
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
13
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
14
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
15
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
16
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
17
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
18
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
19
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
20
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
Daily Top 2Weekly Top 5

अजिंठा लेणीत ९० ठिकाणे बनली धोकादायक!

By admin | Updated: September 23, 2014 04:52 IST

अजिंठा लेणीत मागील तीन महिन्यांत मुरूम व दगडांच्या दोन दरडी कोसळल्या होत्या. त्यातच लेणी क्रमांक २६ समोर पुन्हा दरड कोसळल्याची घटना काही दिवसांपुर्वी घडली होती

श्यामकुमार पुरे, अजिंठा (जि़ औरंगाबाद)अजिंठा लेणीत मागील तीन महिन्यांत मुरूम व दगडांच्या दोन दरडी कोसळल्या होत्या. त्यातच लेणी क्रमांक २६ समोर पुन्हा दरड कोसळल्याची घटना काही दिवसांपुर्वी घडली होती. सकाळी लेणीत पर्यटक नसतात म्हणून जीवितहानी झाली नाही. लेणीत अशी ९० ठिकाणे धोकादायक असल्याचा अहवाल पुरातत्त्व विभागाला प्राप्त झाला आहे.लेणीच्या माथ्यावर मोठा डोंगर आहे. दरवर्षी पावसाळ्यात या डोंगराची माती मोकळी होऊन कधी मोठ्या, तर कधी लहान-लहान दरडी कोसळत असतात. १९९८पासून ते २०१४पर्यंत १६ वर्षांत भारतीय रेल्वे रिसर्च संस्था, सेंटर मायनिंग रिसर्च संस्था, दिल्ली, जीएसआय सर्व्हे आॅफ इंडिया, भारतीय भूगर्भतज्ज्ञ, नागपूर या संस्थांनी अनेकवेळा संशोधन केले. त्यात अजिंठा लेणीच्या माथ्यावरील ९० ठिकाणच्या दरड (बोल्डर) धोकादायक बनल्याचा अहवाल पुरातत्त्व विभागाला दिला आहे. नैसर्गिक आपत्ती, भूकंप, मोठ्या पावसामुळे या दरडी कधीही पडू शकतात. म्हणून ते दगड काढून टाकावेत किंवा लेणीच्या डोंगर माथ्यावर स्टीलनेट जाळी लावावी, अशा सूचना (अहवाल) २०१०मध्येच पुरातत्त्व विभागाला दिल्या होत्या. तो अहवाल पुरातत्त्व विभागाने युनेस्कोकडे तीन वर्षांपूर्वी पाठविलाही होता; पण त्या समितीने पर्यायी व्यवस्था करण्याचा प्रस्ताव फेटाळून लावला होता. त्यामुळे पुरातत्त्व विभाग याबाबत निर्णय घेऊ शकले नाही, अशी माहिती सूत्रांनी दिली. पण यामुळे येथे येणाऱ्या पर्यटकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे.