शहरं
Join us  
Trending Stories
1
Election Results 2026 LIVE: ५ राज्यांमध्ये 'सत्ता'धीश कोण?, आज होणार फैसला; पश्चिम बंगालकडे सगळ्यांचे लक्ष
2
बंगालमध्ये तृणमूल-भाजपामध्ये अटीतटीची लढत, सुरुवातीच्या कलांमध्ये कुणाला आघाडी? अशी आहे आकडेवारी
3
Tamil Nadu Elections 2026: विजय थलपती ते खुशबू सुंदर... पडद्यावरच्या कलाकारांची प्रतिष्ठा पणाला, कोण मारणार बाजी?
4
भाजपासाठी पश्चिम बंगाल ठरणार 'लास्ट फ्रंटियर'; जय-पराजयाचा परिणाम 'मिशन UP' वर पडणार?
5
Post Office ची कमाई करुन देणारी स्कीम, जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹४४,९९५ चं फिक्स व्याज; मिळतेय सरकारची 'गॅरेंटी'
6
राज्यात दर ५३ मिनिटांनी एका चिमुकलीवर अत्याचार; नराधमांना कोण रोखणार?
7
'राजा शिवाजी'चं वीकेंड कलेक्शन किती? समोर आले आकडे; मराठी प्रेक्षकांची मान उंचावली
8
पश्चिम बंगालमधील या दोन मतदारसंघात 'कांटे की टक्कर', निकालाकडे संपूर्ण देशाचं लक्ष
9
आजचे राशीभविष्य, ०४ मे २०२६: मिथुन, वृश्चिक, मकर राशींना धनलाभाचे संकेत; कसा असेल तुमचा दिवस?
10
पाच राज्यांच्या भविष्याचा आज फैसला; प.बंगाल, तामिळनाडूच्या निकालावर नजरा
11
पाऊस चोरणारे देश? अमेरिका-इस्रायलवर 'ढगचोरी'चा खळबळजनक आरोप; प्रकरण काय?
12
राज्यात पहिलीपासून तिसऱ्या भाषेचा मुद्दा यंदाच्या वर्षी बारगळण्याची चिन्हे; डॉ. नरेंद्र जाधव समितीच्या अहवालावर निर्णय प्रलंबित
13
आधी नराधमाला फाशी द्या, मगच या...नसरापूरच्या पीडित पित्याचा संताप, न्यायाची केली मागणी; राजकीय नेत्यांच्या गर्दीने कुटुंब व्यथित
14
पाकिस्तान, चीन सीमेवर भारताची अहोरात्र ‘दृष्टी’; ‘गॅलेक्सआय’ या भारतीय स्टार्टअपचा उपग्रह लाँच
15
एसीच्या स्फोटाने आग; दिल्लीत ९ जणांचा मृत्यू; जळालेल्या आईच्या मिठीत होता मुलाचा मृतदेह
16
परीक्षा नव्हे, बोर्डच ‘नॉमिनल’ ! निकालात उच्चांक गाठणारे बोर्ड आता का मागे पडले?
17
मिसिंग लिंकवर सेल्फीसाठी थांबलात तर होईल मोठा ताप; वाहतूक पोलिसांकडून दाेन दिवसांत ९० वाहनांवर दंडात्मक कारवाई
18
या रक्तरंजित काळात कोहिनूरची आठवण का व्हावी?
19
कामगारांचा संताप आता रस्त्यावर उतरू लागला आहे, कारण..
20
सॉल्टलँड, परप्रांतीय आणि कॉन्स्टेबलचा मृत्यू..!
Daily Top 2Weekly Top 5

आता अहमदनगर नव्हे तर 'अहिल्यानगर'! नामांतराच्या प्रस्तावाला केंद्राची मंजुरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2024 18:52 IST

राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर केंद्र सरकारने या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे.

मुंबई : महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्हा आता 'अहिल्यानगर' या नावाने ओळखला जाणार आहे. अहमदनगर जिल्ह्याचे नामांतर अहिल्यानगर करण्यास केंद्रीय मंत्रिमंडळाने शुक्रवारी मंजुरी दिली आहे. यासंदर्भात राज्याचे मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी माहिती दिली आहे. 

अहमदनगरच्या नामांतराची मागणीही अनेक वर्षांपासून होत होती. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात सत्ताधारी नेत्यांनी यासंदर्भात वक्तव्येही केली होती. त्यामुळे राज्य मंत्रिमंडळाने नामांतराची मागणी मान्य करून व विधानसभेत तसा ठराव पारित केला होता. त्यानंतर राज्य सरकारने अहमदनगर जिल्ह्याचे नामकरण अहिल्यानगर करण्याचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवला होता. तो आता मंजूर झाला आहे.

राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर केंद्र सरकारने या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. त्यामुळे या निर्णयामुळे अहमदनगर जिल्ह्यातील नागरिकांनी आनंद व्यक्त केला आहे. दरम्यान, राज्य सरकारने याआधी औरंगाबाद आणि उस्मानाबाद जिल्ह्याचे देखील अनुक्रमे छत्रपती संभाजीनगर आणि धाराशीव असे नामकरण केले आहे. 

काय म्हणाले राधाकृष्ण विखे पाटील? अहमदनगरचे नामांतर अहिल्यानगर केल्यानंतर मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केंद्र सरकारचे आभार मानले आहेत. ते ट्विटद्वारे म्हणाले, "अहिल्यानगर नामांतराची वचनपूर्ती!!! नगर जिल्ह्याचे नामांतर अहिल्यानगर करण्याच्या प्रस्तावाला केंद्र सरकारने मंजुरी दिली.आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत जिल्ह्याचे नामकरण अहिल्यानगर करण्यास मान्यता मिळाल्याने वचनपूर्ती झाल्याचा मनस्वी आनंद आहे. निर्णय होण्याकरीता सहकार्य करणारे विश्वनेते पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचे मनापासून आभार."

टॅग्स :AhmednagarअहमदनगरMaharashtraमहाराष्ट्र