शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

कृषी विद्यापीठातून पदवी परीक्षेच्या उत्तरपत्रिका गहाळ !

By admin | Updated: September 2, 2015 02:13 IST

कृषी विद्यापीठाच्या द्वितीय वर्षाच्या सूक्ष्म जीवशास्त्र व इतर विषयांच्या शंभर उत्तरपत्रिका गहाळ; चौकशी समितीचे गठन.

अकोला : डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या कृषी पदवी परीक्षेच्या उत्तरपत्रिका गहाळ झाल्याचे वृत्त असून, याप्रकरणी कृषी विद्यापीठाने कृषी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. महेंद्र नागदेवे यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती गठित करण्यात आली आहे. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या द्वितीय वर्षाच्या सूक्ष्म जीवशास्त्र व इतर विषयांच्या शंभर उत्तरपत्रिका गहाळ झाल्या आहेत; परंतु निकाल जोपर्यंत लागणार नाही तोपर्यंत या गुणपत्रिका नेमक्या कोणत्या केंद्रावरील होत्या, हे समजणे कृषी विद्यापीठाला कठीण झाले आहे. त्यामुळे आता निकालाची प्रतीक्षा सुरू आहे. याप्रकरणी कृषी विद्यापीठाने पोलीस तक्रार करू न पाठपुरावा करणे अपेक्षित होते; परंतु विद्यापीठ प्रशासन याबाबत गंभीर नसल्याचा आरोप होत आहे. गतवर्षी १00 उत्तरपत्रिका गहाळ झाल्या होत्या. नेमक्या याच विद्यापीठात उत्तरपत्रिका गहाळ कशा होतात, यामागे एखादे रॅकेट तर नाही, असे प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहेत. दरम्यान, डॉ. नागदेवे समिती एक-दोन दिवसात या प्रकरणी चौकशीला सुरुवात करणार असून, लवक रच आपला अहवाल कृषी विद्यापीठ प्रशासनाला सादर करणार आहे. उत्तरपत्रिका गहाळ झाल्या. त्याचा छडा लागणे कठीण आहे. निकाल लागल्यावरच कोणत्या उत्तरपत्रिका गहाळ झाल्या, हे कळेल. उत्तरपत्रिका न सापडल्यास विद्यार्थ्यांची पुनर्परीक्षा घ्यावी लागणार असल्याचे विद्यापीठाचे जनसंपर्क अधिकारी डॉ. किशोर बिडवे यांनी स्पष्ट केले.