शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकला जमेना, भारत मध्यस्थी करणार? अमेरिका-इराण शांतता चर्चेबाबत घडामोडींना वेग, जगाचे लक्ष लागले!
2
मोठी घडामोड! होर्मुज सामुद्रधुनी खुली करण्यासाठी तब्बल ३० देश एकवटले, ब्रिटन-फ्रान्सच्या नेतृत्वात मोहीम! भारताची भूमिका काय?
3
Top Marathi News LIVE Updates:राजस्थानमध्ये भीषण अपघात; स्कूल बसला ट्रकची जोरदार धडक
4
पत्नी व्हिडीओ कॉलवर बोलत होती, पतीने पाहिले, मुलाला म्हणाला, ‘जा टीव्ही बघ’, त्यानंतर...
5
ऑल टाईम हायपेक्षा २३,८७१ रुपयांनी स्वस्त मिळतंय Gold; आज सोन्या-चांदीच्या दरात घसरण, पाहा नवी किंमत
6
धक्कादायक! घरातच बलात्कार करुन मोबाईल चार्जरने गळा आवळला; दिल्लीत IRS अधिकाऱ्याच्या मुलीसोबत अमानवीय कृत्य
7
लाज आणली रे लाज आणली! हॉटेल कर्मचाऱ्यांनी सुटकेस उघडायला लावली, बालीमध्ये भारतीयांच्या चोरीचा Video व्हायरल
8
Jara Hatke: बिस्किट चहात बुडवून खायचं हे ठरवलं कुणी? कशी होती बिस्किटांची मूळ चव? माहितीय?
9
इराणला दररोज ४१०० कोटींचा फटका, तरीही चर्चेला आला नाहीय! डोनाल्ड ट्रम्प यांचे 'अखेरचे शस्त्र' ठरणार निर्णायक?
10
पेट्रोल-डिझेल विसरा, आता १००% इथेनॉलवर चालणाऱ्या गाड्या; नितिन गडकरी नेमकं काय म्हणाले?
11
विजय केडियांनी खरेदी केले 'या' कंपनीचे ४४ लाख शेअर्स, स्टॉकला लागलं अपर सर्किट; ५ वर्षांत २१००% चा रिटर्न
12
"जिंकाच, अन्यथा पर्याय नाही.."; एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची सत्तेची ‘पॉवर ब्लूप्रिंट’ तयार
13
अमरावती लैंगिक शोषण प्रकरण: मुख्य आरोपी अयान अहमदची अचलपूर शहरातून धिंड; गुन्ह्यातील पुराव्यांचा शोध सुरू
14
"रस्ता ब्लॉक होणारच, थोडा त्रासही होतोच, पण..."; 'त्या' मुद्द्यावर गिरीश महाजनांची प्रतिक्रिया
15
गुरुवारी गुरुपुष्यामृत योग: आवर्जून स्वामी सेवा करा; मनातील इच्छापूर्ती, अशुभता दूर होईल!
16
डोळ्यांवर पट्टी, हात-पाय बांधले... वेस्टर्न स्टाईल प्रपोजच्या बहाण्याने बॉयफ्रेंडला जिवंत जाळलं
17
कर्नाटकात होमस्टेमध्ये अमेरिकन महिलेवर अत्याचार; मालकाने तीन दिवस वायफाय बंद ठेवले, कर्मचाऱ्यालाही अटक
18
भाजप महिला आरक्षणाची सिरियल किलर, सामान्य महिलेने दाखवला खरा आक्रोश, वडेट्टीवार यांचा टोला
19
इराणला मिळाले नवे 'अण्वस्त्र'; अमेरिकेचीही पंचाईत, डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून ताबा घेण्याचा प्रयत्न
20
न्यूड व्हिडीओ कॉलसाठी २० हजार दे; अभिनेत्रीचे विद्यार्थ्यासोबतचे अश्लील चॅट व्हायरल, सोशल मीडियावर खळबळ
Daily Top 2Weekly Top 5

कृषी तंत्रज्ञान पदविका अभ्यासक्रम मराठीत!

By admin | Updated: July 22, 2015 22:46 IST

विदर्भातील तीन कृषी तंत्र विद्यालयांचा समावेश.

अकोला : राज्यातील चारही कृषी विद्यापीठांतर्गत असलेला तीन वर्षाचा कृषी तंत्रज्ञान पदविका अभ्यासक्रम पुन्हा दोन वर्षांचा करण्यात आला आहे. यापुढे हा अभ्यासक्रम इंग्रजीऐवजी मराठीतून शिकवला जाणार आहे. महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन (एमसीईएआर) परिषदेच्या सभेत मागील आठवड्यात हा निर्णय घेण्यात आला आहे. विदर्भातील मलकापूर, सिंदखेडराजा व करडा या तीन कृषी तंत्र विद्यालयांचा यामध्ये समावेश आहे. चारही कृषी विद्यापीठांतर्गत मराठी माध्यम दोन वर्षाचा कृषी तंत्र पदविका, इंग्रजी माध्यमातील कृषी तंत्रज्ञान तीन वर्ष आणि मत्स्य अभियांत्रिकी पदविका तीन वर्षाचा अभ्यासक्रम सुरू आहे. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठांतर्गत विदर्भात ४६ खासगी कृषी तंत्रनिकेतन असून, कृषी विद्यापीठाच्या ९ तंत्रनिकेतन शाळांचा समावेश आहे. सुरुवातीला या सर्व शेतकी शाळा होत्या. शेतीशी निगडित दोन वर्षांचा अभ्यासक्रम मराठीत शिकवला जात होता; तथापि गत तीन वर्षांपूर्वी शेतकी शाळेचे रू पांतर कृषी तंत्रनिकेतनमध्ये करण्यात आले असून, हा अभ्यासक्रम इंग्रजी माध्यमात तीन वर्षांचा करण्यात आला आहे. यंदा प्रथमच पहिल्या तुकडीचा निकाल लागला आहे. विदर्भातील ४६ खासगी कृषी तंत्रनिकेतनचा निकाल केवळ १२ टक्के लागला आहे. दरम्यान, मराठी अभ्यासक्रमाच्या मुलांना इंग्रजीचा सामना करावा लागल्याने निकाल कमी लागला असल्याचे कृषी तज्ज्ञांचे मत आहे. या सर्व पृष्ठभूमीवर खासगी कृषी तंत्रनिकेतन संस्थाचालकांनी हा अभ्यासक्रम इंग्रजीऐवजी मराठीतून शिकवण्यासाठीची एमसीईएआरकडे परवानगी मागितली होती. संस्थाचालकांची मागणी विचारात घेऊन एमसीईएआरने इंग्रजीचा मराठी माध्यमात बदल केला आहे. यामध्ये महात्मा फुले कृषी विद्यापीठांतर्गत २६ विद्यालयांचा समावेश असून, स्व. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठांतर्गत १३, डॉ.बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ व डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठांतर्गत प्रत्येकी ३ कृषी तंत्र विद्यालयाचा समावेश आहे. दरम्यान, इंग्रजी माध्यमातील तीन वर्षांचा अभ्यासक्रम पूर्ण करणार्‍या विद्यार्थ्यांना गुणवत्तेनुसार थेट कृषी पदवी अभ्यासक्रमाच्या द्वितीय वर्षाला प्रवेश दिला जाणार आहे. इंग्रजी माध्यमाच्या कृषी तंत्र विद्यालयांना दोन वर्षांचा मराठी अभ्यासक्रम सुरू करण्याची परवानगी देण्यात आली आहे. मराठी माध्यमाची परवानगी ऐच्छिक आहे. विदर्भातील खासगी संस्थाचालकांनी कृषी विद्यापीठाकडे मागणी केल्यास विद्यापीठ तशी शिफारस करेल, अशी माहिती एमसीईएआर शिक्षण संचालक डॉ. श्रीकांत काकडे यांनी दिली.