शहरं
Join us  
Trending Stories
1
येत्या २४ तासांत काहीतरी मोठे घडणार! डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणसोबत चर्चा करण्याची शक्यता, जेडी वेन्स पाकिस्तानला निघाले...
2
"हा दिवस आणि ही वेळ कोणत्याही बहिणीवर येऊ नये", सुप्रिया सुळे अजित पवारांच्या आठवणीने प्रचारसभेत भावूक 
3
Mumbai Local: मोठा अपघात टळला! CSMT स्थानकात दोन लोकल समोरासमोर! सिग्नल बिघाड अन् मोटरमनचे प्रसंगावधान (Watch Video)
4
IAS Kinjal Singh : संघर्षातून गाठलं यशाचं शिखर; लहानपणी वडिलांची हत्या, आईचा कॅन्सरने मृत्यू, जिद्दीने झाली IAS
5
ना बाजारात विकत, ना जेवणात वापरत, भारतीत एकमेव शहर, येथे  कांदा, लसुणीच्या वापरावर आहे पूर्ण बंदी
6
Video: "नरेंद्र मोदी हे दहशतवादी"; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गेंचे धक्कादायक वक्तव्य, नंतर केली सारवासारव...
7
पाकिस्तानाचा विषारी डाव! फाजिल्कामध्ये काळवंडले नद्यांचे पाणी; पंजाबची जनता आजाराच्या विळख्यात
8
१० हजार+ धावा, १७५ विकेट्स, पण आयपीएलमध्ये ५ वर्षे बेंचवर बसून राहिला 'हा' अष्टपैलू खेळाडू
9
Narasimha Navratri 2026: नृसिंह नवरात्र विशेष: नऊ दिवस नऊ उपासना; संकटमुक्तीसाठी करा ही विशेष साधना!
10
भोंगळ कारभार! रुग्णालयात गर्दी वाढली, सुरक्षा रक्षक झाला 'डॉक्टर'; जखमी तरुणाला घातले टाके
11
IPL 2026: MI vs CSK सामन्याआधी चेन्नईला मोठा धक्का; मराठमोळा स्टार क्रिकेटर स्पर्धेतून बाहेर
12
हंगेरीची मोठी घोषणा! नेतन्याहूंना अटक करणार; नवीन पंतप्रधान पीटर माग्यार यांचा इस्रायलला मोठा इशारा
13
जगाची ‘लाईफलाईन’ धोक्यात? मलक्काच्या मार्गावर अमेरिकेचा पहारा, चीनची वाढली धडधड!
14
रिक्षा चालवून लेकाला डॉक्टर बनवण्याचं स्वप्न; वडिलांवर आली अंत्यसंस्कारासाठी पैसे मागण्याची वेळ
15
युद्ध की शांतता? मतभेद! संसदेचे सभापती आणि IRGC प्रमुखांमध्ये जुंपली; इराणचे नवे 'पॉवर सेंटर' अहमद वाहिदी कोण? 
16
Lori Deremer: देशावर युद्धाचं संकट, पण ट्रम्प सरकारची महिला मंत्री करत होती 'पूल पार्टी'
17
इराणची लेडी डॉन शमीम माफीला अमेरिकेत अटक, विमानतळावरच ठोकल्या बेड्या; प्रकरण काय?
18
Latest Marathi News LIVE Updates: चेन्नई सुपर किंग्जचा आयुष म्हात्रे दुखापतीमुळे IPL 2026 बाहेर
19
क्रिकेट इतिहासात शून्यावर बाद होणारा पहिला खेळाडू कोण? १४९ वर्षांपूर्वी नोंदवला गेला हा लाजीरवाणा विक्रम; कसा आला 'डक' शब्द? जाणून घ्या
20
धक्कादायक! रील बनवण्याची हौस जिवावर बेतली; बाईकवरून स्टंट करताना पडून ३ भावांचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

अपहरणानंतर प्रेयसीची हत्या करुन मृतदेह पुरला

By admin | Updated: September 18, 2014 00:41 IST

दोन महिन्यांपूर्वी न्यायालय परिसरातून बेपत्ता झालेल्या निलोफर परवीन शेख (२३) या तरुणीचा मृतदेह बुधवारी कब्रस्तानच्या मागील परिसरातील जंगलात दफन केलेल्या स्थितीत आढळल्याने एकच खळबळ उडाली.

वर्धा : दोन महिन्यांपूर्वी न्यायालय परिसरातून बेपत्ता झालेल्या निलोफर परवीन शेख (२३) या तरुणीचा मृतदेह बुधवारी कब्रस्तानच्या मागील परिसरातील जंगलात दफन केलेल्या स्थितीत आढळल्याने एकच खळबळ उडाली. या प्रकरणी राकेश पांडे, सुनील विटकर व राहुल मडावी या तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. वर्धेतील इंदिरानगर झोपडपट्टीतील रहिवासी निलोफर परवीन ही युवती ५ जुलै रोजी जिल्हा न्यायालयात प्रियकर राकेश पांडेला भेटायला गेली होती. मात्र ती घरी पोहोचलीच नाही. यानंतर तिच्या नातेवाईकांनी सर्वत्र शोधाशोध केली. मात्र काहीही उपयोग झाला नाही. अखेर १७ जुलै रोजी तिच्या कुटुंबीयांनी शहर पोलीस ठाण्यात निलोफर परवीन ही बेपत्ता असल्याची फिर्याद नोंदविली. मात्र या प्रकरणातही पोलिसांनी आपल्या उदासीन कारभाराचा परिचय देत तपासात मंद गती ठेवली. या प्रकरणातील वास्तव पुढे येताच पोलिसांच्या पायाखालची जमीन सरकली. निलोफर परवीनची मोठी बहीण राणी यादव हिने आपल्या बहिणीच्या बेपत्ता होण्यामागे तिचा प्रियकर राकेश पांडे याचाच हात असल्याचा संशय व्यक्त केला. ही बाब पोलिसांनाही सांगितली. यानंतर पोलिसांनी सूत्र हलवून हाती आलेल्या सक्षम पुराव्याच्या आधारे राकेश पांडे याला ताब्यात घेतले. त्याची कसून विचारपूस केली असता त्याने निलोफरचे न्यायालय परिसरातून अपहरण केल्याचे मान्य केले. इतकेच नव्हे, तर तिची हत्या करून पुरावे नष्ट करण्यासाठी कब्रस्तानच्या मागील परिसरात असलेल्या जंगलात तिचा मृतदेह दफन केल्याचेही कबूल केले. या प्रकरणात राकेशचे मित्रही असल्याचे लक्षात येताच सुनील विटकर व राहुल मडावी यांना ताब्यात घेतले. आरोपींना घेऊन उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष वानखेडे, तहसीलदार राहुल सारंग यांनी सेवाग्राम व जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या चमूसह घटनास्थळ गाठले. आरोपीच्या सांगण्यानुसार दफन केलेल्या जागेचे खोदकाम केले असता निलोफरचा मृतदेह गवसला. या कारवाईत शहर ठाण्याचे प्रमोद जांभुळकर, गजानन कठाणे, मनोहर मुडे, संजय राठोड, सचिना वाटखेडे, रितेश शर्मा यांचा समावेश होता. प्रकरणाचा अधिक तपास शहर पोलीस करीत आहेत. (जिल्हा प्रतिनिधी)