शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
2
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
3
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
4
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
5
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
6
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
7
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
8
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
9
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
10
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
11
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
12
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
13
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
14
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
15
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
16
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
17
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
18
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
19
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
20
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
Daily Top 2Weekly Top 5

आम आदमी पार्टी चर्चेतूनही बाद

By admin | Updated: October 1, 2014 00:27 IST

आप पक्षाचे स्थानिक नेते त्यांच्या आवडीचा पक्ष आणि उमेदवारासाठी काम करण्यात व्यग्र.

राजेश शेगोकार / बुलडाणालोकसभा निवडणुकीपूर्वी राष्ट्रीय राजकारणात खळबळ उडवून देणारी, आम आदमी पार्टी (आप) विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात तर नाहीच, पण आता सामान्य नागरिकांच्या चर्चेतूनही बाद झाली आहे. या पक्षाचे स्थानिक नेते, कार्यकर्ते आता त्यांच्या आवडीचा पक्ष आणि उमेदवारासाठी काम करताना दिसत आहेत.राजकारणात अनेक पक्षांचा उदय होतो व काळाच्या ओघात या पक्षांचा अस्तही तितक्याच झपाटयाने झालेला दिसतो. दिल्ली विधानसभा निवडणूक जिंकून आम आदमी पार्टीने सामान्यांच्या आशा आकांक्षा फुलविल्या होत्या. गल्लीबोळातील सामान्य नागरिकांच्या तोंडात अरविंद केजरीवाल यांचे नाव होते; मात्र नंतर दिल्लीची सत्ता सोडण्याचा नाटकी निर्णय आणि लोकसभा निवडणुकीत झालेले पानीपत, या कारणांमुळे विधानसभा निवडणुकीत आपचे अवसान गळाले. या पक्षाने आम्ही विधानसभा लढविणार नाही, असे आधीच जाहीर करून टाकले. हा पक्ष निवडणूक रिंगणातच नसल्याने, आपपक्षाच्या वळचणीला गेलेल्या अनेक नेत्यांनी अन्य पक्षांचा आधार घेतला असून, कार्यकर्ता कोण, हा आता संशोधनाचा विषय झाला आहे. विधानसभा निवडणुकीनिमित्त सर्वत्र गप्पांचे फड रंगले असून, या गप्पांमध्येही फारशी चर्चा होताना दिसत नाही. अवघ्या काही महिन्यात देशाच्या राष्ट्रीय राजकारणात स्थान मिळवणारी आम आदमी पार्टी लोकसभा निवडणुकीनंतर काही दिवसातच बाद झाली आहे.** अण्णा हजारे यांच्या भूमिकेविषयी उत्सूकताज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी लोकसभा निवडणुकीत काही निवडक उमेदवारांना पाठींबा दिला होता. या उमेदवारांच्या प्रचारासाठी अण्णांनी राज्यभर सभा घेतल्या आणि त्याची सुरूवात बुलडाण्यातून झाली होती. सिंदखेडराजा येथे अण्णांनी लोकसभा निवडणुकीतील उमेदवारांच्या प्रचारासाठी राज्यातील पहिले भाषण केले होते. त्यामुळे या विधानसभा निवडणुकीत अण्णांची भूमिका काय राहणार, याबाबत राजकीय क्षेत्रात उत्सूकता आहे. युती आणि महाआघाडी दूंभगल्यामुळे सध्या आयाराम गयाराम प्रवृत्तीच्या नेत्यांनी मिळेल त्या पक्षाची उमेदवारी स्विकारत रिंगणामध्ये उडी घेतली असल्याने अण्णा कोणती भूमिका घेतात, याविषयी राजकीय वतरुळात उत्सूकता आहे.