पितृछत्र हरपलेले ५५ विद्यार्थी घेतले दत्तक

By Admin | Updated: July 11, 2014 08:46 IST2014-07-11T01:58:55+5:302014-07-11T08:46:22+5:30

दहावीपर्यंतचा सर्व खर्च संस्था करणार

Adopted 55 students who lost their parental background | पितृछत्र हरपलेले ५५ विद्यार्थी घेतले दत्तक

पितृछत्र हरपलेले ५५ विद्यार्थी घेतले दत्तक


टेंभुर्णी : रोटरी क्लब आॅफ टेंभुर्णी व कामधेनू परिवार बावड यांनी पितृछत्र हरपलेले ५५ विद्यार्थी दत्तक घेतले आहेत़ दहावीपर्यंतचा सर्व खर्च या दोन्ही संस्था करणार आहेत़
रविवारी रोटरी क्लब भवनमध्ये सकाळी ११ वाजता या सर्व दत्तक विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले़ अध्यक्षस्थानी कामधेनू परिवाराचे अध्यक्ष डॉ़ लक्ष्मण आसबे होते़ या विद्यार्थ्यांमध्ये पहिलीपासून ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांचा समावेश आहे़ ५५ पैकी १० विद्यार्थी टेंभुर्णी रोटरी क्लबने दत्तक घेतले आहेत़
कार्यक्रमास रोटरीचे अध्यक्ष अनिल मस्के, सचिव नागेश कल्याणी, माजी अध्यक्ष डॉ़ पांडुरंग गायकवाड, रमेश पाटील, प्रशांत गांधी, रावसाहेब देशमुख, दिलीप भोसले, गोरख खटके, अशोक खटके, रोटरीचे सदस्य महेश कोठारी, अनिल बाबर, वैभव गांधी, विनोद शिंदे, नागेश बोबडे, डॉ़ अमोल भोसले, दीपक व्यवहारे, श्रीकांत लोंढे, गणेश भणगे यांच्यासह कामधेनू परिवाराचे सदस्य उपस्थित होते़
निराधार विधवा महिलांच्या मुलांना दत्तक घेऊन त्यांच्या दहावीपर्यंतच्या शिक्षणाचा खर्च करण्याचे काम कामधेनू परिवार गेल्या चार वर्षांपासून करीत असल्याचे सांगून डॉ़ लक्ष्मण आसबे म्हणाले, चालू वर्षी ६५० विद्यार्थ्यांना दत्तक घेतले आहे़ त्यासाठी अनेकांचे सहकार्यही मिळत आहे़ डॉ़ डी़ व्ही़ यांनी कामधेनू परिवाराच्या कामाची माहिती दिली़
प्रास्ताविक रोटरीचे माजी अध्यक्ष यशवंत हांडे यांनी केले़ सूत्रसंचालन संतोष मोटे यांनी तर आभार रमेश पाटील यांनी मानले़
------------------------
असा उपक्रम राबविणारा पहिलाच रोटरी क्लब
विधवांच्या मुलांना दत्तक घेऊन त्यांच्या दहावीपर्यंतच्या शिक्षणाचा खर्च करणारा टेंभुर्णी रोटरी क्लब हा राज्यातील पहिला रोटरी क्लब असल्याचे डॉ़ लक्ष्मण आसबे यांनी सांगितले़
दत्तक घेतलेल्या मुलांना १० वी पर्यंतच्या शिक्षणाचा खर्च शिवाय गणवेश, जेवणाचा खर्च करण्यात येतो़
दत्तक घेतलेल्या मुलांचा आणि त्यांच्या आईची मोफत वैद्यकीय तपासणी करण्याची जबाबदारी टेंभुर्णी येथील डॉ़ पांडुरंग गायकवाड, डॉ़ अमोल भोसले यांनी स्वीकारली़

Web Title: Adopted 55 students who lost their parental background