शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

व्यसनी कैद्याचा कारागृहात हैदोस !

By admin | Updated: January 18, 2015 00:38 IST

नशेत बेभान झालेल्या एका कैद्याने मध्यवर्ती कारागृहात हैदोस घातला. कैद्यांना, बावा (रक्षक) आणि कर्मचाऱ्यांनाही त्याने मारहाण केली.

नरेश डोंगरे - नागपूरनशेत बेभान झालेल्या एका कैद्याने मध्यवर्ती कारागृहात हैदोस घातला. कैद्यांना, बावा (रक्षक) आणि कर्मचाऱ्यांनाही त्याने मारहाण केली. तत्पूर्वी त्यान तेथील अधिकाऱ्यांना शिवीगाळ करून त्यांच्यावर आरोप केले. त्याचा गोंधळ असह्य झाल्यामुळे अन्य कैद्यांनी त्याला जबर मारहाण केली. येथील मध्यवर्ती कारागृहात घडलेले हे थरारनाट्य संबंधित अधिकाऱ्यांनी पाच-सात दिवस अंधारात ठेवले हे उल्लेखनीय!नागपूरचे मध्यवर्ती कारागृह अनेक वादग्रस्त घटनांमुळे वर्षभरात राज्यभर चर्चेला आले आहे. या कारागृहात चिकन, मटणच नव्हे, तर दारू, गांजासारखे अमली पदार्थही सहज उपलब्ध होतात. प्रतिबंध असूनही मोबाइलचा सर्रास वापर होतो. एका वरिष्ठ अधिकाऱ्याच्या ‘अर्थपूर्ण कार्यपद्धतीमुळे’ काही कैद्यांना घरच्यासारख्याच सोयीसुविधा मिळतात. त्यामुळे इतर कैद्यांचा तिळपापड होतो. यातून कैद्यांचे एकमेकांशी वाद होतात. तुरुंगातील कर्मचाऱ्यांशी वाद, एकमेकांवर हल्ले असे प्रकार नेहमीच घडतात. अशाच पैकी अमली पदार्थाची सुविधा मिळवणारा एक कैदी गेल्या आठवड्यात जास्त नशेमुळे बेभान झाला. त्याने प्रारंभी आजूबाजूच्या कैद्यांसह आतील रक्षक आणि कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करीत धमकावणे सुरू केले, काहींना मारहाणही केली. उपस्थित अधिकाऱ्याकडे त्याची तक्रार झाली. त्यामुळे ‘त्या’ अधिकाऱ्याने त्याला चौकशीसाठी आपल्या कक्षात बोलावून घेतले. येथे या कैद्याने अधिकाऱ्यावरच तोंडसुख घेतले. नको ते आरोप लावले. परिणामी वातावरण तापले. काहींनी त्याला तेथून खेचतच बरॅककडे नेले. त्यामुळे हा कैदी चवताळला. त्याने कैद्यांसोबतच कर्मचाऱ्यांनाही मारहाण केली. समजवायला येणाऱ्या प्रत्येकाला तो मारहाण करू लागला. त्यामुळे संतप्त होऊन सर्वांनी या कैद्याला बेदम मारहाण केली. परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे लक्षात आल्यानंतर कारागृहाचे अधिकारी धावले अन् त्यांनी मारहाण करणाऱ्यांच्या तावडीतून त्याला सोडविले. नंतर त्याच्यावर आतमध्येच उपचार करण्यात आले. बेदम मारहाणीमुळे चार-पाच दिवस होऊनही जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या या कैद्याच्या अंगावरची विशेषत: हातावरची सूज कमी झाली नाही. उद्या अडचण होऊ नये, यासाठी कारागृह प्रशासनाने या घटनेची किरकोळ स्वरूपात कागदोपत्री नोंद केली.