शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा इराणला थेट इशारा! 'युद्धविराम संपला तर एवढे बॉम्ब पडतील की...', इस्लामाबाद चर्चेआधी तणाव वाढला!
2
...तर इराणवर पुन्हा ड्रोन-क्षेपणास्त्रांचा वर्षाव? "मोहीम अद्याप संपलेली नाही"; व्हाइट हाऊसनंतर आता नेतन्याहू यांचाही थेट इशारा
3
GT vs MI : हा माझा प्रॉब्लेम नाही! तिलक-बुमराहसंदर्भातील कळीच्या मुद्यावर पांड्या स्पष्टच बोलला
4
औराद शहाजानी परिसरात उष्माघाताने शेतकऱ्याचा मृत्यू; साेमवारी तापमान पाेहोचले ४२.८ अंशावर
5
IPL 2026 : "घासून नाही, ठासून हरवलं "! MI चं विक्रमी विजयासह दमदार कमबॅक; GT ला पहिल्यांदाच दिली मात
6
'लिव्ह इन पार्टनर'च्या छळाला कंटाळून ५१ वर्षीय महिलेकडून आत्महत्येचा प्रयत्न, मृत्यू झाल्यावर गुन्हा दाखल
7
रणजी क्रिकेटमध्ये संधी देण्याच्या नावाखाली दोन तरुणांना २० लाखांचा गंडा
8
कार्यकर्ता अपमानित होतो, तेव्हा माझ्यातील शिवसैनिक जागा : एकनाथ शिंदे
9
९३ दिवसांचा थरार अन् 'ऑपरेशन महादेव' फत्ते! पहलगामच्या मारेकऱ्यांचा असा घेतला भारतीय सैन्याने बदला!
10
मध्यपूर्वेतील राजकारणात मोठा भूकंप; "आता अमेरिकेची गरज नाही...!" UAE चा ट्रम्प यांना तगडा धक्का, नवा वाद पेटला
11
श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीला ७ हजार आंब्यांचा महानैवेद्य; अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर ट्रस्टकडून आंबा महोत्सव 
12
Tilak Varma Maiden IPL Hundred : तिलक वर्माची अविश्वसनीय सेंच्युरी; MI साठी ठरला खरा संकटमोचक!
13
Travel : भारतात आहे चक्क मंगळ ग्रहासारखी जागा! पर्यटकांची पहिली पसंती; 'हे' अजब ठिकाण पाहिलेत का?
14
साताऱ्याचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांची बदली; एकूण ९ अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश निघाले... 
15
GT vs MI : स्टंप तोड गोलंदाजी! षटकारासह स्वागत झाल्यावर रबाडानं असा घेतला सूर्या दादाचा बदला (VIDEO)
16
पतीच्या मैत्रिणीस अडकवण्यासाठी चाकुरात पत्नीने केला पुतण्याचा खून; 'असा' झाला उलगडा
17
सराफवाडी येथे माय लेकाची गळफास घेवून आत्महत्या; कारण अस्पष्ट, वालचंदनगर पोलिसांकडून तपास सुरू 
18
गुंतवणूकदार मालामाल! १० वर्षांत पैशांचा पाऊस पाडणाऱ्या कंपनीचा स्टॉक होणार स्प्लिट; रेकॉर्ड डेट जाहीर
19
पाेटच्या दाेन चिमुकल्यांसह मातेने विहिरीत उडी घेत संपवले जीवन! खरोसा गावावर शोककळा
20
"अजित डोभाल अचानक सौदीला का गेले?"; इराण-अमेरिका संघर्षात भारतानं फेकला 'हुकमी एक्का'; मोठ्या 'गेम"ची तयारी
Daily Top 2Weekly Top 5

एसी डबल डेकरला हद्दीचे विघ्न

By admin | Updated: August 23, 2014 02:11 IST

मध्य आणि कोकण रेल्वे सीमारेषेच्या वादाचा मोठा फटका एसी डबल डेकरला पहिल्याच दिवशी बसला. रोहापुढे डबल डेकर नेण्यास मध्य रेल्वेच्या लोको पायलटने नकार दिला

मुंबई : मध्य आणि कोकण रेल्वे सीमारेषेच्या वादाचा मोठा फटका एसी डबल डेकरला पहिल्याच दिवशी बसला. रोहापुढे डबल डेकर नेण्यास मध्य रेल्वेच्या लोको पायलटने नकार दिला आणि ही ट्रेन तब्बल सव्वा तास स्थानकात रखडली. रोहापुढे कोकण रेल्वेचा की मध्य रेल्वेचा लोको पायलट जाणार, या रंगलेल्या वादानंतर कोकण रेल्वेकडून लोको पायलट देण्यात आला आणि डबल डेकर ट्रेन पुढे रवाना झाली. 
गणोशोत्सवानिमित्त कोकण- वासीयांसाठी एसी डबल डेकर ट्रेन 22 ऑगस्टपासून मध्य आणि कोकण रेल्वेकडून सुरू करण्यात आली. शुक्रवारी ही ट्रेन एलटीटीहून पहाटे साडेपाचच्या सुमारास सुटली. मात्र सकाळी 8.35 च्या सुमारास डबल डेकर ट्रेन रोहा स्थानकात आल्यानंतर या ट्रेनचे लोको पायलट असलेले बी. सी. सिंग यांनी पुढे जाण्यास नकार दिला. ट्रेन जागेवरून हलत नसल्याने प्रवासीही अवाक् झाले. कोकण रेल्वेकडून या लोको पायलटला विनंती केल्यानंतरही लोको पुढे जाण्यास तयार नव्हता. अखेर याची माहिती मध्य रेल्वेला देण्यात आली. मात्र मध्य आणि कोकण रेल्वेत लोको पायलट देण्यावरून बराच वाद रंगला. अखेर कोकण रेल्वेकडून लोको पायलट दिल्यानंतर ही ट्रेन सकाळी 9.50 च्या सुमारास रोहा स्थानकातून सुटली. मात्र ही ट्रेन सव्वा तास का थांबली याची माहिती प्रवाशांना मिळाली नसल्याने प्रवाशांकडून संताप व्यक्त करण्यात आला.
 
2012 मध्ये मध्य व कोकण रेल्वेच्या बैठकीत मुंबई ते रत्नागिरीर्पयत मध्य रेल्वेचा लोको पायलट लांब पल्ल्याच्या गाडय़ांवर असेल, असे मध्य रेल्वेकडूनच स्पष्ट करण्यात आले होते. 
 
च्मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक सुनील कुमार सूद म्हणाले, की रत्नागिरीर्पयत एसी डबल डेकर नेण्याची जबाबदारी आमचीच होती. चालन विभागाकडून त्याची माहिती बरोबर घेण्यात आली नाही आणि ती देण्यातही आली नाही. त्याच्या कागदपत्रंतच हा गोंधळ उडाला. 
च्एसी डबल डेकर यापुढेही धावणार असून, यासाठी मी कोकण रेल्वेला सध्यातरी रोहापुढे लोको पायलट तुमचा देण्यात यावा, अशी विनंती केली आहे.