बापरे! ३२ हजार जागांसाठी तब्बल ३२ लाख अर्ज, सरासरी एका जागेसाठी ४५२ अर्ज

By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2019 05:25 AM2019-08-22T05:25:57+5:302019-08-22T05:30:02+5:30

ग्रामविकास विभागातील १३ हजार ५१४ पदांसाठी तब्बल ११ लाख २० हजार अर्ज आले आहेत. पशुसंवर्धन विभागांतर्गत भरावयाच्या ७२९ पदांसाठी ३ लाख ३० हजार अर्ज आले आहेत.

About 32 lakh applications for 32 thousand seats, on average 452 application for one seat | बापरे! ३२ हजार जागांसाठी तब्बल ३२ लाख अर्ज, सरासरी एका जागेसाठी ४५२ अर्ज

बापरे! ३२ हजार जागांसाठी तब्बल ३२ लाख अर्ज, सरासरी एका जागेसाठी ४५२ अर्ज

Next

मुंबई : राज्य शासनाने सुरू केलेल्या मेगा कर्मचारी भरतीसाठी लाखो तरुणतरुणींनी अर्ज केले आहेत. ३२ हजार जागांसाठी ३२ लाखांहून अधिक अर्ज आल्याची माहिती अधिकृत सूत्रांनी दिली.
ग्रामविकास विभागातील १३ हजार ५१४ पदांसाठी तब्बल ११ लाख २० हजार अर्ज आले आहेत. पशुसंवर्धन विभागांतर्गत भरावयाच्या ७२९ पदांसाठी ३ लाख ३० हजार अर्ज आले आहेत. याचा अर्थ सरासरी एका जागेसाठी ४५२ अर्ज आले आहेत. एकूण १३ शासकीय विभागांमधील ३१ हजार ८८८ जागा भरण्यात येत असून त्यात मुख्यत्वे वर्ग क आणि ड (तृतीय व चतुर्थ श्रेणी) च्या पदांचा समावेश आहे. त्यात मुख्यत्वे कृषी, सार्वजनिक बांधकाम, पशुसंवर्धन, वित्त, जलसंधारण, ग्रामविकास, वने आदी विभाग आहेत. वित्त विभागातील ९३२ पदांसाठी अर्जाची संख्या १ लाख ७० हजार आहे. वन विभागाच्या ९५१ पदांसाठी ४ लाख २ हजार अर्ज आले आहेत. तर, महसूल विभागातील १८०२ पदांसाठी ५ लाख ६४ हजार तरुण-तरुणी रांगेत आहेत.

Web Title: About 32 lakh applications for 32 thousand seats, on average 452 application for one seat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.